सुका मेवा हा आपल्या आरोग्यासाठी अतिशयय चांगला व फायदेशीर मानला जातो. मेंदूच्या आरोग्यासाठीही सुका मेव्याचे (Dry Fruits) सेवन करणे उपयुक्त ठरते. लहान मुलं असोत किंवा मोठ्या व्यक्ती, प्रत्येक व्यक्तीला ड्रायफ्रूट खाण्याचा सल्ला दिला जातो. लहानपणी मुलांना दिल्या जाणाऱ्या आहाराचा त्यांच्या मानसिक आणि शारीरिक विकासावर परिणाम होतो. पोषक तत्वांनी युक्त असा आहार मुलांच्या वाढीस मदत करतोच शिवाय मुलांची स्मरणशक्तीही तीक्ष्ण करतो. मुलांचे मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी तुम्ही त्यांच्या आहारात या खास ड्रायफ्रूटचा समावेश केला पाहिजे.
अक्रोड हा दिसायलाही मेंदूसारखा असतो आणि तो मेंदूच्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम मानला जातो.
अक्रोडमध्ये पोलीफेनोल्स, व्हिटॅमिन ई आणि ओमेगा -3 फॅटी ॲसिड्स आढळतात.
अक्रोडमध्ये व्हिटॅमिन ई असते. हे मेंदूच्या आरोग्यासाठी चांगले आहे.
यामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडेंट मेंदूचे कार्य आणि स्मरणशक्ती वाढवतात.
अक्रोडमध्ये व्हिटॅमिन ए आणि ल्युटीन देखील आढळतात जे डोळ्यांसाठी फायदेशीर आहेत.
यामध्ये हेल्दी फॅट्स आढळतात, ज्यामुळे मुलांचे वजनही नियंत्रणात राहते.
अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड आणि फायबर भरपूर असतात, जे चयापचय वाढवतात.
मुलांना नेहमी भिजवलेले अक्रोड खायला द्यावे.
भिजवून खाल्ल्याने त्याची उष्णताही कमी होते.
तुम्ही भिजवलेले अक्रोड मुलांना रिकाम्या पोटी देऊ शकता.
यामुळे शरीरात ऊर्जा टिकून राहते.
२-३ अक्रोड भिजवून खा.
बदामामध्ये फॅट- सोल्यूबल व्हिटॅमिन एकदम योग्य प्रमाणात असतात. तसेच त्यामध्ये व्हिटॅमिन ई हे देखील मुबलक प्रमाणात असते. बदाम तुम्ही भिजवून खाऊ शकता. बदाम भाजून खाल्यासही चविष्ट लागतात. त्याशिवाय बदामाचे दूध प्यायल्यानेही फायदा होतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.