त्वचेच्या कोरडेपणाला कारणीभूत 'हे' सात पदार्थ एकत्र कधीच खाऊ नका!

त्वचेच्या कोरडेपणाला कारणीभूत 'हे' सात पदार्थ एकत्र कधीच खाऊ नका!
What causes dry skin
What causes dry skinSakal
Updated on
Summary

आपली त्वचा ग्लोइंग दिसते की कोरडी किंवा निर्जीव, याला आपल्या खाण्याच्या सवयी देखील कारणीभूत आहेत.

केवळ हवामानामुळे त्वचेचा कोरडेपणा (Skin Dryness) वाढत नाही; उलट, आपली त्वचा ग्लोइंग दिसते की कोरडी किंवा निर्जीव, याला आपल्या खाण्याच्या सवयी देखील कारणीभूत आहेत. येथे तुम्ही अशा पदार्थांबद्दल जाणून घेऊ शकता, जे एकत्र खाल्ल्याने त्वचेत जलद कोरडेपणा येतो. जेव्हा त्वचेत कोरडेपणाची समस्या उद्भवते, तेव्हा आपण बदलत्या हवामानाला (Weather), आपल्या साबणाला किंवा हॅंडवॉशला कारणीभूत ठरवतो. कारण, आपल्यापैकी बहुतेकांना हे माहीत नाही की चुकीच्या फूड (Food) कॉम्बिनेशनमुळेही त्वचेत कोरडेपणा वाढतो. विरुद्ध प्रकृतीचे दोन पदार्थ एकत्र खाण्याचा क्रम असाच सुरू ठेवलात, तर त्वचेला कितीही मॉइश्‍चरायझर (Moisturizer) लावले तरी काही वेळातच त्वचा पुन्हा कोरडे पडते. (Eating hot and cold foods at the same time increases dryness of the skin)

What causes dry skin
ESIC च्या विविध कार्यालयांत UDC, Steno अन्‌ MTS पदांची भरती!

याचे कारण असे, की शरीरात होणाऱ्या रासायनिक अभिक्रियांमुळे काही खाद्यपदार्थ ज्यांचे गुणधर्म एकमेकांच्या विरुद्ध असतात, ते एकत्र खाल्ल्यास बाष्पीभवन वाढते. त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता वेगाने होऊ लागते. या निर्जलीकरणाचा पहिला परिणाम तुमच्या त्वचेवर दिसून येतो. हिवाळ्याच्या (Winter) मोसमात बहुतेक लोक असेच पाणी कमी पितात. यासोबतच थंड हवा त्वचेतील आर्द्रताही शोषून घेते. अशा परिस्थितीत जर शरीर आतून निर्जलीकरण होऊ लागले तर त्वचेत चमक आणि नितळपणा कसा राहील! म्हणूनच तुमच्या त्वचेला मॉइश्‍चरायझर लावण्यासोबतच ते आतून हायड्रेट ठेवण्यासाठी येथे नमूद केलेल्या गोष्टींचे योग्य सेवन करणे महत्त्वाचे आहे.

हे पदार्थ एकत्र खाऊ नका

आयुर्वेदानुसार (Ayurveda) थंड आणि उष्ण पदार्थांचे एकत्र सेवन करू नये. उदाहरणार्थ, गरम सॅंडविच किंवा रोलसह थंड पेय (Cold Drinks) घेणे. त्यामुळे त्वचेचा कोरडेपणा वाढतो.

मंद पचन (Slow Digestion)

जर तुमचे पचन मंद होत असेल तर अशा परिस्थितीत तुम्ही मध (Honey) जास्त प्रमाणात खाऊ नये. मुळा, मासे (Fish) किंवा चिकन (Chicken) यांसारख्या गोष्टी खाणे टाळा. पचन मंद असताना या गोष्टी खाल्ल्याने चयापचयावर अतिरिक्त ताण पडतो.

विरुद्ध गुणांचे आहार एकाचवेळी सेवन

दोन विरोधी गुणधर्म असलेले अन्न एकत्र खाल्ल्याने त्वचेतील कोरडेपणा वाढतो. उदाहरणार्थ, एकाच वेळी मासे आणि दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांचे सेवन, मुळ्याच्या पराठ्यासोबत दूध किंवा चहाचे सेवन करणे, मिठापासून बनवलेल्या पदार्थांसोबत दूध पिणे या सर्व गोष्टी आहारविरोधी आहेत. असे पदार्थ एकाच वेळी एकाच जेवणात एकत्र खाणे टाळा.

उन्हात किंवा उष्णतेचा दीर्घकाळ संपर्क

तुम्ही जास्त वेळ उन्हात राहिलात किंवा गरम ठिकाणी जास्त वेळ घालवलात तरी तुमच्या त्वचेचा कोरडेपणा झपाट्याने वाढतो. अशा परिस्थितीत आपला आहार योग्य ठेवणे आणि त्वचेची योग्य काळजी घेणे आवश्‍यक आहे.

What causes dry skin
नवीन वर्षात बदलताहेत 'हे' तीन नियम! दुर्लक्ष कराल तर पडेल महागात

नकळत कोरडेपणा वाढतो

तुम्ही तुमच्या शारीरिक क्षमतेपेक्षा जास्त व्यायाम (Exercise) केलात तरीही तुमची त्वचा कोरडी होते. खूप मेहनत केल्यानंतर आणि खूप घाम गाळल्यानंतर जेव्हा तुम्ही गरम पाण्याने अंघोळ करता तेव्हा त्यामुळे त्वचेला जास्त कोरडेपणा येतो. त्यामुळे शारीरिक क्षमतेपेक्षा जास्त व्यायाम करू नका. तसेच, जेव्हाही काही मेहनत आणि घाम गाळून अंघोळ करावी लागते तेव्हा अंघोळीनंतर लगेच अंगावर मॉइश्‍चरायझर लावा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही अंघोळीपूर्वीही अंगावर तेलाची मालिश करू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()