Kiwi Health Benefits: 'किवी' हे फळ महाग जरी असले तरी आरोग्यासाठी फायदेशीर आहे. किवी वर्षभर बाजारात उपलब्ध असते, त्याला सुपरफूडच्या श्रेणीत ठेवणे कदाचित चुकीचे ठरणार नाही; कारण त्यात आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे असलेले अनेक पोषक घटक आहेत. त्याची किंमत इतर फळांच्या तुलनेत थोडी जास्त असली तरी ती खरेदी करणे आरोग्यासाठी तोट्याची नाहीच.
किवीचा बॉक्स १५० ते १८० रुपये प्रमाणात बाजारात मिळतो. किवीमध्ये अनेक पोषक घटक आहेत. किवीमध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते, जे लोक आपल्या फिटनेसची विशेष काळजी घेतात त्यांनी किवी नक्कीच खावी. या फळामध्ये पोटॅशिअम, व्हिटॅमिन सी आणि फायबर आढळतात, जे आपल्या शरीराला अनेक प्रकारे फायदेशीर ठरतात. रोज एक मध्यम आकाराची किवी खाणे आपल्यासाठी पुरेसे ठरेल.
ज्या लोकांना हृदयरोग आहे त्यांना बरेचदा किवी खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे हार्टअटॅकचा धोका कमी होतो. जर तुम्हाला उच्च रक्तदाबाची तक्रार असेल तर किवी फळ खा, यामुळे बीपी नियंत्रणात येईल. कमी कॅलरीजमुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी ते एखाद्या औषधापेक्षा कमी नाही. यामुळे साखरेची पातळी कमी होते. किवी खाल्ल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडू लागतात, ज्याचा सकारात्मक परिणाम आपल्या त्वचेवर दिसू लागतो. किवीच्या नियमित सेवनाने त्वचा आश्चर्यकारक दिसते आणि सुरकुत्या दूर होतात.
ज्या लोकांच्या पोटात गडबड आहे त्यांनी नियमितपणे किवीचे सेवन करावे. किवी पोटातील अल्सर बरे करण्यास देखील मदत करू शकते. किवीमध्ये लोह आणि फॉलिक ॲसिड भरपूर प्रमाणात असते, जे गरोदर महिलांसाठी फायदेशीर आहे. किवीचे सेवन आपल्या हाडांसाठी देखील फायदेशीर आहे, यामुळे सांधेदुखी दूर होते. जे लोक मानसिक समस्यांना बळी पडतात त्यांनी तणाव कमी करण्यासाठी किवी खाणे आवश्यक आहे. किवीमुळे आपली रोगप्रतिकारशक्ती खूप वाढते, यामुळे अनेक आजार आणि इन्फेक्शनचा धोका कमी होतो.
किवीमध्ये अँटिऑक्सिडंट घटक आहेत. तसेच ए, सी, ई व्हिटॅमिन आहेत. ज्यांना विस्मरण होतो ज्यांच्या शरीरात डब्ल्यू बीसी वाढल्या असेल तेव्हा किवी खाणे आवश्यक आहे. उच्च रक्तदाब असणाऱ्यांसाठी किवी खाणे फायदेशीर आहे. लठ्ठपणा असणाऱ्यांसाठी किवी महत्त्वाचे आहे; कारण त्यामध्ये फायबर जास्त आहे.
ज्यामुळे लठ्ठपणा कमी होतो. शरीरातील रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी किवी महत्त्वाचे आहे. त्यामुळे मधुमेहसाठी फायदेशीर आहे. त्वचेवर किंवा त्वचा चमकदार करण्यासाठी आहारात किवीचा उपयोग करणे गुणकारी ठरते. किवीमध्ये व्हिटॅमिन ई असल्यामुळे केसांच्या वाढीसाठी ते महत्त्वाचे आहे. रोज किवी खाल्ल्यास केसाच्या वाढीसाठी गुणकारी आहे.
— डॉ. अलका कर्णिक, आहारतज्ज्ञ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.