Types Of Biryani: मुस्लिम धर्मातील लोकांसाठी बकरी ईद हा सण खूप महत्त्वाचा आहे. लोक वर्षभर त्याची वाट पाहत असतात. त्यामुळेच ईदची तयारी अनेक दिवस आधीच सुरू होते. या दिवशी बकऱ्यांचा बळी दिला जातो, त्यामुळे या सणाला बकरी ईद असेही म्हणतात. बोकडाचा बळी दिल्यानंतर त्याचे तीन भाग केले जातात. लोक घरात ठेवलेल्या भागातून बिर्याणी बनवतात. या दिवशी बिर्याणी बनवण्याची प्रथा आहे. जर तुम्हालाही बकरी ईदनिमित्त बिर्याणी बनवायची असेल तर जाणून घ्या की बिर्याणीचे किती प्रकार आहेत.
सिंध प्रदेश आता पाकिस्तानात आहे. इथल्या पदार्थाची चव एकदम वेगळी आहे. सिंधी बिर्याणी सुद्धा चवदार असते. त्यात वाळलेले मनुके आणि तळलेले कांदेही वापरले जातात. इतर बिर्याणीपेक्षा खास चव असते.
मालबार बिर्याणी ही केरळच्या मालाबार प्रदेशाची खासियत आहे. ही बिर्याणी बनवण्यासाठी बासमती तांदळाचा वापर केला जात नाही. ते बनवण्यासाठी जिरकसला तांदूळ वापरतात. या बिर्याणीमध्ये मसाल्यांसोबत खोबऱ्याची चवही घेता येते.
हैदराबादी बिर्याणी पारंपारिक पद्धतीने बनवली जाते. ती वाफवून शिजवली जाते. वाफवण्याच्या प्रक्रियेमुळे त्याची चव अगदी वेगळी असते. तुम्ही तुमच्या चवीनुसार चिकन किंवा मटण घालू शकता.
लखनौची चव न आवडणारा क्वचितच कोणी असेल. लखनौवी बिर्याणी बनवण्यासाठी वेलची, जायफळ आणि केशर यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. ही बिर्याणी जिभेचे चोचले पुरवते. ही बिर्याणी बनवताना लाल मिरचीचा फारसा वापर केला जात नाही.
कोलकाता बिर्याणी इतर ठिकाणच्या बिर्याणीपेक्षा खूप वेगळी आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यात बटाटेही टाकले जाते. या बिर्याणीमध्ये तुम्ही अवधी आणि मुघलाई बिर्याणी दोन्ही चाखू शकता. यात तुम्हाला जायफळाचाही आस्वाद घेता येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.