Eid Ul Adha 2024 : बकरी ईद निमित्त अनारकली ड्रेस परिधान करणार आहात? मग, अभिनेत्रींच्या 'या' बेस्ट लूक्सपासून घ्या प्रेरणा

Eid Ul Adha 2024 : बकरी ईदच्या निमित्ताने तुम्ही डिझायनर अनारकली सूट परिधान करू शकता.
Eid Ul Adha 2024
Eid Ul Adha 2024esakal
Updated on

Eid Ul Adha 2024 : बकरी ईद हा मुस्लिम समाजाचा अतिशय महत्वाचा सण आहे. भारतात जिलहिज्जचा चंद्र दिसल्यावर देशातील काही मुस्लिम धर्मगुरूंनी उद्या अर्थात १७ जूनला (सोमवारी) बकरी ईद साजरी करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे, देशात उद्या बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे.

बकरी ईदच्या दिवशी बकऱ्याची कुर्बानी दिली जाते. त्यामुळे, या दिवसाला 'बकरी ईद' म्हणून ओळखले जाते. बकरी ईदच्या दिवशी घराघरात विविध प्रकारचे खाद्यपदार्थ बनवले जातात. तसेच, नवीन कपड्यांची खरेदी केली जाते.

बकरी ईदच्या दिवशी पुरूष कुर्ता आणि पायजमा परिधान करतात तर महिला डिझायनर सूट, ड्रेस परिधान करतात. यंदा बकरी ईदच्या निमित्ताने तुम्ही अनारकली सूट परिधान करू शकता. त्यासाठी तुम्ही बॉलिवूड अभिनेत्रींच्या लूक्सपासून काही स्टायलिंग टिप्स घेऊ शकता.

Eid Ul Adha 2024
Fashion Day 2024 : पावसाळ्यात स्टायलिश अन् कूल दिसायचय? मग, फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

आदिती राव हैदरी

अभिनेत्री आदिती राव हैदरीने हा सुंदर शॉर्ट अनारकली कुर्ता परिधान केला असून तिने या शॉर्ट अनारकली कुर्त्यावर धोती स्टाईल पायजमा सुंदररित्या स्टाईल केला आहे. तुम्हाला जर आदितीसारखा लूक करायचा असेल तर तुम्ही आदितीच्या या लूकची मदत घेऊ शकता.

आदितीचा हा जांभळ्या रंगाचा अनारकली सूट इतरांपेक्षा वेगळे दिसण्यात मदत करेल. या सूटसोबत तुम्ही दुपट्टा वेगळ्या पद्धतीने कॅरी करायला विसरू नका. यावर खड्यांचे झुमके, मिनिमल मेकअप, मोकळे केस आणि पायात मोजडी असा लूक तुम्ही करू शकता.

क्रिती सेनॉन

बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉनने फोटोत हा भरजरी अनारकली ड्रेस परिधान केला आहे. जर तुम्हाला यंदाच्या ईदला क्रितीप्रमाणे भरजरी अनारकली ड्रेस परिधान करायचा असेल तर तुम्ही क्रितीच्या या लूकपासून नक्कीच प्रेरणा घेऊ शकता.

या प्रकारचा अनारकली सूट तुम्हाला मार्केटमध्ये सहज मिळू शकेल. या ड्रेसवर तुम्ही क्रितीप्रमाणे केसांचा सुंदर बन बनवू शकता आणि गळ्यात चोकर आणि कानातले घालू शकता. यावर मिनिमल मेकअप करा आणि ओढणी क्रितीप्रमाणे कॅरी करा.

माधुरी दीक्षित

बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित पारंपारिक आणि वेस्टर्न अशा दोन्ही प्रकारच्या आऊटफीट्समध्ये सुंदर दिसते. माधुरी या केशरी रंगाच्या अनारकली सूटमध्ये खूपच सुंदर दिसतेय. या प्रकारचा अनारकली सूट तुम्हाला मार्केटमध्ये सहज मिळेल.

Madhuri Dixit
Madhuri Dixitesakal

या अनारकली सूटला पुढील बाजूला स्लिट असल्यामुळे या सूटचा लूक खूपच वेगळा आणि सुंदर आहे. वजनाने हलका असलेला हा अनारकली सूट तुम्ही बकरी ईदला नक्कीच परिधान करू शकता. हेव्ही झुमके, मिनिमल मेकअप आणि मोकळ्या केसांची हेअरस्टाईल करून तुमचा लूक सुंदर बनवू शकता.

Eid Ul Adha 2024
Women Fashion : सर्वांमध्ये दिसायचंय हटके! लेटेस्ट डिझाइन असलेले हे इंडो-वेस्टर्न आऊटफिट एकदा ट्राय करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.