दरवर्षी कार्तिक महिन्याच्या एकादशीला तुळशी विवाहाचे आयोजन केले जाते, जी देवूठाणी एकादशी या नावाने प्रसिद्ध आहे. या दिवसाचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व खूप जास्त आहे. यावर्षी तुळशी विवाह 13 नोव्हेंबर रोजी केला जाणार आहे. असे मानले जाते की या दिवशी तुळशीशी विवाह केल्यास घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते.
कार्तिकी एकादशीला चातुर्मासाची सांगता होते. आषाढ महिन्याच्या देवशयनी एकादशीच्या अकराव्या दिवशी चातुर्मासाला प्रारंभ होतो. याची सांगता कार्तिक महिन्याच्या एकादशीला होते. त्यामुळे या दिवशीच्या एकादशीला महत्त्वाचे स्थान आहे.
तुम्हीही आज एकादशीचा उपवास करत असाल तर दुपारच्या फराळासाठी तुम्ही साबुदाण्याचे भजी बनवू शकता. (Vrat Recipe 2024)
भिजवलेला साबुदाना, उकडलेले बटाटे, शेंगदाण्याचा कूट, जिरे, चिरलेली हिरवी मिरची, साखर, वरी किंवा शिंगाड्याचे पीठ, आवश्यकतेनुसार सैंधव मीठ, तळण्यासाठी तेल
साबुदाणा पाण्यात रात्रभर किंवा 4 ते 5 तास भिजत ठेवा. बटाटे पॅन किंवा प्रेशर कुकरमध्ये उकळा. ते थंड झाल्यावर सोलून घ्या आणि जाड तुकडे करा. एका पॅनमध्ये शेंगदाणे तपकिरी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या.
भाजलेले शेंगदाणे बारीक वाटून घ्या. साबुदाण्यामध्ये उकडलेले बटाटे, शेंगदाण्याचा कूट, जिरे, चिरलेली हिरवी मिरची, साखर, वरी किंवा शिंगाड्याचे पीठ, आवश्यकतेनुसार सैंधव मीठ घाला.
हाताने हे सर्व पदार्थ एकत्र करा आणि पीठ भिजवा. भिजवलेले पीठाचे हवे त्या आकाराचे भजी तेलात सोडून मंद आचेवर तळून घ्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.