पथविक्रेत्या महिलांना बळ

जाणीव संघटना या संघटनेला १९९६ मध्ये सुरुवात झाली. या संघटनेचे संस्थापक विलास चाफेकर यांनी स्त्री आणि पुरुष पथविक्रेत्यांसाठी सुरू केलेला हा लढा होता.
janiv womens hawkers organization
janiv womens hawkers organizationsakal
Updated on

- श्वेता ओतारी, अध्यक्षा, जाणीव महिला हॉकर्स संघटना

जाणीव संघटना या संघटनेला १९९६ मध्ये सुरुवात झाली. या संघटनेचे संस्थापक विलास चाफेकर यांनी स्त्री आणि पुरुष पथविक्रेत्यांसाठी सुरू केलेला हा लढा होता. या संघटनेअंतर्गत पथविक्रेत्यांमध्ये काम केले जाते. ही संघटना पुरुष आणि महिला या दोघांसाठीही काम करते. पथविक्रेत्यांमध्ये जवळजवळ सत्तर टक्के महिला आपल्याला पाहायला मिळतात. मी महिला हॉकर्स पथविक्रेता संघटनेची अध्यक्ष आहे.

इतक्या मोठ्या प्रमाणावर पथ व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘जाणीव’च्या माध्यमातून देशभरातून काम केले जाते. तसेच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील समस्या, आरोग्य या सर्वांसाठीही या माध्यमातून काम केले जाते. या महिला पथविक्रेत्यांच्या शंकांचे निरसन करून त्याच्यावर मार्ग कसा काढला जाईल यावरही काम केले जाते. ही संघटना देशपातळीवर काम करते.

महाराष्ट्रातील सर्व देवस्थाने, जेजुरी गड, रायगड, खोपोली आदी ठिकाणी पथविक्रेत्यांमध्ये स्त्री पथविक्रेत्या आपल्याला दिसून येतात. तसेच अनेक आदिवासी भागातील स्त्रिया या तेथील रानमेवा, मध आदी गोष्टी गोळा करून तेथील पथावर बसून विकत असतात.

या सर्व महिलांना साक्षर, सक्षम करणे, त्यांना त्यांच्या हक्काचे व्यासपीठ करून देणे हे या माध्यमातून केले जाते. तसेच जातीय निर्मूलन, लोकसंख्या नियंत्रण, विविध व्यावसायिक प्रशिक्षणे आदींवर या माध्यमातून काम पाहिले जाते. आतापर्यंत कित्येक महिलांना याच्या माध्यमातून मदत मिळाली आहे.

लोणावळ्यामध्ये आमच्या संघटनेला जोडलेल्या महिला या वनविभागाच्या हद्दीमध्ये पथविक्रेत्याचे काम करतात; तसेच जेजुरगडावर अनेक महिला भंडारा, खोबरे विकण्याचे काम करतात. ही संघटना ज्यावेळेस सुरू झाली, त्यावेळी स्त्री आणि पुरुष दोघांसाठी सुरू झाली होती. स्त्री आणि पुरुषांचे प्रश्न वेगळे असले तरी एकत्रित लढा देण्याचे काम या संघटनेअंतर्गत होते.

अनेक ऊसतोड कामगारांमध्येही महिलांचे प्रमाण मोठे आहे. या महिला त्यांच्या लहान मुलांना घेऊन त्या पाड्यांवर राहतात. या सर्वांमध्ये जागृती, सक्षमीकरण करणे गरजेचे आहे. अनेक महिलांना असे अनुभव आलेले असतात, की आपला भाग सोडून बाहेर गेल्यास काही पुरुषांची वक्र नजर त्यांच्यावर पडते. याबाबत जागृती त्यांच्यामध्ये यावी, त्यांच्यासोबत काही चुकीचे घडू नये यासाठी आम्ही त्यांना साक्षर करतो आणि जागृती निर्माण करतो.

या महिलांना विविध प्रशिक्षणांसोबतच बचत करण्याचीही सवय आम्ही लावतो. आर्थिक नियोजन करण्याबद्दलचे शिक्षण दिले जाते. या बचतीच्या सवयीचा एवढा चांगला परिणाम झाला, की कोविडसारख्या अवघड काळातही त्यांना कुणाकडूनही कर्ज घेण्याची गरज पडली नाही. त्या स्वावलंबी होत्या. त्यांनी पुन्हा त्यांचे व्यवसाय त्याच ताकदीने सुरू केले.

(शब्दांकन : प्रियांका सत्यवान)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.