कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती महिला शेतकऱ्यांना देण्यासाठी आणि शेतीत तंत्रज्ञानाचा सुलभ वापर त्यांना करता यावा, यासाठी महिला शेतकऱ्यांना कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण दिले जाते. केंद्र सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय जीवनोन्नती मिशन अंतर्गत दीनदयाळ उपाध्याय योजना राबविण्यात येते. महिला किसान सशक्तीकरण परियोजना हा या मिशनाचा एक भाग असून या अंतर्गत देशातील जवळपास ४० लाखांहून अधिक महिला शेतकऱ्यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे.