Electric Bike Purchase: EMPS सबसिडी संपण्यापूर्वी घ्या 'इलेक्ट्रिक बाईक', 31 जुलै शेवटची तारीख; जाणून घ्या काय आहे योजना?

या योजनेसाठी 1 एप्रिल 2024 रोजी सादर झालेल्या अंतरिम अर्थसंकल्पात केंद्र सरकारनं 500 कोटी रुपयांची तरतूद केली होती.
Electric Vehicle
Electric Vehicle
Updated on

नवी दिल्ली : देशात प्रदुषणविरहित वाहनांच्या विकासासाठी आणि विक्रीच्या प्रोत्साहनासाठी केंद्र सरकारनं १ एप्रिल २०२४ च्या बजेटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांसाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद केली होती. यासाठी इलेक्ट्रिक मोबिलिटी प्रमोशन स्कीम (EMPS) अंतर्गत इलेक्ट्रिक वाहनं विकत घेणाऱ्या ग्राहकांना सरकारनं सबिसिडी जाहीर केली होती.

या सबसिडीची मुदत ३१ जुलै २०२४ रोजी संपत आहे. त्यामुळं जर इलेक्ट्रीक वाहन आणि सबसिडी असा दुहेरी फायदा तुम्हाला घ्यायचा असेल तर आजच तुम्हाला इलेक्ट्रीक वाहन बुक करा.

Electric Vehicle
Sick Leave: "तुम्हाला सीक लिव्ह घ्यायची असेल तर 7 दिवस आधीच सांगावं लागेल!" काय आहे हा प्रकार जाणून घ्या

काय आहे EMPS योजना?

ईएमपीएस 2024 ही योजना मर्यादित निधी आणि मर्यादित कालावधीसाठी लागू आहे. या योजनेंतर्गत e-2w, e-3w: e-Rickshaw/ e-cart, e-3w: L5 या कॅटेगिरीतील वाहनांसाठी या योजनेंतर्गत प्रोत्साहन अनुदान देण्यात येतं. पण या योजनेचा लाभ घेण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी योजनेच्या वैध कालावधीत झालेली पाहिजे.

Electric Vehicle
Crocodile in BKC: बीकेसीत मगर आढळल्यानं खळबळ! नागरिकांना वन विभागानं केलं महत्वाचं आवाहन

कोणाला मिळणार EMPS योजनेचा फायदा?

सबसिडीसाठी सरकारनं दिलेल्या खर्चाची एकूण रक्कम 493.55 कोटी रुपये इतकी मर्यादित आहे. त्यामुळं जर या योजनेसाठीचा निधी जर 31 जुलै 2024 पूर्वी संपला तर ही योजना बंद करण्यात येणार आहे. त्यासाठी केलेल्या दाव्यांची EMPS 2024 अंतर्गत दखल घेतली जाणार नाही. योजनेसाठी दाखल केलेले अर्ज हे 'प्रथम येणाऱ्यास प्राधान्य' तत्त्वावर निकालात काढले जातील, असं सरकारनं काढलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.