Health Care: कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी प्रत्येक महिलेने कराव्याच या 7 टेस्ट, जाणून घ्या

महिलांमध्ये कर्करोग टेस्ट का आवश्यक आहे?
cancer
cancersakal
Updated on

कॅन्सर हा असा आजार आहे की तो लवकर ओळखला तर तो पूर्णपणे टाळता येतो. बहुतांश महिलांची कर्करोगाची टेस्ट वेळेवर होत नाही, त्यामुळे त्यांना मृत्यूला सामोरे जावे लागते. डब्ल्यूएचओच्या मते, स्तन आणि गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हे महिलांमधील टॉप 4 कर्करोग आहेत ज्यांमुळे बहुतेक महिलांचा मृत्यू होतो.

सप्टेंबर महिना स्त्रीरोग कर्करोग जागरूकता महिना म्हणून साजरा केला जातो. याचाच अर्थ समाज आणि महिलांमध्ये जागरूकता निर्माण झाली तर प्रजनन आरोग्याशी निगडीत कर्करोग सहज टाळता येऊ शकतात. यासाठी काही टेस्ट वेळेवर कराव्या लागतात. याच्या मदतीने कर्करोगाचा प्राथमिक अवस्थेत शोध लावता येतो.

महिलांमध्ये कर्करोग टेस्ट का आवश्यक आहे?

इंडियन एक्स्प्रेसच्या बातमीनुसार, प्रत्येक महिलांनी नियमितपणे स्त्रीरोगविषयक टेस्ट केल्या पाहिजेत. यामुळे कॅन्सर वेळेआधी ओळखला जाईल आणि मग हा आजार सहज टाळता येईल. दुसरीकडे, एचपीव्हीचा धोका देखील कळेल.

महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासाठी एचपीपी जबाबदार आहे. एक HPV लस देखील आहे जी प्रत्येक स्त्रीने घ्यावी. नियमित तपासणी करून, प्रजनन आरोग्य चांगले राहते आणि एकंदर आरोग्य चांगले राहते. आता जाणून घेऊया कोणत्या 7 कॅन्सर चाचण्या आहेत ज्या प्रत्येक महिलेने कराव्यात.

cancer
Fake Dry Fruits : खरे की बनावटी, तुम्ही कोणते ड्राय फ्रूट्स विकत घेताय हे कसं कळेल? इथे वाचा ट्रिक

या कर्करोगाच्या टेस्ट प्रत्येक स्त्रीसाठी आवश्यक आहेत

1. पॅप स्मीअर- प्रजनन आरोग्य नेहमी सुधारण्यासाठी, प्रत्येक स्त्रीने नियमितपणे पॅप स्मीअर टेस्ट केली पाहिजे. 21 ते 65 वर्षे वयोगटातील प्रत्येक महिलेने तीन वर्षांतून एकदा पॅप स्मीअर टेस्ट करणे आवश्यक आहे. याच्या मदतीने प्रजनन अवयवातील कर्करोग लवकर ओळखला जाईल.

2. एचपीव्ही टेस्ट- ह्यूमन पॅपिलोमाव्हायरस गर्भाशयाच्या मुखातील कर्करोगासाठी सर्वात जास्त जबाबदार आहे. या विषाणूच्या हल्ल्यामुळे प्रजनन अवयवांच्या पेशींमध्ये बदल होऊ लागतात. ही चाचणी वयाच्या 25 वर्षांनंतर केली जाते. सामान्यतः HPV चाचणी पॅप स्मीअरसोबत केली जाते. याद्वारे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग टाळता येतो.

3. कोल्पोस्कोपी- पॅप स्मीअरमध्ये काही समस्या असल्यास डॉक्टर कोल्पोस्कोपीची शिफारस करतात. यामध्ये, सर्विक्सच्या आतील गोष्टी अतिशय बारकाईने पाहिल्या जातात ज्यामध्ये कर्करोगाचे जखम ओळखले जातात.

4. ट्रान्सव्हॅजिनल अल्ट्रासाऊंड- ट्रान्सव्हॅजिनल अल्ट्रासाऊंडचा वापर स्त्रीच्या शरीरातील अनेक भागांमध्ये कर्करोगाच्या पेशी शोधण्यासाठी केला जातो. याद्वारे, श्रोणि, अंडाशय आणि गर्भाशयात होणारे धोकादायक कर्करोग ओळखले जातात.

5. BRCA जेनेटिक टेस्टिंग - यामध्ये, BRCA1 आणि BRCA2 जनुके ओळखली जातात. हे दोन्ही जीन्स स्तन आणि अंडाशयाच्या कर्करोगासाठी जबाबदार आहेत.

6. CA-125 ब्लड टेस्ट- CA-125 ब्लड टेस्ट वयाच्या 30 वर्षांनंतर केली जाते. यामध्ये CA-125 प्रोटीन आढळून आले आहे. रक्तात त्याचे प्रमाण वाढल्यास गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका असतो.

7. एंडोमटेरियल टिश्यू टेस्ट - यामध्ये एंडोमटेरियल पेशींमध्ये कोणत्याही प्रकारचे दोष आढळून येतात. यामुळे गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका असतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.