Expensive Saree : हजारोंपासून लाखांच्या घरात आहेत किंमती, भारतातली सर्वात महाग साडी कोणती ?

अनेक महिने काम केल्यानंतर एक साडी बनते, म्हणून तर खास आहेत या साड्या
Expensive Saree
Expensive Sareeesakal
Updated on

Expensive Saree :

मराठी कलाकारांनी त्यांच्या कलेतून इतर कलाकारांचाही गौरव केला आहे. आता हेच बघा ना, महिला वर्गात लोकप्रिय असलेली पैठणी तिच्यावर असलेला मोर हे आठवलं की, पदरावरती जरदारीचा मोर नाचरा हवा, हे गाणं तोंडात येतच. केवळ पैठणीच नाही तर अनेक साड्या आज महिलांच्या मनावर राज्य करत आहेत.

लग्नात आईला पैठणी अन् लेकीला कांजीवरम, तर काकू अन् मावश्यांना एक सारख्या, पटोला सिल्क, बनारसी अशा साड्यांची खरेदी केली जाते. मार्केटमध्ये कितीही व्हरायटी आल्या तरी एखादी बनारसी, एखादी खरी पैठणी साडी कपाटात असावीच असं वाटतं.

कांजीवरमपासून बनारसी, कासवू, पटोला साड्या सुंदर आणि महागही आहेत. या साड्यांची किंमत ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण खरंच या साड्या Original हव्या असतील तर नवरोबांच्या खिशाला भुर्दंड बसणार आहे.

Expensive Saree
Navratri Saree Look : नवरात्रीत ट्राय करा एकापेक्षा एक भारी साड्या

बनारसी साडी

बनारसमध्ये बनारसी साड्या तयार केल्या जातात. बनारसी साड्यांवर सोन्या-चांदीच्या धाग्यांचे नक्षीकाम केले जाते, त्यामुळे त्यांची किंमत वाढते. बनारसी साड्या प्युअर सिल्कच्या मानल्या जात असल्या तरी सिल्क व्यतिरिक्त ऑर्गेन्झा आणि जॉर्जेटमध्येही बनारसी साड्या उपलब्ध आहेत.

मारवाडी आणि बंगाली कुटुंबात मुलींची लग्ने बनारसी साडीतच केली जातात. प्युअर बनारसी साडी हवी असेल तर ती बनवायला एक महिना लागतो. बनारसी साड्यांची किंमत सुमारे 4,000 रुपयांपासून सुरू होते आणि सहज 5 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते.

बनारसी साड्यांची किंमत सुमारे 4,000 रुपयांपासून ते 5 लाख
बनारसी साड्यांची किंमत सुमारे 4,000 रुपयांपासून ते 5 लाख
Expensive Saree
Saree Designs : बार्बीची क्रेझ वाढली! तुम्हालाही साडीत बार्बी लुक हवाय? मग या स्टायलिंग टिप्स करा फॉलो

कांजीवरम साडी

कांजीवरम साडी विणलेल्या रेशमापासून बनविली जाते, जी फक्त कांजीवरम प्रदेशात आढळते. कांजीवरम साड्या त्यांच्या तेजस्वी रंग आणि टेक्सचरमुळे जगप्रसिद्ध आहेत. या साड्यांवर फुलांचा, चेक, पट्टे आणि मंदिरांच्या कळसाची रचना केली जाते.

या साडीची खास गोष्ट म्हणजे तिचा पल्लू, बॉर्डर आणि मधली पट्टी वेगवेगळी तयार करून नंतर जोडली जाते. रॉयल लुक देणाऱ्या कांजीवरम साड्यांची किंमत 12 हजार ते 5 लाख रुपयांपर्यंत आहे.

कांजीवरम साड्यांची किंमत 12 हजार ते 5 लाख रुपयांपर्यंत
कांजीवरम साड्यांची किंमत 12 हजार ते 5 लाख रुपयांपर्यंतesakal
Expensive Saree
Saree Patterns : गिरीजाच्या साड्या फूल क्लासी, बायका करतात फॅशनची कॉपी

पटोला साडी

पटोला साड्या चमकदार रंगांमुळे खूप वेगळ्या आणि सुंदर दिसतात. यांवर भौमितिक डिझाईन्स आहेत. ते केवळ गुजरातमध्येच बनवले जातात. शुद्ध सिल्कपासून बनवलेल्या या साड्या गुजराती नववधूंच्या वॉर्डरोबचा एक महत्त्वाचा भाग आहेत. पटोला साड्यांची खास गोष्ट म्हणजे या साड्या अनेक वर्षांनंतरही नवीन दिसतात. पटोला साडीची किंमत 3,000 ते 1 लाख रुपयांपर्यंत आहे. ही एक साडी तयार व्हायला अनेक महिने लागतात.

Expensive Saree
Amruta's Saree : अमृताची साडी चॉईस लई भारी, बघा तिच्या भारी साड्या
पटोला सिल्कची किंमत 3,000 ते 1 लाख रुपयांपर्यंत
पटोला सिल्कची किंमत 3,000 ते 1 लाख रुपयांपर्यंतesakal

कासवू साडी

कासवू साडी प्लेन ऑफ व्हाईट कलरमध्ये असून तिला गोल्डन कलर बॉर्डर आहे. त्याला सेतू साडी असेही म्हणतात. रॉयल कासवू साडीतील ही सोनेरी बॉर्डर खऱ्या सोन्याच्या धाग्यापासून बनवली आहे. ही सोनेरी बॉर्डर ही साडी अनोखी आणि महागडी बनवते.या साडीची किंमत 5,000 रुपयांपासून ते 5-6 लाखांपर्यंत आहे.

कासवू साडी - किंमत 5 ते 6 लाख
कासवू साडी - किंमत 5 ते 6 लाखesakal

पैठणी साडी

ही हाताने विणलेली सिल्क साडी आहे, जी मूळची औरंगाबादमध्ये बनवली जाते. त्याची जरी बॉर्डर, कलाकुसर आणि मोराची रचना या साडीला शोभिवंत लुक देतात. पैठणी साडीची किंमत कापड आणि विणकामामुळे जास्त आहे. त्याचे विणकाम पर्शियन गालिच्याप्रमाणे केले जाते आणि म्हणूनच ही साडी महाग आहे. ही एक हेयरलूम साडी आहे, तिची किंमत 8-10 हजार रुपयांपासून सुरू होते आणि अनेक लाखांपर्यंत जाते.

Expensive Saree
Celebrity Saree Look: सणासुदीच्या काळात सेलिब्रिटींचा स्टायलिश साडी लुक ट्राय करा अन् दिसा एकदम हटके
पैठणी साडीची किंमत लाखोंच्या घरात आहे
पैठणी साडीची किंमत लाखोंच्या घरात आहेesakal

मुगा सिल्क साडी

मुगा सिल्क साडी आसाममध्ये बनवली जाते. या साड्या उत्तम दर्जाच्या सिल्कपासून बनवल्या जातात. हे रेशीम किडे प्रामुख्याने दोन विशेष पानांवर वाढतात. त्यापासून तयार होणार्‍या रेशीमचा दर्जा सर्वोत्तम आणि अद्वितीय मानला जातो.

मुगा सिल्क साडीचा पोत चमकदार आणि टिकाऊ आहे. या साड्यांचे सोनेरी धागे फक्त आसाममध्येच आढळतात. मुगा सिल्क साड्यांची किंमत 2,000 रुपयांपासून ते 2 लाख रुपयांपर्यंत असू शकते.

मूगा सिल्क साडी- किंमत 2 लाख पर्यंत
मूगा सिल्क साडी- किंमत 2 लाख पर्यंतesakal

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()