Expensive Wedding Story : कोणी सोन्याची बिस्कीटे वाटली, तर कोणी स्क्रीनची पत्रिका, ही आहेत भारतातली महागडी अन् चर्चेतली लग्न!

भारतात यांच्या लग्नातही झालाय पाण्यासारखा पैसा खर्च, ती लग्न आजही आहेत चर्चेत
Expensive Wedding Story
Expensive Wedding Storyesakal
Updated on

Expensive Wedding Story :

भारतात दर दिवशीच लग्नाचा मुहूर्त गाठला जात आहे. मराठी कलाकार असोत वा मोठ्या बिझनेसमनची मुलं दररोज एकाचा बार वाजत आहेत. यातील काहीजण मराठी चित्रपटसृष्टीतील आहेत. तर काही लोक बॉलिवूडमधील कलाकार आहेत. पण या सगळ्या विवाहांच्या यादीत काही लग्न अशी आहेत. जी नेहमी चर्चेत येतील.

आज आपण मुलांच्या लग्नात अफाट खर्च केलेल्या, ज्यांच रॉयल लग्न झालं अशा काही जोड्या पाहणार आहोत. ज्यांची लग्न अनेक पिढ्यांमध्ये चर्चेत राहणार आहे. अशा कोणत्या जोड्या आहेत अन् त्यांच्याटॉ

Expensive Wedding Story
Shivani Surve Wedding Post : 'शिवानी' अन् 'अजिंक्य'चं लग्न म्हटल्यावर चर्चा तर होणारच, इंस्टावरील नव्या पोस्टनं वेधलं लक्ष!

अंबानीच्या घरचं 700 कोटीचं लग्न

भारतातील सर्वात महागड्या लग्नांबद्दल बोलायचे तर, देशातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांनी 2016 मध्ये त्यांची मुलगी ईशा अंबानीच्या लग्नात पाण्यासारखा पैसा ओतला होता. ज्यामध्ये 700 कोटींहून अधिक पैसे खर्च झाले होते. ईशा अंबानीच्या लग्नपत्रिकेसोबत सोन्याची नाणी देण्यात आली होती. हा विवाह अँटिलिया येथे झाला होता.  

उदयपूरचा राजवाडा यासाठी बुक करण्यात आला होता, ज्यामध्ये जगप्रसिद्ध गायिका बियॉन्सेला परफॉर्म करण्यासाठी आली होती. ज्यासाठी तिला करोडो रुपये देण्यात आले होते. या भव्य विवाह सोहळ्यासाठी देशातील आणि जगातील अनेक लोकांना आणण्यासाठी 100 चार्टर्ड विमानांची व्यवस्था करण्यात आली होती.

ज्यामध्ये हिलरी क्लिंटन, निक जोनास, प्रियांका चोप्रा आदींच्या नावांचा समावेश आहे. याशिवाय 5100 लोकांना अन्नदान करणे इत्यादी अनेक कार्यांवर खूप पैसा खर्च झाला. ईशा अंबानीने आनंद पिरामलशी लग्न केले.   

Expensive Wedding Story
Best Wedding Destinations : 'डेस्टिनेशन वेडिंग'चा विचार करताय? मध्य प्रदेशातील ही ठिकाणं आहेत बेस्ट

सुब्रतो रॉय यांच्या घरचं लग्न

सहाराचे प्रमुख सुब्रतो रॉय यांनी आपल्या दोन्ही मुलांची लग्ने एकत्र केली होती. 2004 मध्ये सुशांतो रॉयने रिचा आहुजासोबत आणि सीमांतो रॉयने चांदनी तूरसोबत लग्न केले. ज्यासाठी सहारा टाउनशिप लखनौला वधूप्रमाणे सजवण्यात आले होते. या लग्नात सुब्रतो यांनी पैसा खर्च करताना कुठलाही पुढचा मागचा विचार केला नव्हता. त्यामुळेच हे महागडे लग्न ठरले होते.

अंदाजे 75 लाख अमेरिकन डॉलर्स म्हणजेच 550 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करण्यात आला. पाहुण्यांना आणण्यासाठी तैनात केलेल्या चार्टर्ड विमानांमध्ये सोन्याचे रुमाल होते. या लग्नात प्रसिद्ध ब्रिटिश सिम्फनी ऑर्केस्ट्राचा लाईव्ह परफॉर्मन्स होता. प्रसिद्ध कोरिओग्राफर शामक दावर यांच्या नृत्याचा कार्यक्रमही झाला.

या लग्नात 100 हून अधिक स्वादिष्ट पदार्थ तयार करण्यात आले होते. 11,000 पाहुण्यांव्यतिरिक्त, 1.5 लाख गरीब लोकांनाही जेवण देण्यात आले. याशिवाय सुब्रतो यांनी 101 गरीब मुलींची लग्नेही लावली होती. 

Expensive Wedding Story
Anant-Radhika Wedding: अनंत-राधिकाचा प्री-वेडिंग सोहळा जामनगरमध्येच का? पंतप्रधान मोदी आहेत कारण

जनार्दन रेड्डी यांच्या मुलीचे लग्न

नोटाबंदीनंतर 2016 मध्ये कर्नाटकचे मंत्री जनार्दन रेड्डी यांच्या मुलीचे लग्न अनेक दिवस चर्चेचा विषय राहिले. जनार्दन यांची मुलगी ब्राह्मणी आणि राजीव रेड्डी यांच्या लग्नात पाण्यासारखा पैसा खर्च झाला. या लग्नासाठी 50,000 पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले होते. लग्नपत्रिका एलसीडी स्क्रीनची देण्यात आली होती. या खास लग्नपत्रिकांमध्ये चांदीच्या गणेशमूर्तीचाही समावेश करण्यात आला होता.

या लग्नावर 500 कोटींहून अधिक खर्च झाला होता. पाच दिवस चालणाऱ्या या लग्नात पाहुण्यांसाठी पंचतारांकित आणि थ्री स्टार हॉटेल्समधील 1500 हून अधिक खोल्या बुक करण्यात आल्या होत्या. लग्नाच्या ठिकाणी 3000 सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले होते.

वधूने 17  कोटींची कांजीवरम साडी परिधान केली होती. तिने ९० लाखांचे दागिने घातले होते. 50 हून अधिक प्रसिद्ध मेकअप आर्टिस्टना बोलावण्यात आले होते.

३० एकरात पसरलेल्या या लग्नाच्या ठिकाणी बॉलिवूडचे अनेक सेट लावण्यात आले होते. जनार्दन रेड्डी यांनी आपल्या मुलीच्या लग्नात देशातील अनेक प्रसिद्ध लोकांना आमंत्रित केले होते. त्यांच्या वाहतुकीसाठी 15 हेलिकॉप्टर आणि 2000 कार तैनात करण्यात आल्या होत्या.  

Expensive Wedding Story
Anant-Radhika Wedding: अनंत-राधिकाचा प्री-वेडिंग सोहळा जामनगरमध्येच का? पंतप्रधान मोदी आहेत कारण

लक्ष्मी निवास मित्तल यांची भाची आणि मुलीचे लग्न

स्टील किंग म्हणून ओळखले जाणारे देशातील सर्वात मोठे उद्योगपती लक्ष्मी निवास मित्तल यांची भाची सृष्टी मित्तल हिने 2013 मध्ये Investment बँकर गुलराज बहलसोबत लग्न केले होते. या लग्नातही 500 कोटींहून अधिक खर्च झाला होता.

या जोडप्याने 60 किलोचा केक कापला होता. या लग्नामध्ये भारत आणि थायलंडमधून 200 शेफ, बटलर आणि असिस्टंटना स्पेनला बोलावण्यात आले. भारतातील सर्वात महागड्या लग्नांपैकी एक असलेल्या या लग्नात केवळ 500 पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले होते.

परंतु पाहुण्यांकडून एका गोपनीय करारावर स्वाक्षरी देखील करण्यात आली होती. ज्यामध्ये लग्नाची कोणतीही माहिती लीक होऊ नये, असे लिहिले होते. नंतर अनेक गोष्टींचे व्हिडिओ लीक झाले आणि हे लग्न खूप चर्चेचा विषय बनले.

लक्ष्मी निवास मित्तल यांनी त्यांची मुलगी वनिषा मित्तलच्या लग्नावर 350 कोटींहून अधिक खर्च केला होता. वनिशाचे लग्न अमित भाटियासोबत झाले होते. 2004 मध्ये झालेल्या या लग्नाचे आयोजन फ्रान्समध्ये करण्यात आले होते. ज्यामध्ये शाहरुख खान, सैफ अली खान, ऐश्वर्या राय, राणी मुखर्जी आणि जुही चावला आदी बॉलिवूड स्टार्सनी परफॉर्म केले. फराह खानने याचे नृत्यदिग्दर्शन केले होते.

Expensive Wedding Story
Anant Radhika Pre Wedding : अनंत-राधिकाच्या प्रीवेडिंग! मुंबई इंडियन्सचा 'माजी' कर्णधार रोहितही पोहचला जामनगरमध्ये

जेव्हा मुलीच्या लग्नात हेलिकॉप्टर दिले होते

2011 मध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कवर सिंह यांचा मुलगा सुखबीर सिंह जौनपुरिया याने आपली मुलगी योगिता हिच्या लग्नात पैशांचा पाऊस पाडला होता. हे लग्न जौनपूर गावात झाले असले तरी लोकांसाठी हा एक संस्मरणीय विवाह होता, ज्यामध्ये 15,000 लोकांना आमंत्रित करण्यात आले होते.

सुखबीर यांनी आपल्या मुलीला हेलिकॉप्टर भेट दिले होते. याशिवाय २१ कोटी रुपये आणि अनेक महागड्या वस्तू देण्यात आल्या. चांदीच्या बिस्किटांचेही वाटप करण्यात आले. आठवडाभर चाललेल्या या विवाह सोहळ्यात उपस्थितांना 30 ग्रॅम सोन्याची बिस्किटे भेट म्हणून देण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.