घरबसल्या अनुभवा साहसी पर्यटन; विशेष मालिकेत पाहा आतापर्यंत न पाहिलेली ठिकाणे

आतापर्यंत फारशी प्रसिद्ध नसलेली ठिकाणे यात दाखवली जाणार असून तेथे जाऊन साहसी पर्यटन करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन दिले जाणार आहे.
tourism
tourismgoogle
Updated on

मुंबई : महाराष्ट्रीय नागरिकांमध्ये साहसी पर्यटनाची आवड निर्माण करत महाराष्ट्राला साहसी पर्यटनाचे केंद्र बनवण्यासाठी पर्यटन संचालनालयाने Travelxpवर एक विशेष मालिका सुरू केली आहे. यात आतापर्यंत प्रकाशात न आलेली ठिकाणे आणि थरारक खेळ पाहायला मिळत आहेत. ३० एप्रिलपासून ही मालिका सुरू करण्यात आली असून रात्री ८ वाजता तिचे प्रक्षेपण केले जाते. ही मालिका Travelxp TV channel network आणि OTT platform येथे उपलब्ध आहे.

tourism
करिअर अपडेट : साहसी पर्यटन

३० मिनिटांचे ८ भाग आणि १० मिनिटांचे ४ भाग अशी ही मालिका विभागण्यात आली आहे. त्यामुळे शनिवारी आणि रविवारी घरबसल्या साहसी पर्यटनाचा अनुभव घेता येणार आहे. आतापर्यंत फारशी प्रसिद्ध नसलेली ठिकाणे यात दाखवली जाणार असून तेथे जाऊन साहसी पर्यटन करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन दिले जाणार आहे.

भव्य पर्वतरांगा, खळाळणारे नदीचे प्रवाह, धडकी भरवणाऱ्या समुद्राच्या लाटा यांमुळे महाराष्ट्रातील निसर्ग हा साहसी पर्यटनासाठी अनुकूल आहे. गिर्यारोहण, पॅराग्लायडिंग, पॅरासेलिंग, स्नॉर्केलिंग, इत्यादी कितीतरी साहसी खेळ येथे अनुभवता येतात.

tourism
Adventure in Mahabaleswar | साहसी खेळांसाठीही प्रसिद्ध आहे महाबळेश्वर

या मालिकेत आंतरराष्ट्रीय दूरचित्रवाणी सादरकर्त्या रेन ब्राउन यांचे महाराष्ट्राला भेट देण्याचे स्वप्न अखेर पूर्ण होणार आहे. त्या इथे येऊन भारतीय अभिनेत्री क्रिसन बॅरेटोला भेटतील. बॅरेटो या मूळच्या महाराष्ट्रातील असून रस्तेमार्गे प्रवास करणे हा त्यांचा छंद आहे.

या दोघी महाराष्ट्रातील सर्वोच्च ठिकाण असलेले कळसूबाई शिखर पादाक्रांत करतील. तसेच स्वादिष्ट कोल्हापुरी जेवणाचा आस्वाद घेतील. बंजी जम्पिंगचा थरार अनुभवतील आणि गुहागर चौपाटीवर विश्रांती घेतील. श्री कोपेश्वर मंदिर, मेळघाट वन्यजीव अभयारण्य, दौलताबादचा किल्ला, ताडोबा राष्ट्रीय उद्यान, इत्यादी विविध ठिकाणची सफर या मालिकेच्या माध्यमातून घडवली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.