बायकोने नवऱ्याच्या नकळत त्याचा फोन बघणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या

नवरा बायकोच्या नात्यात एकमेकांवरचा विश्वासही महत्वाचा असतो
checking phone
checking phone
Updated on

नवरा बायकोच्या नात्यात प्रेम असेल तर त्यांच्यातील संबंध अधिक गहिरे होतात. पण एकमेंकावरचा विश्वासही (Trust) महत्वाचा ठरतो. तुमचे लव्ह मॅरेज असो वा ठरवून केलेले असो, जर दोघांच्यात विश्वासच कमी असेल तर अनेक गोष्टी तुमच्यातले नाते (Relationship) कमी करू शकतात. त्यामुळे वैवाहिक जीवनात (Marriage)असुरक्षितता वाटत असेल तर तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या अत्यंत वैयक्तिक गोष्टी पाहण्यात कमीपणा वाटत नाही. नवरा जरा वेगळा वागायला लागलाय, असं जर बायकोला वाटलं तर ती पहिला त्याचा फोन (Phone) बघण्याचा प्रयत्न करते. त्या फोनमधून त्याच्याबद्दल तिला माहिती मिळणार असते. पण असे फोन बघण्याने नेमके काय साध्य होते?

checking phone
जोडीदाराशी भांडण्याची योग्य पद्धत कोणती? जाणून घ्या

तज्ज्ञ सांगतात...(Expert Says)

रिलेशनशीप एक्सपर्ट शाहजीन शिवदासानी म्हणतात की, नवऱ्याचा फोन त्याच्या परनवागीशिवाय तपासणे हे चुकीचे आहे. असे करणे म्हणजे त्याच्या गोपनीयतेचे उल्लंघन करण्यासारखे आहे. पण जर तुमच्या दोघांचा एकमेकांच्या नात्यावरील विश्वास कमी झाला असेल तर तुम्ही नवऱ्यावर पुन्हा विश्वास ठेवू शकता का हे पाहण्यासाठी त्याचा फोन तपासणे चुकीचे नाही. कारण अशा प्रकारे नात्यातील विश्वास आणि सुरक्षितता पुन्हा निर्माण केली जाऊ शकते. मात्र, या काळात असे करणे ही सवय होता कामा नये हे मात्र लक्षात ठेवा.

checking phone
रात्री मुली मोबाइलवर काय सर्च करतात? चार गोष्टी आहेत फेव्हरेट

जर तुम्हाला त्याच्या फोनमध्ये काही आक्षेपार्ह आढळले नाही तर तुमच्या नात्याला कोणताही धोका नाही, असे समजावे. पण त्यानंतरही तुम्ही नवऱ्याचा फोन गुपचू तपासत असाल तर त्याचे वाईट परिणाम तुम्हाला येणाऱ्या काळात भोगावे लागू शकतात. समजा तुमच्या नवऱ्याला ही गोष्ट कळली, तर त्याला वाईट तर वाटेलच शिवाय तुमचा त्याच्यावर विश्वास नाही असे वाटेल. तो दुखावलाही जाऊ शकतो.

checking phone
लग्नानंतर अनेक वर्षांनी नवरा-बायको विभक्त का होतात? जाणून घ्या कारणे
couple
couple

या गोष्टी लक्षात ठेवा (Keep In Mind)

तुमच्या नवऱ्याचा फोनमध्ये लॉक नसले तर त्याच्यावर संशय घेण्याचे काहीच कारण नाही. कारण फसवणाऱ्या व्यक्तीचे वागणे बदलू लागते. तो वारंवार तुम्हाला त्याच्या फोनला स्पर्श न करण्यास सांगत असेल तर, याचा अर्थ तो तुमच्यावर प्रेम करत नाही असा होत नाही. असे अनेकदा होते की, नवर्याच्या फ्रेंड सर्कलमध्ये अशा गोष्टी शेअर होतात की, ज्या कधी-कधी बायकोला सांगणेही कठीण जाते. जर नवऱ्याने असे तुमच्याबाबतीत केले तर तुम्हाला कसे वाटेल याचा विचार करा. नात्यात प्रेमापेक्षा विश्वास जास्त असायला हवा असं म्हणतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही तुमच्या नवऱ्याचा फोन वारंवार तपासत असाल तर इच्छा नसतानाही तुमच्या नात्यात शंका निर्माण होतील.

checking phone
नवरा-बायकोमधील किरकोळ वादाला गांभीर्यानं घेऊ नका; होऊ शकतात पाच फायदे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.