Experts Tips In Periods : महिलांना दर महिन्यासा मासिक पाळीच्या त्रासाला सामोरे जावे लागते. काही महिलांना मासिक पाळी अगदी सहज येते तर काहींना तीव्र क्रॅम्प्स, पोटात गॅस, मळमळ आणि मासिक पाळीत जास्त रक्तस्त्राव यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. मासिक पाळीत हे त्रास सामान्य वाटत असले तरी त्यामागे बरीच कारणं असू शकतात. शरीरातील वात दोषाचे असंतुलन हे देखील याचे प्रमुख कारण असू शकते. तेव्हा या काळात सैल कपडे घालण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
अशा परिस्थितीत महिलांनी मासिक पाळीत फेंट रंगाचे आणि सैल कपडे घालावेत असा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देतात. पण असे का होते हे जाणून घेण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केला आहे का? आयुर्वेदिक फिजिशियन आणि थायरॉईड तज्ज्ञ डॉ. अलका विजय यांनी त्यांच्या एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये यासंबंधी महत्त्वाची माहिती शेअर केली आहे. या लेखात, आम्ही तुम्हाला याबद्दल तपशीलवार सांगत आहोत.
मासिक पाळीत फिकट रगाचे आणि सैल फिटिंगचे कपडे घालण्याची कारणे
डॉ. अलका यांच्या म्हणण्यानुसार, "मासिक पाळी म्हणजे महिलांच्या शरीरात वात-पित्त दोष वाढण्याची वेळ. वातदोषाच्या अधिक वाढल्यामुळे मासिक पाळीच्या वेळी 'रक्तस्त्राव' होण्याची प्रक्रिया सुरू होते. तर पित्तदोषाच्या अधिक वाढल्याने रक्तस्त्राव होतो. यामुळे खात्री होते की शरीरात पुरेशी उष्णता असते, ज्यामुळे तुम्हाला काही लक्षणे दिसतात जसे की,
ओटीपोटात दुखणे / वेदना / अस्वस्थता
शरीरात उष्णता वाढणे
काही महिलांना थंडी वाजणे
मन अस्थिर राहणे आणि थकवा जाणवतो.
महिलांना या काळात आराम करायला आवडते.
अशावेळी हलक्या रंगाचे सैल कपडे परिधान केल्यास वातदोष वाढण्यापासून टाळण्यास मदत होते. यामुळे पीरियड्सची लक्षणे कमी होतात आणि अनेक फायदेही होतात. (Health)
मासिक पाळीत फिकट आणि सैल कपडे घालण्याचे फायदे
स्नायूंना विश्रांती मिळते
मन शांत राहते
मूड सुधारतो
आनंदी विचारांना प्रोत्साहन दिले जाते
शरीरातील अतिरिक्त उष्णता चांगल्या प्रकारे काढून टाकण्यास मदत करते. (Period Tips)
वाचा तज्ज्ञांचा सल्ला
जर तुम्हाला मासिक पाळी दरम्यान गंभीर लक्षणे दिसली तर फिट्ट आणि गडद रंगाचे कपडे घालणे टाळा कारण ते शरीरात उष्णता वाढवतात. विशेषतः, नितंबांभोवती घट्ट बसणारे कपडे घालणे आवर्जून टाळा. त्याऐवजी हलक्या रंगाचे सैल कपडे घाला आणि निरोगी राहा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.