DIY Eye Mask : डार्क सर्कल कमी करण्यासाठी घरीच बनवा मास्क, तज्ज्ञांकडून जाणून घ्या पद्धत

eye care tips : अनेक जण मेकअपने ते लपवण्याचा प्रयत्न करतात, तर काहीजण पार्लरमध्ये जाऊन उपचार करताना दिसतात.
Eye Mask
Eye Masksakal
Updated on

प्रत्येकाला डार्क सर्कलची समस्या असते. कारण आजच्या जीवनशैलीमुळे आणि कामाच्या वाढत्या दबावामुळे अनेक वेळा आपली झोप पूर्ण होत नाही. याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो, त्यामुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे दिसतात. अनेक जण मेकअपने ते लपवण्याचा प्रयत्न करतात, तर काहीजण पार्लरमध्ये जाऊन उपचार करताना दिसतात.

परंतु आपण घरी देखील उपचार करू शकता. शेफ स्नेहाने तिच्या इंस्टाग्रामवर ही पद्धत शेअर केली आणि घरी आय मास्क कसा बनवायचा आणि वापरायचा हे सांगितले. याशिवाय फायद्यांबाबतही माहिती दिली. चला तर मग जाणून घेऊया.

आय मास्क तयार करण्यासाठी लागणारे साहित्य

  • कॉफी - 1 टीस्पून

  • मध - 1 टीस्पून

  • पाणी - अर्धा चमचा

  • एलोवेरा जेल- 1 टीस्पून

आय मास्क कसा बनवायचा

हे बनवण्यासाठी तुम्हाला एका बाऊलमध्ये कॉफी पावडर घ्यावी लागेल.

आता त्याच प्रमाणात मध आणि एलोवेरा जेल टाका.

थोडे पाणी घालून त्याची पेस्ट तयार करा.

यानंतर डोळ्यांखालील भागावर लावा.

सुमारे 10 मिनिटे तसेच ठेवा.

नंतर ते पाण्याने स्वच्छ करा आणि मऊ टॉवेलने त्वचा स्वच्छ करा.

जर तुम्ही हे आठवड्यातून 3 वेळा लावले तर तुमच्या डार्क सर्कलची समस्या कमी होईल.

Eye Mask
Eye Care : मोबाईल लॅपटॉपवर तासंतास काम करून डोळ्यांचं आरोग्य बिघडलंय? सुरक्षेसाठी करा हे उपाय

आय मास्क लावण्याचे फायदे

आय मास्क लावल्याने डार्क सर्कलची समस्या कमी होते.

तुम्ही डोळ्यांची सूज कमी करण्यासाठी देखील वापरू शकता. यासाठी तुम्ही ग्रीन टी चा आय मास्क वापरावा.

आय मास्क लावल्याने डोळ्यांना आराम मिळतो. यामुळे डार्क सर्कलची समस्याही कमी होते.

Eye Mask
Eye Care : मोबाईल लॅपटॉपवर तासंतास काम करून डोळ्यांचं आरोग्य बिघडलंय? सुरक्षेसाठी करा हे उपाय

तुमच्यासाठी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की आय मास्कचे फायदे आहेत. पण त्याचे तोटेही आहेत. त्यामुळे जर तुम्हाला ही समस्या खूप भेडसावत असेल तर एकदा तज्ञांचा सल्ला घ्यायला विसरू नका.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com