दिवाळीत उडवलेल्या फटाक्यांमुळे म्हणा किंवा कंपन्यांच्या धुरामुळे वातावरण अशुद्ध झाले आहे. सध्याची हवेची परिस्थिती बिकट आहे. दिल्लीसारख्या मोठ्या शहरात हे प्रमाण अधिक असलं तरी सांगली-कोल्हापूर पुण्यासारख्या शहरातही हवेचे मोठ्या प्रमाणावर प्रदुषण झालं आहे.
हवा दुषित झाल्याने लोकांना श्वसनाचे आजार तर होत आहेत. पण त्याचबरोबर डोळ्यात जळजळ, पाणी येण्याची समस्या घेऊन लोक रुग्णालयात दाखल होत आहेत. ही समस्या लहान मुले,तरूण आणि मोठ्या अशा सर्वांनाच या समस्येचा सामना करावा लागत आहे. (Eye Care Tips)