Eye Care Tips : डोळ्यांना दिसायचंच बंद झालंय? ही फळ परत करतील तुमची नजर, आजच खायला सुरूवात करा

डोळ्यांची काळजी असेल तर लाईफस्टाईलमध्ये करा हे बदल
eye care tips
eye care tipsesakal
Updated on

Eye Care Tips : वय वाढेल तसं आपले एक एक अवयव कमजोर होऊ लागतात. गुढगेदूखी, दृष्टी मंदावणे हे असे प्रकार सुरू होतात. आजकाल लोकांचे डोळे कमी वयात कमजोर होतात. याला अनेक कारणे असू शकतात, परंतु जीवनशैली ही मुख्यत्वे जबाबदार आहे.

तुमच्या आहारात आरोग्यदायी गोष्टींचा समावेश करून तुम्ही तुमचे डोळे निरोगी ठेवू शकता.डोळे निरोगी ठेवण्यासाठी आहारात बीटा कॅरोटीन, ओमेगा-३ फॅटी अॅसिड, झिंक, व्हिटॅमिन-सी आणि व्हिटॅमिन-ईयुक्त पदार्थांचा समावेश करा. चला तर मग जाणून घेऊया,

eye care tips
Eye Care Tips : आहारातून या पदार्थांची करा सुट्टी, तरच सुधारेल दृष्टी!

नजर कमजोर झालीय हे कसं ओळखावं?

कमकुवत दृष्टीमुळे, तुम्हाला सुरुवातीला अस्पष्ट दृष्टीच्या समस्येचा सामना करावा लागू शकतो. पण ही समस्या जसजशी वाढत जाते तसतशी तुमची लक्षणेही गंभीर होऊ लागतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका –

  1. वारंवार डोळे मिचकावणे

  2. अंधुक दिसणे

  3. गाडी चालवताना समोरच्या गोष्टी पाहण्यात त्रास होणे

  4. डोळ्यात पाणी येणे

  5. तीव्र डोकेदुखी

  6. दूरच्या गोष्टी नीट न पाहता येणे

  7. वाचताना पापण्या आकसणे

eye care tips
Child Eye Care Tips : सतत पडणारा मोबाईलचा प्रकाश मुलांच्या डोळ्यांसाठी घातक! तज्ज्ञ सांगतात...

दृष्टी सुधारण्यासाठी काय खावे

गाजर - गाजरमध्ये बीटा कॅरोटीन मुबलक प्रमाणात आढळते. जे शरीरात व्हिटॅमिन ए चा पुरवठा करते. हे पोषक तत्व डोळ्यांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. यामुळे दृष्टी सुधारते आणि रातांधळेपणा सारख्या आजारांपासून बचाव होतो.

पालक - पालकामध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन सारख्या कॅरोटीनॉइड्स भरपूर प्रमाणात असतात, जे अँटिऑक्सिडंट असतात जे दृष्टी सुधारण्यास मदत करतात. याशिवाय ते ऑक्सिडेटिव्ह तणावापासूनही डोळ्यांचे रक्षण करतात.

किवी - किवीमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक असल्याने ते रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते. ज्यामुळे तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकता. या फळामध्ये असलेले गुणधर्म डोळ्यांमध्ये कोलेजन उत्पादनास प्रोत्साहन देतात, ज्यामुळे डोळे निरोगी राहतात.

पपई - पपईमध्ये बीटा-कॅरोटीन, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते. जे डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये असलेले व्हिटॅमिन ई हे अँटिऑक्सिडेंट म्हणून काम करते, जे पेशींना ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण करते, तर बीटा-कॅरोटीन दृष्टी वाढवते.

संत्री - संत्री व्हिटॅमिन सीचा समृद्ध स्रोत आहे. जे डोळ्यांची दृष्टी वाढवते. हे ऑक्सिडेटिव्ह तणाव टाळण्यास देखील मदत करते. त्यामुळे तुम्ही संत्र्याला तुमच्या आहाराचा भाग बनवा.

रताळे - तुमचे डोळे निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात रताळ्याचा समावेश करू शकता. यामध्ये असलेले बीटा-कॅरोटीन हे रातांधळेपणा रोखण्यासाठी महत्त्वाचे मानले जाते.

eye care tips
Eye Care Tips: उन्हाची तीव्रता वाढतेय, डोळ्यांची काळजी घ्या

डोळ्यांची काळजी असेल तर लाईफस्टाईलमध्ये करा हे बदल

-तुमच्या डोळ्यांची वेळोवेळी तपासणी करा.

-तुमच्या डोळ्यांना अतिनील किरणांपासून वाचवण्यासाठी बाहेर जाताना सनग्लासेस वापरा.

-लॅपटॉप किंवा फोन वापरताना मध्येच ब्रेक घ्या.

- पुस्तक वाचताना चांगली प्रकाशयोजना ठेवा.

- समाविष्ट करा आहारात फळे आणि हिरव्या भाज्या.

- मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी वेळोवेळी डोळ्यांची तपासणी करून घ्यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.