Eye Care Tips: या ‘आठ’ सवयी बदलल्या तर तुमचे डोळे कधीच आजारी पडणार नाहीत!

डॉक्टर, मला कमी दिसायला लागलंय,असं म्हणायचं नसेल तर या गोष्टी करा!
Eye Care Tips
Eye Care Tipsesakal
Updated on

Eye Care Tips: शरीरातील सर्वात नाजुक आणि महत्वाचा अवयव म्हणजे डोळा! डोळ्याची नजर अबाधित राहावी आणि सध्याच्या या धावपळीच्या काळात डोळ्यांना कोणतीही दुखापत होऊ नये म्हणून आपण आपल्या परिने बरीच काळजी घेत असतो. पण तरिही सतत लॅपटॉप आणि संगणकासमोर बसून काम केल्याने आणि त्यानंतर मोबाईलचा अतिवापर केल्यामुळे त्याचे परिणाम दृष्टीवर होतातच.

एकदा दृष्टी कमजोर झाली की मग एकतर चष्मा सतत डोळ्यांवर ठेवून वावरावं लागतं आणि सोबतच डोळ्यांची तपासणी करण्यासाठी सतत डोळ्यांच्या दवाखान्यात फे-या घालाव्या लागतात.

म्हणूनच चष्मा लागण्याआधी किंवा दृष्टीवर परिणाम होण्याआधीच वैयक्तिक स्तरावर काळजी घेण्यासोबतच आपण काही घरगुती उपाय देखील करुन डोळ्यांना स्वस्थ ठेवू शकतो. खाली दिलेल्या काही टिप्स वापरुन तुम्ही डोळ्यांचे आरोग्य निरोगी ठेवू शकता.

Eye Care Tips
Eye care : स्क्रीन टाइम वाढल्याने दृष्टीशी संबंधित आजार होऊ शकतात का ?

नेत्ररोगतज्ज्ञ आणि नेत्रचिकित्सक डॉ. नीरज सांडुजा (MBBS, MS) यांच्या मते, इतर अवयवांप्रमाणे डोळ्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. आपले डोळे निरोगी आणि तीक्ष्ण ठेवण्यासाठी त्यांनी 8 गोष्टी करण्याचा सल्ला दिला आहे. ज्यामुळे डोळ्यांच्या 3 सामान्य समस्या देखील टाळता येतात.

फक्त डोळ्यांसाठी या गोष्टी करा

  • स्क्रीन टाइम कमी करा

  • जेव्हा आवश्यक असेल तेव्हा डोळ्यांसाठीचा सुरक्षात्मक चष्मा घाला.

  • डोळ्यांची स्वच्छता राखा

  • कॉन्टॅक्ट लेन्स स्वच्छ ठेवा

  • दररोज व्यायाम करा

  • नियमित डोळ्यांची तपासणी करा

  • दारू आणि धूम्रपान कमी करा

  • नेत्रतज्ज्ञांच्या सल्ल्याचे पालन करा

Eye Care Tips
Eye Care : स्क्रीनसमोर काम करत असाल तर डोळ्यांचे हे व्यायाम करा

तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही या 8 गोष्टी केल्या तर तुम्ही डोळ्यांच्या 3 सामान्य समस्या टाळू शकता. त्यापैकी एक म्हणजे, डोळे कोरडे होणे, दुसरे म्हणजे एलेर्जिक कंजंक्टिवाइटिस आणि वृद्धत्वामुळे डोळ्यांचे होणारे नुकसान होय. चला या समस्यांबद्दल तपशीलवार माहिती द्या.

Eye Care Tips
Eye Care : उन्हापासून डोळ्यांची अशी घ्या काळजी

डोळे कोरडे होणे

डोळ्यांचा हा आजार आता सगळ्याच लोकांमध्ये दिसू लागला आहे. यामध्ये डोले लाल होणे, ते कोरडे होणे. ही लक्षणे आढळतात. हा आजार टाळण्यासाठी हे टाळण्यासाठी, ब्लेफेराइटिस सारख्या संसर्गापासून डोळे दूर ठेवणे, वारा, धूळ, धूर इत्यादीपासून डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी चष्मा वापरणे, वारंवार डोळे मिचकावणे यासारख्या पावले उचलून आपण डिजिटल ताण कमी करू शकतो.

 

एलेर्जिक कंजंक्टिवाइटिस

धूळ आणि वारं डोळ्यांमध्ये गेल्याने ही समस्या सुरू होऊ शकते. हे टाळण्यासाठी तूम्ही चष्मा घालू शकता. तसेच, अँटीहिस्टामाइन्स आणि मास्ट सेल स्टेबिलायझर्स यामुळे होणारी अस्वस्थता दूर करू शकतात.

वय वाढल्याने नजर कमजोर होणे

ही समस्या 50 किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांमध्ये दिसून येते. त्यामुळे डोळयातील पडदा खराब होऊन दृष्टी धूसर होते. नंतर, प्रकाश पूर्णपणे जाऊ शकतो.

Eye Care Tips
Eye Care : तुम्हालाही आहे का सतत डोळे चोळण्याची सवय ? मग असा आहे धोका

यावर उपाय काय आहेत

  • एका अभ्याअंती असे सिद्ध झाले आहे की गुलाबजलचा वापर केल्याने आपली दृष्टी वाढण्यासही मदत होते. डोळ्यांना निरोगी ठेवण्यासाठी किंवा आराम देण्यासाठी तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने आठवड्यातून दोन ते तीन वेळा डोळ्यांत गुलाबजलाचे दोन ते तीन थेंब टाकू शकता.

  • बदामाच्या सेवनाने डोळ्यांची नजर देखील वाढते. युनाइटेड स्टेट डिपार्टमेंट ऑफ अॅग्रीकल्चरच्या रिसर्चनुसार बदामा मध्ये व्हिटॅमिन ‘ए’ मोठ्या प्रमाणात आढळते. तुम्ही दररोज दुधात बदामाची पुड टाकून त्याचे सेवन करू शकता.

  • आवळ्यातील अँटिऑक्सिडंट डोळ्यांचा पडदा निरोगी ठेवण्याचे काम करतात. डोळ्यांतील पडदा निरोगी राहिल्याने आपली दृष्टीदेखील चांगली राहण्यास मदत होते.

Eye Care Tips
Eye Care and Goggles : वाढत्या उन्हात स्वस्त गॉगल्स घेणं महागात पडू शकतं...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()