अनेकांना कमी वयातच हृदयविकार, मधुमेहासारख्या आजारांचा सामना करावा लागत आहे. हल्ली तरुण किंवा लहान मुलांमध्ये दृष्टी कमी होणं ही एक सामान्य समस्या बनली आहे. खराब जीवनशैली, जास्त टीव्ही पाहणं किंवा मोबाईल वापरणं ही त्याची प्रमुख कारणं असल्याचं मानलं जातं
डोळ्यांच्या आरोग्याचा विचार केला तर त्यात जीवनसत्त्वे महत्त्वाची भूमिका बजावतात. अशा परिस्थितीत आज आपण जाणून घेणार आहोत की ते कोणते व्हिटॅमिन आहेत ज्यांच्या कमतरतेमुळे दृष्टी कमजोर होते.
या जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे दूरदृष्टी होऊ शकते कमजोर
डोळ्यांच्या आरोग्यासाठी व्हिटॅमिन ए आवश्यक आहे. जर तुम्ही तरुण असाल आणि तुम्हाला दिसत नसेल तर त्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे व्हिटॅमिन ए ची कमतरता. व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे कॉर्निया जास्त कोरडा होतो. यामुळे तुमच्या डोळ्यात जळजळ होते. व्हिटॅमिन ए पुरेशा प्रमाणात मिळवण्यासाठी तुम्ही गाजर, पालक, पपई, लाल शिमला मिरची यांचा समावेश करू शकता. व्हिटॅमिन ए असलेल्या गोष्टींचा आहारात समावेश करा. जर तुम्ही पौष्टिक अन्नाचे सेवन केले नाही तर व्हिटॅमिन ए ची कमतरता होऊ शकते.
ही लक्षणं दिसत असतील तर समजा की तुमची नजर होतेय कमजोर
डोळ्यांना खाज येणे
लॅपटॉपवर जास्त वेळ काम केल्याने डोळ्यांवर ताण येऊ लागतो. अशा स्थितीत डोळ्यांना खाज सुटू लागते.
सकाळी उठल्यावर अस्पष्ट दिसणे
सकाळी उठल्यावर काही तासांसाठी अस्पष्ट दिसू शकते. अशा वेळी तुम्ही कितीही वेळा डोळे धुवा पण तरीही तुम्ही पूर्णपणे स्पष्टपणे पाहू शकत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.