Eyebrow : आयब्रो करताना 'या' गोष्टी केल्या तर होणारे वेदना आपोआप कमी होतील...

भुवयांना व्यवस्थित शेप करण्यासाठी आपण पार्लरमध्ये जातो.
Eyebrow
EyebrowEsakal
Updated on
Summary

डोळ्यांवरील भुवया हा विषय जितका नाजूक आहे तितक्याच भुवयासुद्धा नाजूक असतात. भुवयांची योग्य ती काळजी घेणे गरजेचे असते. भुवया हा चेहेऱ्यावरील सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आपल्या चेहेऱ्याच्या सुंदरतेत भर पाडण्यात भुवयांचे मोठं योगदान आहे. भुवयांचे केस वाढल्यावर त्या विचित्र दिसतात. 

आयब्रो केल्याने चेहेऱ्याला येणाऱ्या छान लूकमुळे ते करावेसे वाटतात, पण ते करताना होणाऱ्या वेदनेमुळे काही स्त्रियांना आयब्रो करणे म्हणजे मोठं संकटच वाटत.

 
आयब्रो केल्याने चेहेऱ्याला येणाऱ्या छान लूकमुळे ते करावेसे वाटतात, पण ते करताना होणाऱ्या वेदनेमुळे काही स्त्रियांना आयब्रो करणे म्हणजे मोठं संकटच वाटत.   Esakal
आयब्रो करताना जर तुम्हाला जास्त वेदना होत असतील. अश्यावेळी आयब्रो करण्यापूर्वी त्या भागावर बर्फाचा शेक द्यावा. जेणेकरून बर्फाने तुमची स्किन सुन्न पडेल व आयब्रो करताना तुम्हाला जास्त वेदना होणार नाहीत.      
आयब्रो करताना जर तुम्हाला जास्त वेदना होत असतील. अश्यावेळी आयब्रो करण्यापूर्वी त्या भागावर बर्फाचा शेक द्यावा. जेणेकरून बर्फाने तुमची स्किन सुन्न पडेल व आयब्रो करताना तुम्हाला जास्त वेदना होणार नाहीत.       Esakal
आयब्रो करताना जर तुम्ही प्लकर वापरत आहात. तर जुने किंवा गंजलेले प्लकर वापरणे टाळा. यामुळे तुमच्या डोळ्यासारख्या नाजूक भागाला इजा होण्याची शक्यता असते
आयब्रो करताना जर तुम्ही प्लकर वापरत आहात. तर जुने किंवा गंजलेले प्लकर वापरणे टाळा. यामुळे तुमच्या डोळ्यासारख्या नाजूक भागाला इजा होण्याची शक्यता असते Esakal
आंघोळ झाल्यानंतर आयब्रो करा. आंघोळ केल्यानंतर भुवयांच्या भागातील हेअर फॉलिकल्स ओपन होतात. त्यामुळे भुवयांचे केस सहजरित्या निघतात. 
आंघोळ झाल्यानंतर आयब्रो करा. आंघोळ केल्यानंतर भुवयांच्या भागातील हेअर फॉलिकल्स ओपन होतात. त्यामुळे भुवयांचे केस सहजरित्या निघतात. Esakal
आयब्रो करण्यापूर्वी जी भुवई तुम्ही कोरणार आहात त्या भुवईला बोटांच्या साहाय्याने जोर देऊन मालिश करून घ्या. यामुळे त्या भागातील हेअर फॉलिकल्स लूज पडून भुवयांचे केस सहजरित्या काढता येतील.
आयब्रो करण्यापूर्वी जी भुवई तुम्ही कोरणार आहात त्या भुवईला बोटांच्या साहाय्याने जोर देऊन मालिश करून घ्या. यामुळे त्या भागातील हेअर फॉलिकल्स लूज पडून भुवयांचे केस सहजरित्या काढता येतील. Esakal
आयब्रो करून झाल्यानंतर त्या भागावर थंड कोरफडीचे जेल लावून हलक्या हाताने मसाज करून घ्या.
आयब्रो करून झाल्यानंतर त्या भागावर थंड कोरफडीचे जेल लावून हलक्या हाताने मसाज करून घ्या. Esakal
जर तुम्ही प्लकिंगचा वापर करून आयब्रो करणार असाल तर, भुवयांच्या केसांना हलकेच वरून न खेचता त्या केसांच्या रूट्स पासून खेचून वेगळे काढा. यामुळे वेदना कमी होऊन आयब्रोला व्यवस्थित शेप येईल.
जर तुम्ही प्लकिंगचा वापर करून आयब्रो करणार असाल तर, भुवयांच्या केसांना हलकेच वरून न खेचता त्या केसांच्या रूट्स पासून खेचून वेगळे काढा. यामुळे वेदना कमी होऊन आयब्रोला व्यवस्थित शेप येईल. Esakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.