Face Bleaching Tips: चेहरा दिसेल चमकदार फक्त ब्लीच लावताना घ्या 'ही' काळजी

Face Bleaching Tips: चेहऱ्यावर ब्लीच किती वेळ ठेवावे आणि ब्लीच लावल्यानंतर कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.
Face Bleaching Tips
Face Bleaching TipsSakal
Updated on

Face Bleaching Tips: कोणताही कार्यक्रम असाल की चेहऱ्याची चमक वाढवण्यासाठी अनेक महिला फेशियल नंतर ब्लीच करतात. ब्लीच केल्याने चेहऱ्यावरचे केस पांढरे होतात आणि चेहरा चमकदार दिसतो. ब्लीच करणे सोपे आहे. यामुळे अनेक महिला घरीच चेहऱ्यावर ब्लीच लावतात. पण चेहऱ्यावर ब्लीच किती वेळ ठेवावे आणि ब्लीच लावल्यानंतर कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.

ब्लीच किती वेळ ठेवावे?

चेहऱ्यावर ब्लीच लावल्यानंतर फक्त दहा मिनिटे ठेवावे.यापेक्षा जास्त वेळ ठेवल्यास चेहरा खराब होऊ शकतो. तसेच चेहऱ्यावर बारिक पुरळ येऊ शकतात. तसेच अनेकांना अॅलर्जी होऊ शकते.

ब्लीच कधी लावावे?

ब्लीच नेहमी रात्री लावावे. ब्लीच लावल्याने चेहरा चमकदार दिसतो. ब्लीच वाळल्यानंतर ओल्या कपड्याने चेहरा हलक्या हाताने पुसावा. ब्लीच लावल्यानंतर चेहरा जोराने घासू नका. नंतर चेहऱ्यावर दुसरे कोणतेही क्रिम लावू नका. यामुळे चेहरा खराब होऊ शकतो.

Face Bleaching Tips
Independence Day Special Recipe: स्वातंत्र्यदिन होईल खास, घरीच बनवा 'हे' तिरंगी गोड पदार्थ

ब्लीच करण्यापुर्वी चेहरा स्वच्छ करावा

तुम्ही चेहऱ्यावर ब्लीच लावत असाल तर सर्वात आधी चेहरा स्वच्छ करावा. यामुळे चेहऱ्याचा तेलकटपणा कमी होतो. तसेच चेहऱ्यावरचे छिद्र मोकळे होतात.

पुढील गोष्टी करणे टाळा

ऊन्हात जाऊ नका

ब्लीच केल्यानंतर लगेच उन्हात बाहेर पडू नका. कारण ब्लीचमुळे चेहरा संवेदनशील होतो. तसेच चेहार काळा पडू शकतो,

संवेदनशील भागावर लावू नका

ब्लीच लावल्यावर थोडे जळजळ होते. यामुळे पुरळ आलेल्या भागावर किंवा डोळ्यांच्या भोवती लावणे टाळावे. अन्यथा डोळ्यांची जळजळ होऊ शकतो.

कोमट पाणी टाळा

ब्लीच लावल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुणे टाळावे. चेहरा धुताना नेहमी थंड पाण्याचा वापर करावा. तुम्ही पहिल्यांदाच ब्लीच लावत असाल तर ब्युटिशियनचा सल्ला घ्यावा आणि नंतरच ब्लीच लावावे.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.