Face Care : चेहऱ्यावर भरलेत पस असलेले पिंपल्स, तर न्यूट्रिशनिस्टने सांगितलेला हा उपाय करूनच बघाच, नक्की फरक पडेल

Healthy Drink Recipe : तुमच्याही चेहऱ्यावर असे पिंपल्स येत असतील. तर, तुम्हाला एक सोपा उपाय सांगणार आहोत.
Face Care
Face Care esakal
Updated on

Face Care :

आजकाल प्रत्येकालाच चेहऱ्यावर पिंपल्स येण्याचा त्रास होत आहे. यामध्ये काही लोकांच्या चेहऱ्यावर पस असलेले म्हणजे पांढरा स्त्राव असलेले पिंपल्स होतात. वरून ते पांढरे लालसर रंगाचे दिसतात. मात्र फोडल्यावर त्यातून पांढरा पू बाहेर येतो.

अनेक लोक ते फोड फोडतात. पण असे केल्याने या पिंपल्सचे डाग पडतात. ते डाग कायमस्वरूपासाठीही पडू शकतात. त्यामुळे, असे पू असलेले पिंपल्स फोडू नका असे सांगतात. हे पिंपल्स काही दिवसात कमी होतात. पण, सतत पिंपल्स चेहऱ्यावर गर्दी करत असतील तर काळजी करण्याची गरज असते.

Face Care
Face Bleaching Tips: चेहरा दिसेल चमकदार फक्त ब्लीच लावताना घ्या 'ही' काळजी

तुमच्याही चेहऱ्यावर असे पिंपल्स येत असतील. तर, तुम्हाला एक सोपा उपाय सांगणार आहोत. जो न्यूट्रिशनिस्ट किरण कुकरेजा यांनी दिला आहे. या उपायात तुम्हाला फक्त एक ड्रिंकचे सेवन करायचे आहे.

हे ड्रिंक कसे बनवायचे?

पुदिन्याची पाने, लिंबूचा रस आणि चिया सीड्स यांचा वापर करायचा आहे. हे ड्रिंक बनवण्यासाठी ३ पुदिन्याची पाने एक कप पाण्यात टाकून उकळवून घ्या. हे पाणी गाळून घ्या आणि त्यामध्ये लिंबूचा रस घाला. आता यात एक चमचा भिजवलेले चिया सीड्स घाला.

हे पाणी कोमट असतानाच याचे सेवन करा. तसेच, या पाण्याचे सेवन तुम्ही सकाळी उपाशी पोटी करा.

Face Care
Aloe Vera Face Wash : मऊ आणि चमकदार त्वचा हवी आहे? मग घरच्या घरी असं तयार करा एलोवेरा फेस वॉश...

हे इतर उपायही करू शकता

चेहऱ्यावर येणाऱ्या पिंपल्सना कमी करण्यासाठी तुम्ही बर्फही लावू शकता. बर्फ लावल्याने चेहऱ्यावरील पिंपल्सची सूज कमी होते. तसेच, त्यातील येणारी खाजही कमी होते. त्यामुळे दिवसातून दोन वेळा तुम्ही बर्फ चेहऱ्यावर लावू शकता.

आहारात करा याचा समावेश

तुम्ही आहारात दूधाचे सेवन वाढवले तर चेहऱ्यावर येणारे पिंपल्स कमी होतील. दूध किंवा दूग्धजन्य पदार्थांचे सेवन वाढवले तर पिंपल्स येण्याची समस्या कमी होईल.

Face Care
Rose Petals Face Scrub : गुलाबाच्या पाकळ्यांपासून घरच्या घरी बनवा स्क्रब, चेहऱ्यावर येईल सुंदर चमक

हळदीचा करा वापर

हळद एंटीसेप्टिक आणि एंटीबॅक्टेरियल गुणधर्मांनी परिपूर्ण असते. त्यामुळेच एखादी जखम झाल्यावर हळद लावली जाते. तुम्हाला पिंपल्सच्या समस्येतून सुटका हवी असेल तर तुम्ही हळदीचा फेसपॅक वापरा. हळदीमध्ये थोडे पाणी घालून तो फेसपॅक चेहऱ्यावर लावा. आणि, ४५ मिनिटांनी धुवून घ्या. आठवड्यातून एकदा तुम्ही याचा वापर करू शकता.   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.