Face Care Routine : रोज रात्री चेहऱ्याला या तेलाने करा मसाज, चेहरा इतका उजळेल की पार्लरला जायची गरज नाही

उन्हाळ्यात जेव्हा तुम्हाला बाहेर पडायचे असेल तेव्हा त्वचेवर बदामाचे तेल लावा
Face Care Routine
Face Care Routineesakal
Updated on

Face Care Routine :

चेहऱ्याला फेस क्रीम लावल्यानेच चेहरा उजळतो हे ब्रिदवाक्यच बनलं आहे. कारण, प्रत्येकजण क्रिम लावून चेहरा, त्वचा उजळण्याच्या मागे लागले आहे. कारण असं म्हणतात की, प्रसन्न, तजेलदार चेहरा तुमच्या संपुर्ण व्यक्तीमत्वाचे प्रतिनिधित्व करतो. पण, तुमच्या सुंदर चेहऱ्याला अधिक सुंदरता प्राप्त करून देण्यासाठी बदामाचे तेल अधिक फायद्याचे ठरेल.   

बदामाचे अनेक फायदे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. लहान मुलांची मालीश करतानाही बदामाचे तेल वापरतात. जसे बदाम खाल्ल्याने आपली बुद्धीमत्ता वाढते. तसे, ते आपल्या त्वचेसाठीही फायद्याचे आहे. बदामाचे तेल त्वचेसाठी खूप महत्वाचे आणि फायदेशीर आहे.

Face Care Routine
Spinach face packs : थंडीमध्ये त्वचा कोरडी पडलीय? पालक आहे मदतीला! जाणून घ्या ‘हे’ फेसपॅक्स

या तेलात अनेक खनिजे आणि जीवनसत्त्वे आढळतात. याशिवाय ओमेगा-३ फॅटी ॲसिड आणि फॉस्फरस यांसारखे पोषक घटकही मुबलक प्रमाणात आढळतात. जे त्वचेला अनेक समस्यांपासून दूर ठेवते. चेहऱ्यावर लावण्याचे अनेक फायदे आहेत. बदामाचे तेल त्वचेवर लावल्याने सुरकुत्या आणि डाग दूर होतात. मानसिक आरोग्यासाठीही हे खूप फायदेशीर आहे.

बदामाच्या तेलाचे संपूर्ण फायदे मिळविण्यासाठी, ते त्वचेवर कसे आणि कोणत्या वेळी लावावे हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. मग तेल लावण्याची योग्य पद्धत कोणती हे पाहुयात.

रात्रीच्या वेळी करा मसाज

तुम्ही रात्रीच्यावेळी बदामाचे तेल चेहऱ्याला लावले तर त्याचा जास्त फायदा होईल. चेहरा स्वच्छ धुवून मगच तेल लावा. तसेच कमी तेल हातावर घेऊन फेशिअल स्टेपने मसाज करा. त्यामुळे चेहऱ्यावरील त्वचा मऊ,मुलायम होईल.

मेकअप रिमुव्हर

मेकअप काढण्यासाठी तुम्ही बदामाचे तेलही वापरू शकता. जेव्हा तुम्ही तुमच्या चेहऱ्याचा मेकअप काढता तेव्हा त्वचा कोरडी दिसू लागते. अशा परिस्थितीत मेकअप काढल्यानंतर बदामाचे तेल लावावे, यामुळे त्वचा गुळगुळीत आणि निरोगी राहील.

Face Care Routine
Face Care Tips : काळे डाग आणि वांगापासून चेहऱ्याला होईल सुट्टी, गाजर अन् कोबीच्या पानांनी परत येईल ब्युटी

बदामाचा फेसमास्क

तुम्ही फेस मास्क म्हणून बदामाचे तेल देखील वापरू शकता. यासाठी एका भांड्यात बदामाच्या तेलाचे काही थेंब टाका आणि त्यात थोडा मध आणि चिमूटभर हळद घाला. हे तिन्ही मिक्स करून फेसपॅकप्रमाणे चेहऱ्यावर लावा. यामुळे तुमच्या चेहऱ्याची चमक वाढेल आणि तुमची त्वचा खूप सुंदर दिसायला लागेल.

त्वचेवरील मुरूमांसाठी फायद्याचे

आयुर्वेदातही याचा दीर्घकाळ वापर होत आहे. मुरुमांची समस्या खूप दिवसांपासून असेल तर बदामाचे तेल ते दूर करण्यासाठी खूप उपयुक्त ठरते. याच्या तेलामध्ये असलेले अनेक ऍसिड चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल शोषून घेतात. यामध्ये आढळणारे रेटिनॉइड्स मुरुमे दूर करतात.

Face Care Routine
PM Face of INDIA Bloc: इंडिया आघाडीची सत्ता आल्यास कोण असेल पंतप्रधानपदाचा चेहरा?

सनस्क्रीन सारखा वापर करा

बदामाच्या तेलामध्ये आढळणारे व्हिटॅमिन ई आपल्या त्वचेचे सूर्यप्रकाशापासून संरक्षण करण्यास मदत करते. त्यामुळे उन्हाळ्यात जेव्हा तुम्हाला बाहेर पडायचे असेल तेव्हा त्वचेवर बदामाचे तेल लावा. त्यामुळे त्वचा टॅन होणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.