आपल्या चेहऱ्याला मऊ मुलायम फ्रेश दिसण्यासाठी सतत काहीतरी ट्रिटमेंट करण्याची गरज आहे का?. काही महिला तर सतत पार्लरमध्ये जाऊन तासंतास तिथे घालवतात. हे असे करणे काहीजणींना पटत नाही. पण, खरंच आपल्या चेहऱ्याला पंधरा दिवसातून एकदा फेशिअल करण्याची गरज आहे का? यावर तज्ज्ञांचे काय म्हणणे आहे पाहुयात.
आपला चेहऱ्याला डिप क्लीन करण्यासाठी मसाजची गरज असते. त्यामूळेच तुम्ही कोणत्याही स्किन एक्सपर्टकडे गेलात तरी तो तुम्हाला फेशियल करायला नक्कीच सांगतो. साधारणपणे महिन्यातून एकदा किंवा दोन महिन्यातून एकदा ते करून घेतात. मात्र, महिन्यातून दोनदा म्हणजे १५ दिवसांतून एकदा फेशियल केले, तर त्वचेला अधिक फायदे होतील, असे मत ब्युटी एक्सपर्टचे आहे.
फेशिअलची गरज का आहे
ब्युटी एक्सपर्ट रश्मी शेट्टी यांच्या मते, १५ दिवसांतून एकदा फेशियल केल्याने त्वचा क्लीन राहण्यास मदत होते. हे छिद्र स्वच्छ करण्यासोबतच डेड स्कीन काढून टाकते. तसेच ब्लॅकहेड्स ते व्हाईटहेड्स दूर करते. त्यामूळे महिन्यातून दोनदा अशी ट्रिटमेंट केल्यास त्वचा अधिक निरोगी आणि चमकदार बनते.
त्वचारोगतज्ञ रश्मी शेट्टी यांनी याबद्दल एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्यांनी एखाद्या व्यक्तीने किती वेळा फेशियल करावे याबद्दल कोणताही निश्चित नियम नाही. पण, जर तूमची त्वचा कोरडी असेल तर महिन्यातून दोनदा फेशियल केल्याने त्वचेला हायड्रेशन मिळण्यास मदत होईल. त्याचा चेहऱ्याला फायदा होईल, असे सांगितले.
फेशिअल आवडत नसेल तर चेहऱ्याला क्लिनअप केले तरीही चांगला फरक पडतो. ज्यांच्या चेहऱ्यावर सतत ब्लॅकहेड्स येतात त्यांनी 15 दिवसांतून एकदा क्लीनअप करावे, असेही रश्मी यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.