Face Care Tips : चेहऱ्यावरील सुरकूत्या क्षणात गायब करतो एवोकॅडो फेस मास्क; ट्राय तर करा!

Avocado face mask: एवोकॅडोमध्ये अनेक अँटी-एजिंग गुणधर्म असतात
Face Care Tips - avocado face mask
Face Care Tips - avocado face maskSakal Digital 2.0
Updated on

Face Care Tips : चेहऱ्याला वेगवेळ्या क्रीम्स आणि पॅक्स लावून कंटाळा आला असेल. तर, थोडा ब्रेक घ्या. आणि आम्ही काय सांगतोय याकडे लक्ष द्या.

नियासिनमाइड आणि रेटिनॉल सारख्या त्वचेचे घटक आजकाल सौंदर्य उद्योगात खूप लोकप्रिय झाले आहेत. पण यासोबतच लोकांचे लक्ष घरगुती उपचारांकडेही आहे.

नैसर्गिक गोष्टी त्वचेसाठी नेहमीच फायदेशीर असतात. हे तुमच्या त्वचेला पोषण देण्याचे काम करते आणि त्याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.

जर तुम्ही कोरड्या आणि निर्जीव त्वचेने त्रस्त असाल तर तुम्ही त्वचेला पोषण आणि मॉश्चराईझ करण्यासाठी एवोकॅडो वापरू शकता. हे तुमच्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. एवोकॅडो त्वचेच्या समस्या दूर करण्यास मदत करते.

Face Care Tips - avocado face mask
Face Beauty Tips: सनबर्न आणि टॅनिंग दूर करण्यासाठी महागडे Facial कशाला? या ५ उपायांनी उजळेल चेहरा

त्वचेसाठी एवोकॅडोचे फायदे (Avocado Benefits for Skin)

1) वृद्धत्वाचे पहिले आणि सर्वात सामान्य चिन्ह म्हणजे त्वचेवर सुरकुत्या दिसणं. अ‍ॅव्होकाडोमध्ये आढळणारे हेल्दी फॅट्स त्वचेची लवचिकता टिकवून ठेवण्यास आणि तरुण दिसण्यास मदत करतात.

चेहऱ्यावरील सुरकुत्यासाठी अ‍ॅव्होकाडो तेल वापरणे हा एक चांगला पर्याय आहे. हे त्वचेच्या कोरडेपणाशी लढा देते. कोलेजन उत्पादन देखील वाढवू शकते.

2) मुक्त रॅडिकल्समुळे चेहऱ्यावर डाग, त्वचेच्या सुरकुत्या आणि त्वचेचा कर्करोग यासारखे सर्व प्रकारचे गंभीर बदल होतात. त्यामुळे त्वचेवर पोषक आणि अँटिऑक्सिडंटने समृद्ध असलेले अ‍ॅव्होकाडो तेल लावल्याने त्वचेवर हे बदल होण्याची शक्यता कमी होते.

3) अ‍ॅव्होकाडो तेलामध्ये आढळणारे बीटा-कॅरोटीन, प्रोटीन, लेसिथिन, फॅटी अ‍ॅसिडस् आणि जीवनसत्त्वे ए, डी आणि ई आपल्या त्वचेला मॉइश्चरायझ करण्यात मदत करतात आणि अतिनील किरणांमुळे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात. उन्हात बाहेर गेल्यामुळे त्वचेला लालसरपणा येतो. हे कमी करण्यासाठी अ‍ॅव्होकाडो तेल मदत करते.

एवोकॅडोमुळे चेहरा मुलायम आणि तजेलार होतो
एवोकॅडोमुळे चेहरा मुलायम आणि तजेलार होतोesakal

एवोकॅडोमध्ये अनेक अँटी-एजिंग गुणधर्म असतात. अशातच आज आम्ही तुमच्यासाठी एवोकॅडो फेस मास्क बनवण्याची पद्धत घेऊन आलो आहोत. एवोकॅडो फेस मास्क वापरल्याने आपल्या चेहऱ्यावरील वृद्धत्वाची चिन्हे सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. एवोकॅडो फेस मास्क मध घालून तयार केला जातो.

यामुळे तुमची त्वचा खोल वर आणि पोषित राहते. खराब झालेली त्वचा सावरण्यासाठी हा फेस मास्क लावणे उपयुक्त ठरते, तर चला जाणून घेऊया एवोकॅडो फेस मास्क कसा बनवावा.

 

अ‍ॅव्होकाडोमध्ये असणारे आरोग्यदायी घटक (Avocado contains)

अ‍ॅव्होकाडोमध्ये फॅटी ॲसीड मोठ्या प्रमाणात आढळते. तसेच अ‍ॅव्होकाडो मधे पोटॅशिअम, व्हिटॅमीन, आयर्न, कॅलरीज, अँटी ऑक्सीडंट, पण असतात.

१०० ग्रॅम अ‍ॅव्होकाडो मधे ६० ते ८० कॅलरीज असतात. या आरोग्यदायी गुणधर्मामुळे अ‍ॅव्होकाडो ला सुपरफळ म्हणतात.

Face Care Tips - avocado face mask
Face Cleanser At Home : त्वचा उजळण्यासाठी असा तयार करा बेकिंग पावडरपासून Face Cleanser

एवोकॅडो फेस मास्क कसा बनवायचा (How to make avocado face mask)

  • एवोकॅडो फेस मास्क तयार करण्यासाठी, आपण प्रथम एवोकॅडो घ्या.

  • नंतर ते चांगले सोलून बिया काढून टाका.

  • यानंतर त्याचा गर चांगला मॅश करा.

  • मग आपण मॅश केलेल्या एवोकॅडोमध्ये एक चमचा मध घाला.

  • यानंतर तुम्ही या दोन्ही गोष्टी व्यवस्थित मिसळता.

  • आता आपल्या चमकदार त्वचेसाठी एवोकॅडो फेस मास्क तयार आहे.

एवोकॅडो फेस मास्क कसा वापरावा? (How to use avocado face mask)

  • एवोकॅडो फेस मास्क लावण्यापूर्वी चेहरा धुवा.

  • नंतर ते चेहऱ्यावर चांगले लावा.

  • यानंतर हलक्या हातांनी चेहऱ्यावर मसाज करा.

  • त्यानंतर हा मास्क चेहऱ्यावर १०-१५ मिनिटे लावून ठेवावा.

  • यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून स्वच्छ करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.