चेहऱ्यावर काळे डाग किंवा हायपर पिग्मेंटेशन हे कधीकधी लाजिरवाणे कारण बनतात. विशेषत: चेहऱ्यावर काळे डाग दिसल्याने तुमचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. दिसण्याने तितकासा फरक पडत नसला. तरी हे डाग सतत डोकं वर काढत असतात. ऋतूबदल झाला की डाग अधिक गडद होतात.
बदलत्या वातावरणात लोक त्यांच्या सुंदर दिसण्याबद्दल खूप जागरूक असतात. त्यामुळेच लोक अनेकदा विचारतात की जुने डाग कसे काढायचे, फ्रिकल्स दूर होतात का किंवा गालावर काळे डाग येण्याचे कारण काय? याबद्दल माहिती घेऊयात.
तसेच यासाठी शहनाज हुसेनकडून गुप्त आणि अनोखे ब्युटी हॅक घेऊन आलो आहोत. त्यामुळे अधिक वेळ न घेता हे काळे डाग आणि ठिपके दूर करण्यात मदत करतात. त्यावर घरात सहज उपलब्ध होणारी भाजी कशी वापरायची हे पाहुयात.
आज आम्ही शहनाज हुसैनची एक अतिशय गुप्त आणि अनोखी ब्युटी टीप घेऊन आलो आहे, ज्यामध्ये तुम्हाला कोबी आणि गाजरचा वापर करावा लागेल, परंतु जेवणात नाही तर त्वचेवर लावा. कसे? तो कसा लावायचा अन् त्याचा तुम्हाला काय फायदा होणार हे आपण पाहुयात.
कोबी आणि गाजर
कोबीमध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. थोड्या पाण्यात कोबी उकळवा. ते थंड करून चेहरा धुवा. कोबीमध्ये खनिजे पुरेशा प्रमाणात असतात. हे सर्व प्रकारच्या त्वचेसाठी चांगले आहे. गाजर किसून 15 ते 20 मिनिटे चेहऱ्यावर लावा. साध्या पाण्याने धुवा. गाजरात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए असते आणि हिवाळ्यात त्वचेच्या समस्या टाळतात.
चेहऱ्यावरील काळे डाग दूर करण्यासाठी दुधाचा वापर करा
दूध हे सर्वच घरांमध्ये उपलब्ध असते. त्यात प्रथिने, चरबी, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. हिवाळ्यात, दूध कोरडेपणा दूर करण्यास, त्वचेचे पोषण आणि मुलायम बनण्यास मदत करते. दुधाची साय सुद्धा याकामात तुम्हाला उपयोगी पडते.
सामान्य किंवा कोरडी त्वचा स्वच्छ करण्यासाठी अर्धा कप थंड दूध आणि ऑलिव्ह, तीळ किंवा सूर्यफूल तेल यासारख्या कोणत्याही वनस्पती तेलाचे पाच थेंब घ्या. एका बाटलीत ठेवा आणि चांगले हलवा. ते कापसावर लावून त्वचा स्वच्छ करा. उरलेले मिश्रण रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा.
तेलकट आणि एकत्रित त्वचेसाठी मॉइश्चरायझर
100 मिली गुलाब पाण्यात एक चमचा शुद्ध ग्लिसरीन मिसळा. हे पाणी रेफ्रिजरेटरमध्ये काचेच्या बाटलीत ठेवा. मॉइश्चरायझ करण्यासाठी चेहऱ्यावर लावा. हे लोशन हात आणि पायांवर देखील वापरले जाऊ शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.