या सिक्रेट वस्तू वापरून झटपट तयार करा Face Mask, चेहऱ्यावर येईल ग्लो

अगदी कमी खर्चात मध्ये तुमच्या घरात सहज उपलब्ध होणाऱ्या या हेल्दी पदार्थांचा फेसपॅक म्हणून वापर केल्याने चेहरा चांगला राहण्यास मदत होईल. कोणत्या वस्तू किंवा पदार्थांच्या मदतीने तुम्ही झटपट फेसपॅक तयार करू शकता हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत
बनवा घरीच फेसमास्क
बनवा घरीच फेसमास्कEsakal
Updated on

चेहऱ्याची त्वचा निरोगी असण्यासोबत ती तजेलदार, तुकतुकीत असेल तर तुम्ही अधिक सुंदर दिसता. मात्र अनेकदा दिवसभराच्या धावपळीमध्ये चेहऱ्याकडे किंवा त्वचेकडे Skin लक्ष देण्यास पुरेसा वेळ मिळत नाही. महिन्यातून एकदा पार्लरमध्ये जाऊन भरपूर पैस खर्च करूनही अनेकदा चेहऱ्यावर काही फरक पडताना दिसत नाही. Face Skin Care Tips in Marathi try these homemade face packs

यासाठीच चेहऱ्याची नियमित काळजी घेणं गरजेचं आहे. चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी Face Skin Care तुमच्याकडे दिवसभर वेळ नसला तरी रात्रीच्या वेळी तुम्ही घरातीलच काही पदार्थांपासून किंवा काही हेल्दी पदार्थांपासून फेसपॅक Face pack तयार करू शकता.

या फेसपॅकचा रात्री झोपण्यापूर्वी वापर केल्यास तुमच्या त्वचेच्या समस्या कमी होण्यासोबतच चेहऱ्यावर ग्लो Face Glow येण्यास आणि चेहरा तरुण दिसण्यास मदत होवू शकते.

अगदी कमी खर्चात मध्ये तुमच्या घरात सहज उपलब्ध होणाऱ्या या हेल्दी पदार्थांचा फेसपॅक म्हणून वापर केल्याने चेहरा चांगला राहण्यास मदत होईल. कोणत्या वस्तू किंवा पदार्थांच्या मदतीने तुम्ही झटपट फेसपॅक Face Pack तयार करू शकता हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

गुलाबपाणी

त्वचा उजळण्यासाठी तसचं त्वचेवरील सुरकुत्या दूर करण्यासाठी तुम्ही गुलाब पाण्याचा वापर करू शकता. त्वचेच्या विविध समस्या दूर कऱण्यासाठी पूर्वीपासून गुलाब पाण्याचा वापर केला जात आहे. यासाठी तुम्हाला केवळ झोपण्यापूर्वी एका कापसाच्या बोळ्याच्या मदतीने संपूर्ण चेहऱ्यावर गुलाब पाणी लावायचं आहे.

सकाळी चेहरा धुवा. गुलाब पाण्यामुळे तुमचा चेहरा उजळण्यासोबतच चेहऱ्यावर ग्लो देखील येईल.

हे देखिल वाचा-

बनवा घरीच फेसमास्क
Paneer Face Pack: सॉफ्ट आणि ग्लोइंग स्किन पाहिजे? मग ट्राय करा पनीरचा फेस पॅक!

ग्रीन टी आणि बटाट्याचा रस

घरातच उपलब्ध असलेल्या ग्रीन टी आणि बटाट्याचा रस तुम्ही चेहऱ्यावर लावू शकता. यासाठी ग्रीन टी मध्ये थोडा बटाट्याचा रस मिसळून कॉटन पॅडच्या मदतीने चेहऱ्यावर लावा. संपूर्ण रात्रभर हा पॅक चेहऱ्यावर राहू द्या.

ग्रीन टीमध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात तसचं बटाट्यामधील अँटीसेफ्टीक गुणधर्मांसोबत इतर गुणधर्मांमुळे त्वचेच्या समस्या दूर होवून त्वचा निरोगी राहण्यास मदत होते. यामुळे त्वचेवरील डाग दूर होण्यास मदत होते. तसंच टॅनिंग दूर होवून चेहरा उजळतो.

एलोवेरा जेल

कोरफडीचे त्वचेसाठी असंख्य फायदे आहेत. एलोवेरा जेलमधील पॉलिफिनॉल्समुळे त्वचेवरील घाव भरून निघण्यास तसंच त्वचा निरोगी राहण्यास मदत होते. यामुळे चेहऱ्यावरील सूज दूर होणं, सनबर्नमुळे त्वचेचं होणारं नुकसान दूर होवून त्वचेला थंडावा मिळण्यास मदत होते. तसचं पुरळ किंवा सुरकुत्या कमी होतात.

यासाठी झोपण्यापूर्वी चेहऱ्याला तुम्ही एलोवेरा जेल लावून झोपू शकता. यामुळे त्वचा सॉफ्ट आणि चमकदार होईल.

हळद आणि दूध

हळद आणि दुधाचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. रात्री झोपण्यापूर्वी हळदीचं दूध प्यायल्याने चांगली झोप लागते. तसचं सर्दी, पडसं अशा समस्या दूर होण्यासोबतच रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. यासाठीच झोपण्यापूर्वी एक लहान चमचा हळद आणि एक चमचा दूध याची पेस्ट तयार करून ती चेहऱ्याला लावा. २० मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवा.

यामुळे चेहऱ्यावरील मुरुम, पिंपल्स आणि काळे डाग दूर होवून चेहऱा उजळण्यास मदत होईल,

अशा प्रकारे घरातच उपलब्ध असलेल्या आणि आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या काही पदार्थांचा वापर करून तुम्ही झटपट फेसपॅक तयार करू शकता. ज्यामुळे तुमच्या त्वचेच्या समस्या दूर होवून त्वचा चांगली राहण्यास मदत होईल.

हे देखिल वाचा-

बनवा घरीच फेसमास्क
Benefits of Face Yoga : चेहऱ्यावरील फॅट्स कमी करण्यासाठी रोज करा फेस योगा;जाणून घ्या ‘हे’ फायदे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.