Fact Check : देशात सध्या कोरोनाची दुसरी लाट आली आहे (Second Wave of Coronavirus). त्यामुळे प्रत्येकामध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. त्यातच सोशल मीडियावर (Social Media) दररोज वेगवेगळ्या चर्चांना उधाण येतंय. यात अनेक चुकीची माहिती (False Information) व अफवादेखील (Fake News) पसरत आहेत. यामध्येच सध्या तुरटीच्या पाण्याने गुळण्या केल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होतो, असं सांगणारा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे अनेकांनी या माहितीची सत्यता न पडताळता थेट प्रयोग करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, ही माहिती चुकीची असून 'तुरटीच्या पाण्यामुळे (Alum Water) कोरोना बरा होतो', असा दावा कोणत्याही डॉक्टर वा आरोग्य यंत्रणेकडून करण्यात आलेला नाही. त्यामुळे प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरोने (PIB) या व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर आणलं आहे. (fact check coronavirus can be cured by alum water pib reveals the truth)
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एका व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये संबंधित व्यक्ती तुरटीचं पाणी प्यायल्यामुळे कोरोना बरा होतो असं सांगत आहे. मात्र, ही माहिती पूर्णत: चुकीची आहे, असं पीआयबीने स्पष्ट केलं आहे.
"व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुरटीच्या पाण्यामुळे #Covid19 बरा होतो किंवा त्यापासून सुटका होते, असं सांगण्यात आलं आहे. मात्र, ही माहिती खोटी आहे. #PIBFactCheck नुसार, ही माहिती चुकीची व खोटी आहे. त्यामुळे कोरोनावर मात करायची असेल तर तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार करा", असं ट्विट PIB ने केलं आहे.
दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर अनेक अफवा पसरत आहेत. यामध्ये अनेक अफवा या कोरोनावरील उपचारांशी निगडीत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे कोणत्याही माहितीची शहानिशा व सत्यता पडताळल्याशिवाय उपाय करु नका, असं वारंवार डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.