Fact ckeck : कांदा कापताना च्युइंगम खाल्लं तर डोळ्यातून पाणी येणार नाही?

आता कांदा कापताना रडू येणार नाही
fact check
fact checkesakal
Updated on

कांदा हा असा पदार्थ आहे जो पदार्थाची चव अधिकच वाढवतो. कांदा खाण्याचे अनेक फायदेही आहेत त्यामूळे प्रत्येक घरात कांदा खाल्ला जातो. कांद्याचा एक गुण मात्र कोणालाही आवडत नाही. तो म्हणजे कांदा कापताना रडू कोसळंत. त्यामूळे कोणीतरी त्यावर कांदा कापण्याचे मशीन, कांदा चॉपर असे पर्याय शोधले आहेत.

fact check
Kitchen Tips : फक्त वीस रुपयात वर्षभरासाठी घरीच बनवा कसुरी मेथी

कांद्यात असलेले साइन प्रोपॅन्थाइल एस ऑक्साइड नावाचे रसायन आढळते. ते कांदा कापताच डोळ्यातील अश्रू ग्रंथीला उत्तेजित करते आणि डोळ्यांत अश्रू येतात. मात्र, कांदा चिरताना काही गोष्टींची काळजी घेतली तर या त्रासातून तूमची सुटका होऊ शकते.

कांदा कापताना च्युइंगम खाल्ल्याने डोळ्यातून पाणी येत नाही? असे सांगितले जाते. हे खरे आहे का? त्यामागील सत्य काय आहे हे जाणून घेऊयात.

fact check
Kitchen Tips : स्वयंपाकघरातला LPG गॅस कसा वाचवाल ?

कांदा आणि च्युइंगमचे एकमेकांशी नाते आहे. तूम्ही च्युंगम खात असाल तर तूमच्या डोळ्यातून आश्रू येणार नाहीत हे खरं आहे. याचं कारण आहे च्युइंगममध्ये अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्म असतात. जे आपल्या डोळ्यांच्या अश्रु ग्रंथींना उत्तेजित होण्यापासून रोखतात. अशा स्थितीत कांदे कापताना आपण च्युइंगम चघळल्यास आपल्या डोळ्यातील अश्रू ग्रंथी उत्तेजित होत नाहीत. ग्रंथी उत्तेजित होत नसल्यास डोळ्यांतून अश्रू येत नाहीत.

fact check
Kitchen hacks : जेवणात मीठ जास्त झालंय?, मास्टर शेफने दिल्यात या खास टिप्स!

हे खरं असलं तरी च्युइंगम कितपत प्रभावी आहे हे स्पष्ट झालेले नाही. च्युइंगमसोबतच तूम्ही आणखी काही पद्धती वापरून कांदा कापताना होणारा त्रास कमी करू शकता.

कांदा कधीही हाताने ठेचून फोडू नये. कारण त्यातून एन्झाईम बाहेर पडतात. तो नेहमी धारदार चाकूने कापून घ्या. जेणेकरून ते लवकर कापता येईल.

कांदा कापण्यापूर्वी, 10-15 मिनिटे फ्रीजरमध्ये ठेवा. ठेवा यामुळे हवेत आढळणाऱ्या ऍसिड एन्झाईम्सचे प्रमाण कमी होते आणि त्याच्या चवीवर परिणाम होत नाही.

fact check
Onion Crisis Nashik : कांदा प्रश्नावरुन शेतकरी आक्रमक, केंद्रीय मंत्र्यांना घेराव!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.