गौरी लहुरीकर
मुलांच्या भावविश्वाचे अनेक पैलू असतात. मूल मोठ होतात पण त्यांच्या बालपणाला आपण खरच न्याय देतो का असा प्रश्न अलीकडे पुन्हा पुन्हा विचारला जातो. त्यातच न्यूक्लीअर फँमिली आणि मोबाइल ही मुलांच्या संगोपनातील मोठी आव्हान आहेत. मग तज्ञांच्या मदतीने मुलांचे सहज व संगोपन कसे करावे याची माहिती '' तालीम'' या सदरातून घेऊया.
पालकांच्या मनात एक भावना असते ती म्हणजे शिस्त लावली नाही की मुल बिघडतात. मुल बिघडतात, मात्र ती शिस्त न लावल्यामुळे नव्हे तर प्रेम न मिळाल्यामुळे. लाड आणि प्रेम यात फरक आहे. अतिलाड हे मुलाला कदाचित नकारात्मक वागण्याकडे नेऊ शकतात.
मात्र प्रेमाचा स्पर्श, प्रेमाने दिलेला योग्य वेळ या गोष्टी पाल्याला सकारात्मक वागण्याकडे नेतात. याव्यतिरिक्त मुलांनी स्वतःवर तर आधी प्रेम करावे. पाल्यांसाठी कृतीयुक्त शिक्षणातून ''क्वांटिटी टाईम'' पेक्षा'' क्वालिटी टाईम'' पालक नक्कीच देऊ शकतात.
मुलांची काळजी घेणारे, प्रामाणिक, आनंदी, आदर करणारे आणि कलाकार असे घडवायचे असेल तर त्यांच्यासोबत काही निश्चित असणाऱ्या, जीवनमूल्ये शिकवणाऱ्या गोष्टी करून घेणे नक्कीच फायद्याचे ठरेल. पालक म्हणतात ''नेमके आम्ही काय करायचे?.
या भागापासून आपण त्याचे उत्तर शोधूया. मुलांचे ''स्व'' कसे जपावे? मुलांनी ''स्व''ला कसे ओळखावे? आणि स्वतःविषयीचे चांगले मत कसे ठरवावे? याच्या उपक्रमाविषयी जाणून घेऊया. मुलांचे स्वतःविषयीचे मत हे अगदी लहान वयापासून तयार व्हायला सुरुवात होते.
प्रत्येक मुलाचे हे मत तो जसजसा मोठा होतो, त्याला मिळणारी दाद, यशस्वी संवादानंतर होणारे कौतुक, कोणतेही यशस्वी काम यावर बदलत जाते. स्वतःविषयीचे प्रेम हे कोणत्याही मोठ्या कामातून वाढत नाही. तर रोजच्या छोट्या छोट्या कामातून हा विश्वास वाढत जातो आणि मूल आयुष्याला उत्तम प्रकारे हाताळायला शिकते.
एक छोटासा प्रयोग सांगते की, पालकांनी आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी एक छोटी वही अथवा डायरी तयार करावी. रोज रात्री जेवणानंतर प्रत्येकाने आपल्या डायरीत दिवसभरात घडलेल्या सहा गोष्टी लिहाव्यात. अशा सहा गोष्टी ज्यांनी त्यांना छान वाटले आहे त्या लिहाव्या. याचा उद्देश असा की, आपण कायम नकारात्मक गोष्टी जास्त लक्षात ठेवतो आणि दिवसभरातले एक छोटस हसू विसरून जातो. सर्वांनी ह्या गोष्टी नंतर एकमेकांना सांगाव्या अथवा लिहून ठेवाव्या. मूल लहान असेल तर त्याने चित्रे काढली तरी चालतील. काहीच आठवले नाही, तर एखादा प्रसंग, अथवा कोणतीही सकारात्मक घटना लिहावी. अशाप्रकारे रोज घडणाऱ्या आनंदी क्षणांना टिपायला मूल शिकेल आणि स्वतःची प्रतिमा तो सकारात्मक आणि आनंदी बनवेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.