कपड्यांच्या रंगावरून व्यक्तीमत्वाची ओळख, Style करताना निवडा या रंगाचे कपडे

कलर सायकॉलॉजीनुसार तुम्ही कोणत्या रंगाचे कपडे परिधान करताय हे तुम्ही कसे आहात, तुमच्या भावना काय आणि काही प्रमाणात तुमचे विचार कसे आहेत हे दर्शवत असतं
रंगावरुन व्यक्तिमत्त्वाची ओळख
रंगावरुन व्यक्तिमत्त्वाची ओळखEsakal
Updated on

फॅशनच्या दुनियेत रंगाना मोठं महत्व आहे. आपण पाहिलं असेलच लग्नकार्यासाठी ठराविक रंगाचे कपडे परिधान करणं अनेकजण पसंत करतात. तर ऑफिससाठी काही ठराविक रंगाच्या कपड्यांना पसंती दिली आहे. पार्टीसाठी वेगळे एवढच काय तर अलिकडे रात्रीच्या समारंभांसाठी ठराविक रंग, तर दिवसासाठी वेगळे असाही ट्रेण्ड पाहायला मिळतोय. खरं तर तुम्ही निवडत असलेल्या कपड्यांच्या Clothes रंगावरून तुमचं व्यक्तीमत्व Personality ओळखलं जात. यासोबतच्या कपड्यांच्या रंगावरून तुमच्या भावना, तुमचा आत्मविश्वास प्रकट होत असतो. यामुळेच फॅशन जगतात Fashion World कपडे तयार करत असताना रंगांच्या मानसशास्त्राला मोठं महत्व आहे. Fashion and Color Psychology Choose Color of Clothes according to Personality

कलर सायकॉलॉजीनुसार तुम्ही कोणत्या रंगाचे कपडे परिधान करताय हे तुम्ही कसे आहात, तुमच्या भावना काय आणि काही प्रमाणात तुमचे विचार कसे आहेत हे दर्शवत असतं. यासाठी फॅशनमधील रंगाचं मानसशास्त्र समजून घेणं गरजेचं आहे. फॅशन करल सायकॉलॉजीच्या मदतनी आपण कपड्याचे असे काही रंग निवडू शकतो ज्यामुळे तुमचा मुडही चांगला राहिल आणि तुमची पर्सनालिटी अधिक खुललेली दिसेल. कररफुल आउटफिट्सवरूनही तुमचं व्यक्तीमत्व लक्षात येतं. बोल्ड आणि ब्राइट रंगाच्या कपड्यांमुळे तुमचा कॉन्फिजन्स म्हणजेच आत्मविश्वास दिसून येतो.

फॅशनमध्ये रंगाच्या मानसशास्त्राचा विचार करताना रंग संगतीदेखील महत्वाची ठरते म्हणजे. तुमच्या आउटफिटमध्ये काही खास रंगांचं कॉम्बिनेशन. कपड्यांमधील काही खास रंग परिधान केल्याने काय फायदे होवू शकता. तुम्हचं व्यक्तीमत्व अधिक कसं खुलू शकतो यासाठी काही रंगाबद्दल आम्ही तुम्हाला आता सांगणार आहोत.

लाल रंग हा पॅशन, उर्जा आणि उत्साह यांच्याशी संबंधीत आहे. लाल रंग परिधान केल्याने आत्मविश्वास वाढतो आणि तुम्ही स्वत:ला पावरफूल समजू शकता. लाल हा बोल़्ड रंग असल्याने इतरांचं लक्ष वेधून घेतो. आभ्यासातून असं समोर आलं आहे की लाल रंगामुळे हार्ट रेट वाढतो यामुळे लाल हा प्रेमाचा रंगही मानला जातो. यासाठीच लग्नकार्यात वधूचा पेहराव हा बऱ्याचदा लाल रंगाचा असतो.

पिवळा रंग हा सनशाइन, रिफ्रेश करणारा आणि क्रिएटीव्ही दर्शवणारा मानसा जातो. पिवळा रंग हा सुर्यप्रकाशाचा रंग असल्याने हा रंग परिधान केल्यास तुम्ही आसपासच्या लोकांमध्ये सकारात्मकता पसरवत असता. परिणामी तुम्ही आनंद पसरवता.

हे देखिल वाचा-

रंगावरुन व्यक्तिमत्त्वाची ओळख
Urfi javed: करीनानं कौतुक काय केलं अन् उर्फीनं आहे तेवढे कपडे काढले..

पांढरा रंग हा शांतता, स्वच्छता आणि शुद्धतेचं प्रतिक म्हणता येईल तसचं पांढरा रंग हा साधेपणा आणि तुमच्यातली निरागसता दर्शवतो. पांढऱ्या रंगाचे कपडे तुम्ही शुद्ध मनाचे आहात ते दर्शवतो. पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने तुमच्यातून पॉझिटिव्ह व्हाईबस् पसरतात.

तर हिरवा रंग हा निसर्गाचा रंग असल्याने तो शांतता आणि सुरक्षिता दर्शवतो. त्यामुळे तुम्ही दयायाळू आणि इतरांचा आदर करणारे आहात हे लक्षात येऊ शकतं.

निळा रंग सहसा शांतता, निर्मळता आणि विश्वासाशी संबंधित असतो. या रंगाचे कपडे स्थिरता आणि विश्वासार्हतेची भावना जागृत करू शकतं. तसच तुम्ही प्रामाणिक आहात हे देखील दर्शवतो. प्रोफेशनिलिझम आणि विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी तयार केलेल्या कपड्यांसाठी अनेकदा निळा रंग वापरला जातो. जसं की कॉर्पोरेटमध्ये निळ्या रंगाचे ब्लेझर वापरले जातात. तसेच फॉर्मल कपड्यांमध्ये आपण निळ्या रंगाचे विविध छटांचे कपडे पाहतो. निळ्या रंगामुळे तुमचा आत्मविश्वास चांगला आहे हे लक्षात येतं. यामुळेच जॉब इंटव्हूला जाताना या रंगाचे कपडे तुम्ही निवडू शकता.

गुलाबी रंग हा रोमान्स, शांतता आणि दयाळू वृत्ती दर्शवतो. हा रंग गोडवा, खेळकरपणा पसरवतो. यासाठीच लहान मुलं किंवा महिलांसाठी गुलाबी रंगाचा कपड्यांमध्ये वापर अधिक होतो.

हे देखिल वाचा-

रंगावरुन व्यक्तिमत्त्वाची ओळख
Ramadan Fashion : रमजान महिन्यात तूमच्या सौंदर्याला चार चाँद लावतील असे लेटेस्ट कुर्ते!

काळा रंगदेखील पावर, बोल्ड आणि सुसंस्कृत आणि सुरेखपणा दर्शवतो. काळा परिधान केल्याने आत्मविश्वास वाढतो आणि तुम्ही सामर्थ्यवान असल्याचं दिसून येतं.

अनेकदा बोल्ड म्हणजेच भडक रंग हे उत्साहीत वातावरण निर्माण करण्यासाठी योग्य समजले जातात तर पेस्टल किंवा सौम्य रंगाच्या कपड्यांमध्ये तुम्ही वातावरणात शांतता निर्माण होते असं समजलं जातं.

कोणत्या रंगाच्या कपड्यांमुळे काय प्रभाव पडू शकतो हे आपण पाहिलं मात्र फॅशन करत असतानाही इतरही काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. जसं की कपड्यांसाठी एखादा रंग निवडताना तुमचा संपूर्ण पेहराव संपूर्ण त्याच रंगाचा असेल तर ते अनेकदा नकारात्मक ठरू शकतं. यासाठीच आपण कॉन्ट्रेस हा पर्याय निवडतो. म्हणजेच संपूर्ण कॉन्फिडन्स दिसून येण्यासाठी जर तुम्ही काळ्या किंवा लाल रंगाचे कपडे निवडताय तर ते पूर्णपणे एकाच रंगाचे असल्यास त्याचा नकारात्मक प्रभाव पडू शकतो. अशा वेळी काळे कपडे हे इतर फिक्या रंगाच्या कपड्यांसोबत रंगसंगती करून परिधान करा. जसं की काळी पॅन्ट आणि ब्लेझर असेल, तर त्यावर पांढरं, फिका गुलाबी किंवा इतर फिक्या रंगाचं शर्ट परिधान करा. पार्टीसाठी तुम्ही लाल, जांभळ्या रंगाचं शर्ट परिधान करू शकता. तर महिलांनी जरी एकाच रंगाचे कपडे परिधान केले तरी त्यावर आणि ज्वेलरी किंवा वेगळ्या रंगाची सॅण्डल निवडावी. सर्वात महत्वाचं कोणताही रंग किंवा पेहराव निवडताना त्या कपड्यांमध्ये तुम्ही कम्फर्टेबल असणं हे जास्त महत्वाचं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.