काळ कितीही बदलला असला तरीदेखील अजूनही सुंदरतेची व्याख्या रंग, रुप यांच्यावरुन केली जाते. आज कुठेही पाहा प्रत्येक जण बारीक होण्यासाठी धावत आहे. कोणी जीममध्ये तासन् तास घालवत आहे, तर कोणी डाएट करत आहे. पण हे कशासाठी? रंग उजळ असणं आणि बारीक असणं म्हणजेच सुंदर का? अनेक जण आजही इतरांना रंगरुपावरुन टोमणे मारतात. एखादी व्यक्ती किंचितशी जाड झाली तरीदेखील तिला सतत चिडवलं जातं. त्यांनी कोणतेही कपडे घातले तरीदेखील ते कसे अयोग्य आहेत हे भासवलं जातं. म्हणूनच, जाड असणं किंवा प्लस साईज असणं चुकीचं नसून या व्यक्तीदेखील कोणतीही फॅशन बिंधास्तपणे कॅरी करु शकतात. मात्र, ही फॅशन कॅरी करण्यापूर्वी कोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे हे जाणून घेऊयात. (fashion-beauty-styling-tips-for-plus-size-ladies-to-look-more-beautiful)
१. कपड्यांची योग्य निवड -
अमूक कपडे आपल्यासाठी नाहीत किंवा आपल्याला छान दिसणार नाही हा विचार प्रथम डोक्यातून काढून टाका. तुम्ही प्रचंड सुंदर आहात हे लक्षात ठेवा. सुंदर असणं हे तुमच्या मनावर आणि स्वभावावर असतं. बाह्यसौंदर्याचा जास्त विचार न करता तुम्हा जे कपडे आवडले आहेत ते बिंधास्त घ्या. फक्त कपडे निवडताना त्याचं कापड कोणत्या क्वालिटी आहे. फॅब्रिक योग्य आहे की नाही हे नक्की चेक करा. तसंच जर तुम्ही लग्नासाठी खरेदी करत असाल आणि लेहंगा घेण्याला तुमची पसंती असेल तर शक्यतो फ्रिल किंवा कॅनकॅन असलेल्या लेहंग्याची निवड करु नका. त्याऐवजी सिंपल प्लेन लेहंगा निवडा.
२. वाइल्ड बेल्ट -
वजनदार महिलांना अॅक्सिसेरीज उठून दिसत नाही असं कोण म्हणतं? उलट नव्या ट्रेंडी अॅक्सिसेरीजमध्ये त्यांचं सौंदर्य अजून खुलून दिसतं. जर तुमचं पोट किंचितसं मोठं असेल तर तुम्ही वाइल्ड बेल्टचा वापर करु शकता. विशेष म्हणजे हा बेल्ट तुम्ही कोणत्याही ड्रेससोबत कॅरी करु शकता.
३. जास्त फिट कपडे नको -
अनेक स्त्रिया घट्ट कपडे घालण्यावर भर देतात. परंतु, असं करु नका. एकतर असे कपडे घातल्यामुळे वावरताना अवघडल्यासारखं होतं. तसंच कपडे जास्त घट्ट असल्यामुळे पोट, पाठ आणि हात यांच्यावरील फॅट दिसून येतं. त्यामुळे शक्यतो थोडे सैलसर कपडे घाला. मात्र, सैल म्हणजे गबाळ्यासारखेही नको.
४. शेपवेअर -
आज काल बाजारात वेगवेगळ्या कंपनीचे व क्वालिटीचे शेपवेअर उपलब्ध झाले आहेत. हे शेप वेअरदेखील तुम्ही वापरु शकता. मात्र, शेपवेअर कम्फर्टेबल असेल असंच घ्या. जास्त फिट घेऊ नका. त्यामुळे त्वचेला त्रास होऊ शकतो.
५. लेगिंग -
जीन्सला पर्याय म्हणून अनेक जणी लेगिंग वापरतात. परंतु, लेगिंग्स पायाला घट्ट चिकटून बसतात. त्यामुळे पायांचा संपूर्ण आकारा त्यातून दिसून येतो. त्यामुळे लेगिंग्सच्या ऐवजी तुम्ही जीन्स घातली तर ते जास्त योग्य राहिल.
६. मोठ्या प्रिंटचे कपडे -
अनेक कपड्यांवर मोठी प्रिंट असते. मात्र, कपडे वापरणंही टाळा. या कपड्यांमुळे तुम्ही अजून जाड दिसू शकता. त्यामुळे मोठी प्रिंट निवडण्यापेक्षा बारीक नक्षीकाम केलेले कपडे निवडा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.