Women Fashion Tips: एकच स्टाइल करून कंटाळा आलाय? ट्रॅडिशनल वेअरला असा द्या फ्युजन टच!

फॅशनच्या बाबतीत मुलींना नेहमीच अव्वल राहायचे असते
Fashion
Fashion sakal
Updated on

फॅशनच्या बाबतीत मुलींना नेहमीच अव्वल राहायचे असते, त्यामुळे त्यांच्याकडे विविध प्रकारच्या आउटफिट कलेक्शन देखील असतात. इतके पर्याय असूनही ती नेहमी कन्फयुज असते की, आज काय घालायचे? सामान्यतः प्रत्येक मुलीला ही समस्या असते, लग्नसराईत कोणताही लग्नसमारंभाला उपस्थिती लावताना नेहमी ट्रेडिशनल लुक केला जातो.

कारण, लग्न हा एकच असा फंक्शन आहे जिथे तरूणींना वेस्टर्न काही चालत नाही. त्यामूळे साडी, अनारकली, लेहेंगा, स्कर्ट असे कपडे लग्नात घातले जातात. अशा परिस्थितीत प्रत्येकाला या खास प्रसंगी स्टायलिश तसेच सुंदर दिसण्याची इच्छा असते.

तुम्हाला जर त्याच जुन्या स्टाइलची साडी आणि लेहेंगा घालण्याचा कंटाळा आला असेल. तर आज आम्ही अशाच काही आउटफिट्सबद्दल सांगणार आहोत, जे परिधान केल्याने तुम्हाला पारंपारिक लूक तर मिळेलच शिवाय तूमचा लुक वेगळा आणि स्टायलिशही दिसेल.

Fashion
Cancer Risk: टूथपेस्ट आणि शॅम्पूमुळे कर्करोगाचा धोका वाढतोय का? जाणून घ्या काय म्हणतात तज्ज्ञ

धोती साडी

साड्यांमध्ये आजकाल धोती साडीचा खूप ट्रेंड आहे. हे परिधान केल्याने तुम्ही स्टायलिश तर दिसताच पण पारंपारिक लूकपेक्षाही खूप वेगळे दिसाल. ही दिसायला नऊवारी साडीसारखीच असते. साध्या सॅटिन फॅब्रिकच्या साडीसोबत तुम्ही हेवी वर्क ब्लाउज कॅरी करू शकता. यासोबतच केस मोकळे ठेवून तुम्ही परफेक्ट लूक देऊ शकता.

Fashion
Fashion sakal

स्कर्टसोबत प्लजिंग नेकलाइन

तुम्हाला जर लेहेंगा घालायचा असेल तर तुम्ही त्याची वेगळी स्टाइल फॉलो करू शकता. यासाठी, तुम्ही हेवी वर्क असलेला लांब स्कर्ट प्लंगिंग डीप नेकलाइन ब्लाउज घालू शकता. सामान्य लेहेंग्यापेक्षा वेगळा लुक देताना ते तुम्हाला स्टायलिश देखील बनवेल. हा ड्रेस तुम्ही बाजारातून खरेदी करू शकता.

Fashion
Fashion sakal
Fashion
Breastfeeding Benefits : स्तनपानामुळे बाळ आणि आईला काय फायदा होतो माहितीये? जाणून घ्या

प्लाझो सेट

प्लाझो सेटमध्येही तुम्हाला वेगळा आणि स्टायलिश लूक मिळवायचा असेल तर तुम्ही मोठ्या आकाराच्या पलाझोसोबत ब्लेझर डिझाईनचा कुर्ता घालू शकता. हा आउटफिट तुम्हाला खूप क्लासी लुक देईल.

प्लाझो विथ श्रग

शरारा गेल्या काही काळापासून मुलींमध्ये ट्रेंडमध्ये आहेत. पण तुम्हाला त्याच जुन्या स्टाइलचे प्लाझो घालण्याचा कंटाळा आला असेल.तर तुम्ही त्याचे फ्यूजन व्हर्जन वापरून पाहू शकता. यासाठी पलाझोसोबत श्रग घालावे लागेल. याच्या मदतीने तुम्ही वरून श्रग घेऊन याला पारंपारिक टच देऊ शकता.

Fashion
Fashion sakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.