Fashion Tips: डेटवर जाताना 'या' प्रकारचे कपडे परिधान केल्यास, मिळेल परफेक्ट लूक

Choose Perfect Dress For Date: डेटला जाण्यापुर्वी ड्रेस निवडतानाकाही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
Fashion Tips
Fashion TipsSakal
Updated on

Choose Perfect Dress For Date: सध्या अनेक तरूण आणि तरूणी आउटफिटसाठी अभिनेता आणि अभिनेत्रींचा ट्रेड फॉलो करतात. जर तुम्ही डेटवर जाण्याचा विचार असाल तर प्रत्येकजण त्वेचकडे लक्ष देतो. पण डेटला जाताना कपड्यांकडेही लक्ष देणे गरजेचे असते. खासकरून मुलींनी कपड्यांकडे जास्त लक्ष देणे गरजेचे असते. कारण जेव्हा परफेक्ट कपड्यांमुळे सुंदर लूक मिळतो. त्यामुळे डेटवर जात असाल तर ड्रेस निवडताना पुढील गोष्टी नक्की लक्षात ठेवा.

हवामान

डेटसाठी ड्रेस निवडताना केवळ स्टाइलचा विचार करे योग्य नाही. तुम्ही हवामानाचा देखील विचार केला पाहिजे. तुम्ही दिवसा डेटवर जात आहात की रात्री जात आहात हे लक्षात घेऊन ड्रेस परिधान करावे. यामुळे तुम्ही स्टायलिश आणि सुंदर दिसाल.

ठिकाण

डेससाठी जाताना ड्रेसची निवड करत असाल तर ठिकाण लक्षात घ्यावे. तुम्ही जागेनुसार ड्रेसची निवड केली पाहिजे. यामुळे तुम्हाला संकोच वाटणार नाही.

दागिने

जेव्हा तुम्ही ड्रेससोबत योग्य ॲक्सेसरीज निवडता तेव्हाच एक परफेक्ट लुक मिळतो. त्यामुळे कानातल्यापासून ते अँकलेट्स आणि सँडलपर्यंत सर्व काही तुमच्या ड्रेस आणि ठिकाणानुसार निवडावे. ज्यामुळे तुम्हाला सुंदर लूक मिळेल.

Fashion Tips
Tirupati Laddu: तिरुपती लाडूत वापरला जातो कापूर, जाणून घ्या काय आहेत आरोग्यदायी फायदे

त्वचेचा टोन

योग्य ड्रेस निवडण्यासाठी त्वचेचा टोन लक्षात घ्यावा. तसेच शरीराचा आकारानुसार कपडे घालावे. योग्य त्वचा टोन आणि आकारानुसार कपडे परिधान केल्यास तुम्ही अधिक सुंदर दिसाल.

आरामदायी कपडे निवडा

डेट जाताना मुली उत्साही असतात. अनेक मुली जोडीदाराच्या आवडीचे काहीतरी घालण्याचा प्रयत्न करतात. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमचा कम्फर्ट लक्षात घेतला पाहिजे. तुम्हाला काय आवडते, कोणत्या प्रकारचे ड्रेस, सॅंडल आणि ॲक्सेसरीज तुम्हाला आरामदायक वाटतात, हे सर्वात महत्त्वाचे आहे. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही स्टायलिश दिसाल.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.