पृथा वीर
इतिहासात डोकावताना मानवी संस्कृतीत बदल सहज दिसतात. प्रत्येक काळाचा आपला फँशन सेन्स होता. अगदी अजिंठा लेणीतील सुंदर कोरीव काम बघतानाही २००० हजार वर्षांपूर्वींची वेशभुषा, केशभुषा, दागदागिने, वस्त्रे, संगीत साधने, चालीरीतींचा तपशीलवार उलगडा होतो. काळ बदलला तसा फँशन ट्रेंड सुद्धा बदलला. या नव्या युगातील फँशनचे वेध आम्ही घेतोय '' इना '' या नव्या सदरातून...
उन्हाळा म्हणताच पांढरे कपडे किंवा सौम्य रंगाचे कपडे डोळ्यांसमोर येतात. या ऋतुमानानुसार नेमके कपडे निवडताना चोखंदळपणे निवड करावी लागते. उन्हाळ्यातही आपला साजेसा फँशन ट्रेंड जपायचा असेल तर टाय अँड डाय कपड्यांची स्टाईल ट्रेंडमध्ये आहे. कुर्ते, टी-शर्टपासून ते साडीपर्यंत टाय-डायचे वेगवेगळ्या डिझाइन व रंग लक्ष वेधतात. तीव्र उन्हात डोळ्यांत शांत वाटणारी ही फॅशन स्टेटमेंट २०२४ च्या मुख्य फॅशन होण्यास सज्ज झाली आहे.
कापडावर विशिष्ट प्रकारचे डिझाइन आणि रंग लावण्याची सगळ्यात जुनी आणि पारंपरिक पद्धत म्हणजे ''टाय अँड डाय''. याच जुन्या परंपरेला नव्या रूपात सादर करताना टाय अँड डायला केवळ कपड्यांवरच नव्हे तर फँशन ट्रेंड म्हणूनही समोर येतोय. फँब्रिक रंग वापरून घरच्या घरी कपडे, उश्यांची कव्हर,ओढणी,रूमाल, टीशर्टवर ही पद्धत वापरून गिफ्ट देता येते. टाय डायमध्ये फोल्डिंग, ट्विस्टिंग, प्लिटिंग, कापडाचे नॉटिंग आणि स्टीचिंग यांचा समावेश असतो.
कापडावर विशिष्ट डिझाइनची तयार करताना पूर्वी कडधान्यांचा वापर व्हायचा. आता मात्र कॉईन, मोती, वाटाणा असे साहित्य वापरून टाय अँड डाय केले जाते. यामध्ये रंगांचा वापर हवा तसा करता येतो. पारंपरिक परंतु ट्रेंडी असे हे तंत्र आहे. नावाप्रमाणेच बांधून , रंग देऊन, गरम पाण्यात उकळवून टाय अँड डाय केले जाते. डाय अँड डायमध्ये वेगवेगळे शेड, डिझाइन करून बटवे, ओढणी, साडी, टीशर्टवर प्रिंट करता येते. अगदी तुमच्या जुन्या कपड्यांचे अपसायकलिंग करताना टाय अँड डायची युक्ती उपयुक्त ठरते. आरामशीर, कॅज्युअल लुकसाठी डेनिम शर्ट, टीशर्टवर टाय अँड डाय पद्धती छान दिसते.
टाय अँड डायद्वारे आपण आपल्या हाताने बनवलेल्या वस्तू गिफ्ट देताना किंवा होम डेकोर म्हणून वापरण्याचा आनंद वेगळा आहे. वॉल डेकोर म्हणून टाय अँड डाय ट्रेंडी दिसतो. टाय अँड डाय प्रकारातील कुर्ती सुद्धा खूप सुंदर दिसतात.
प्लेन कुर्त्यांवर घरीच टाय अँड डाय करून डिझायनर कुर्ती तयार करता येते. यामध्ये कॉटन, सिंथेटिक असे दोन्ही प्रकार चालतात. तर फँब्रिक रंग, अँक्रेलिक आणि नैसर्गिक रंग उठून दिसतात.
फक्त इतर दोन रंगाच्या तुलनेत फँब्रिक रंग जास्त टिकतात. घरी चादरी, उशांची कव्हर, रूमाल, जुनी प्लेन साडी, ओढणी यांना टाय अँड डाय करून अपसायकलिंग केले जाते. सोशल मीडिया साइटसवर टाय अँड डायचे शेकडो व्हिडीओ बघायला मिळतात. विशेष म्हणजे अनेकांना कलेची भुरळ असून या कलेकडे व्यवसायभिमुख कला म्हणून बघितले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.