Fashion Tips : साडीत मोकळं-ढाकळं वाटत नाही, तर साडी नेसताना तुम्हीही करताय या चूका

Saree Draping Tips In Marathi : साडी म्हणजे रुबाब, साडी म्हणजे सौंदर्य, साडी म्हणजे साधेपणा, साडी म्हणजे जिव्हाळा. अनेक मैत्रिणींच्या जिव्हाळ्याचा विषय आहे साडी.
Fashion Tips
Fashion Tips esakal
Updated on

Fashion Tips :

भारतीय नारी इन सारी, बाईला साडी शिवाय इतर काही शोभत नाही. अशी वाक्य तुम्ही ऐकली असतील. आणि हे ऐकून तुम्हालाही साडी नेसाविशी वाटली असेल. तर त्यात काही गैर नाही. कारण साडी आहेच अशी जी प्रत्येकीला वेड लावते.

साडी म्हणजे रुबाब, साडी म्हणजे सौंदर्य, साडी म्हणजे साधेपणा, साडी म्हणजे जिव्हाळा. अनेक मैत्रिणींच्या जिव्हाळ्याचा विषय आहे साडी. आजकालच्या तरुणी साडी नेसताना अनकंफर्टेबल फिल करतात त्यांना साडी मध्ये मोकळं-ढाकळं अजिबात वाटत नाही. साडी नेसली की उगाचच एक अवघडलेपण येत असं अनेक मैत्रिणींचं मत आहे.

Fashion Tips
London Saree Walkathon : ‘लंडनच्या रस्त्यावर भारतीय महिलांचा साडी वॉकेथॉन’

साडी नेसल्याने नेहमीच प्रसन्न वाटतं पण घाई गडबडीत नसलेली साडी कधी सुद्धा परफेक्ट येत नाही. त्यामुळे मुली आणि तरुणी आणि महिला अनेक वेळा अशा चुका करतात जात त्यांना अधिकच अवघडलेपणा देतात. साडी नेसताना अशा काही चुका होतात ज्यामुळे साधी सोपी सरळ वाटणारी साडी नकोशी वाटते. त्या कोणत्या चुका आहेत आणि त्या कशा टाळायच्या याबद्दल माहिती घेऊयात. (Saree Draping Tips In Marathi)

साड्यांना अधिक पिनअप करणं

काही वेळा साडीमध्ये आपला बॉडीशेप परफेक्ट दिसावा, साडी फुगू नये यासाठी अनेक ठिकाणी सेफ्टी पिन लावल्या जातात. साडीमध्ये पदरावरती आणि साडीच्या निऱ्यांमध्ये पिनअप केलं जातं. पण आजकाल पदरावरती चार ठिकाणी आणि निऱ्या नीट दिसाव्या यासाठी दोन ठिकाणी पिन्स लावल्या जातात.  मागील बाजूस पाठ दिसू नये म्हणूनही पिन्स लावल्या जातात. या पिनांचा आपल्याला त्रास होतो.

त्यामुळे शक्य होईल तितक्या कमी पिन्सचा वापर करून तुम्ही साडी नेसण्याचा प्रयत्न करा. ज्यामुळे उठताना, बसताना अधिक जपावं लागणार नाही.  साडीमध्ये सुद्धा तुम्हाला आरामदायक वाटेल.

Fashion Tips
Mira Rajput Saree Collection: पार्टीमध्ये रॉयल आणि क्लासी दिसायचंय? मग मीरा राजपूतचे हे साडी लुक करा फॉलो

ब्लाऊजचे परफेक्ट फिटिंग नसेल तर

साडी खूप सुंदर असेल, नाजूक असेल आणि तिच्यावर ब्लाऊज सुद्धा साजेस असेल. फक्त ते जरा फिट नसेल तर मात्र तुम्हाला विचित्र वाटू शकते. कारण आपल्याला जी गोष्ट आरामदायक वाटते ती गोष्ट आपल्याला आनंद देते. त्यामुळेच जर ब्लाऊजचे फिटिंग चुकले असेल तर ते आपल्याला विचित्र वाटत राहते.

त्यामुळे कोण आपल्याकडे पाहतेय का, कोणाला आपले ब्लाऊज फिटिंग लक्षात येते का. आपण यासाठी ब्लाउजमध्ये जाड दिसतोय का या सगळ्या विचार करून महिला गोंधळून जातात. त्यामुळे ब्लाऊज फिटिंग परफेक्ट करून घ्या.

याउलट जर ब्लाऊज अधिकच घट्ट असेल तर मात्र आपला अधिकच गोंधळ होऊ शकतो. कारण त्यामुळे आपल्याला श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो. त्यामुळे ब्लाऊजचे फिटिंग परफेक्टच निवडावे. (Saree Draping Tips In Marathi)

Fashion Tips
Saree Style Ideas: श्रिया सरनची साडी नेसण्याची खास स्टाईल, तुम्हालाही मिळेल अभिनेत्रीसारखा लूक

साडी वरती मॅचिंग पेटिकोट

सध्या लाईट कलरच्या साड्यांचे ट्रेंड आहे. अनेक व्हरायटी असलेल्या पार्टीवेअर साड्यांमध्ये लाईट कलरला महिलांची पसंती आहे. पण लाईट कलरच्या साडीमध्ये डार्क कलरचा पेटिकोट उठून दिसतो. तसेच अशा साड्यांमध्ये वेगळ्या कॉन्ट्रास्ट कलरचे पेटिकोट घालणेही चुकीचे दिसते. त्यामुळे तुम्ही परफेक्ट मॅच होईल असाच पेटिकोट निवडा.

साडी नेसण्याची जागा योग्य निवडा

साडी नेसण्याची एक कला आहे प्रत्येकीलाच ती जमते असं नाही. जर तुम्ही रोज साडी नेसत असाल तर ती पोटावरच्या भागापासून नेसतात तिथेच नेसा. पण जर पहिल्यांदा साडी नेसत असाल तर मात्र याची काळजी घ्यावी लागते.  नवीन साडी नेसायला सुरू करणाऱ्या अनेक महिलांचे अंदाज याबाबतीत चुकतात. एकतर साडी खूप वर होते किंवा साडी खूप खाली होते. त्यामुळे परफेक्ट माप घेऊन मगच पोटावर साडी नेसावी.

साडी अधिकच वर गेल्याने आपण विचित्र दिसू शकतो. आणि साडी अधिकच खाली गेल्याने आपल्याला वाईट नजरेचे शिकार व्हावे लागू शकते. त्यामुळे साडी कुठे नेसायची हे व्यवस्थित ठरवून मगच साडी नेसावी. याबाबतीत तुम्ही तुमच्या पतीचा किंवा मैत्रिणीचा किंवा आईचा सल्ला घेऊ शकता.

Fashion Tips
Banarasi Saree History : बनारसी साडीला लाभलाय २००० वर्षांचा प्राचीन इतिहास.! अकबराच्या काळात मिळाली खास ओळख

साडी घट्ट बांधा

अनेक वेळा साडी नेसताना पेटिकोट घट्ट बांधला नसल्याने साडी सतत खाली सरकते की काय असं वाटू लागतं. त्यामुळे तुम्ही पोटाला त्रास होणार नाही, अशा पद्धतीने पेटिकोट घट्ट बांधा. आणि त्यावर साडी नेसा. तुम्हाला आरामदायक वाटेल आणि तुम्ही साडी नेसूनही आत्मविश्वासाने सर्व कामे करू शकाल. (Saree Draping Tips In Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.