महिलांना साडी नेसण्यासाठी फक्त निमित्त हवे असते. खास प्रसंगी हा आपला आवडता पारंपारिक पोशाख आहे, पण जेव्हा एखाद्या कार्यक्रमात किंवा आउटिंगमध्ये काय घालायचे याबद्दल खूप कनफ्यूजन असते, तेव्हा साडी सर्वोत्तम पर्याय मानला जातो, पण मुद्दा इथेच संपत नाही.
साडीमध्ये उत्तम दिसण्यासाठी तुम्हाला इतर अनेक गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील, खासकरून तुमची फिगर कर्व्ही असेल तर. अशा परिस्थितीत तुमच्यावर स्लिम आणि सुंदर दिसण्याचा डबल प्रेशर असतो, आम्ही काही टिप्स सांगतो, ज्याला फॉलो करून तुमची साडीमध्ये स्लिम दिसण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते.
साडी थोडी टाईट बांधा
प्लस साइजच्या स्त्रियांना साडी सामान्यपेक्षा थोडी घट्ट बांधावी लागते. यामध्ये लूक थोडा स्लिम दिसेल, पण हा फंडा समजून घेण्यात आपण अनेकदा चुका करतो. सैल कपडे परिधान केल्याने फिगर स्लिम दिसते, असे आपल्याला वाटते, त्यामुळे ही चूक करू नये.
डार्क कलर निवडा
तुम्ही या टिप्स फॉलो करत असाल, पण त्यात फक्त काळ्या रंगाचा समावेश नाही. होय, वजन लपविण्यासाठी फक्त काळा रंग प्रभावी ठरतो असे बहुतेक महिलांना वाटते, पण तसे नाही, बहुतेक गडद रंगाच्या साड्यांमध्ये ही जादू असते. म्हणजे, काळ्या व्यतिरिक्त, तुम्ही तुमच्या वॉर्डरोबमध्ये मरून, जांभळा, बॉटल ग्रीन अशा रंगांच्या साड्यांचा समावेश करू शकता.
छोट्या प्रिंटच्या साड्या घाला
साडी खरेदी करताना प्लस साइजच्या महिलांनी एक विशेष गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे लहान प्रिंट असलेल्या साड्या निवडणे. मोठ्या प्रिंट असलेल्या साड्यांमुळे बॉडी अधिक भरलेली दिसते, पण लहान प्रिंट असलेल्या साड्या तुम्हाला स्लिम लुक देतात.
स्लीव्ह पूर्ण ठेवा
साडीसोबत ब्लाउज निवडताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात जसे की त्याची स्लीव्ह. साडीमध्ये स्लिम दिसण्यासाठी शॉर्ट किंवा स्लीव्हलेसऐवजी फुल स्लीव्ह पर्याय निवडा. यामुळे हातांची चरबी सहज झाकली जाते आणि अशा स्लीव्हजही छान दिसतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.