Contact Lens: डोळ्यांच्या सौंदर्यासाठी तरुणांमध्ये वाढतोय फॅशनेबल लेन्सचा ट्रेंड

Contact Lens: लेन्सचा खर्च हा परवडणारा नसतो, तरीही अनेकजण फॅशनच्या नावाखाली त्याच्यावर खर्च करताना दिसून येतात.
Contact Lens:
Contact Lens:Sakal
Updated on

Contact Lens: लग्नसोहळा किंवा कोणताही कार्यक्रम असो, आपले सौंदर्य वाढविण्यासाठी अनेकजण डोळ्यात रंगीबेरंगी कॉन्टॅक्ट लेन्स टाकतात. हे रंगीत लेन्स आपल्या डोळ्यांना एक आकर्षक लूक देतात. ज्यामुळे आपले डोळे आणखी खास बनतात. तरुण, तरुणींमध्ये फॅशनेबल लेन्सचा ट्रेंड वाढत आहे. बाजारपेठेत १५० रुपयांपासून ते ४ हजार रुपयांपर्यंत विविध शेड्समध्ये लेन्स उपलब्ध आहेत.

फॅशनच्या जमान्यात पैशाला किंमत नाही. रोज फॅशन बदलते, नवीन काही तरी मार्केटला आपल्याला दिसून येते. फॅशनच्या जमान्यात तरुण असो की तरुणी फॅशनवर किती खर्च होणार, याकडे अजिबात बघत नाही.

प्रत्येकाला आपला लूक चांगला वाटला पाहिजे, यासाठी खर्च करण्यासाठी मागे-पुढे बघत नाही. अनेकजण फॅशनसाठी वेगवेगळ्या शेड्समधील लेन्स वापरतात. काही जणांना नंबरचा चष्मा लागलेला असतो, त्याच्यासाठी ते चष्मा न वापरता लेन्स वापरतात. परंतु, काही लेन्स हे वन टाइम म्हणून वापरता येतात, तर काही एक महिन्यासाठी, तर काही लेन्स तीन महिन्यांसाठी वापरता येतात.

लेन्सचा खर्च हा परवडणारा नसतो, तरीही अनेकजण फॅशनच्या नावाखाली त्याच्यावर खर्च करताना दिसून येतात. कॉलेज तरुण-तरुणी असो की विवाहित स्त्री-पुरुष असो, बहुतेक जण ब्रॅण्डेड कपडे, शूज, वॉच वापरताना आपल्या दिसतात. परंतु, त्याचबरोबर तरुणींमध्ये कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर वाढताना दिसत आहे. फॅशनसाठी आता वयाची अट नाही. प्रत्येकजण आज आपण आकर्षित कसे दिसू शकतो, याकडे जास्त लक्ष देताना दिसून येत आहे.

Contact Lens:
Sunglasses Fashion: 'या' डिझाईनचे चष्मे आहेत ट्रेडिंग, मिळेल हटके लूक

अशी घ्या खबरदारी....

नियमित डोळ्यांची तपासणी

लेन्स वापरण्यापूर्वी आणि नंतर नियमित डोळ्यांची तपासणी करा.

परिधान करण्याची मर्यादित वेळ

जास्त काळ लेन्स वापरू नका आणि डोळ्यांना विश्रांती द्या.

दर्जेदार उत्पादने

विश्वासार्ह ब्रॅण्डकडूनच लेन्स खरेदी करा आणि वापरा.

रंगीत लेन्स तुमचा लूक खुलवू शकतात, पण तुमच्या डोळ्यांचे आरोग्य सर्वात महत्त्वाचे आहे. या खबरदारीचा अवलंब करून तुम्ही स्टायलिश राहू शकता आणि डोळ्यांची काळजीदेखील घेऊ शकता.

जाणून घ्या तोटे...

संसर्गाचा धोका

रंगीत लेन्सची अयोग्य स्वच्छता आणि देखभाल केरायटिससारखे डोळ्यांचे संक्रमण होऊ शकते.

ऑक्सिजनची कमतरता

काही कॉन्टॅक्ट लेन्स डोळ्यांना पुरेसा ऑक्सिजन देत नाहीत, ज्यामुळे डोळ्यांच्या पृष्ठभागावर ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे समस्या उद्‍भवतात.

दृष्टीमध्ये बदल

चुकीच्या फिट किंवा खराब दर्जाच्या लेन्समुळे दृष्टीमध्ये तात्पुरते किंवा कायमचे बदल होऊ शकतात.

डोळ्यांची जळजळ आणि अस्वस्थता

दीर्घकाळ लेन्स घातल्याने डोळ्यांमध्ये जळजळ, लालसरपणा आणि कोरडेपणा येऊ शकतो.

ॲलर्जिक प्रतिक्रिया

काही लोकांना रंगीत लेन्सच्या काही घटकांवर ॲलर्जीची प्रतिक्रिया असू शकते, ज्यामुळे डोळ्यांना अधिक अस्वस्थता येते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.