Monsoon Footwear: पावसाळ्यात वापरा मान्सून फ्रेंडली फुटवेअर, दिसाल स्टायलिश

Monsoon Footwear: तुम्हाला पावसाळ्यात स्टायलिश फुटवेअर वापरायचे असेल तर पुढील टिप्स फॉलो करू शकता.
Monsoon Footwear:
Monsoon Footwear:Sakal
Updated on

Monsoon Footwear: देशभरात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. यामुळे सगळीकडे पावसाचे पाणी साचले आहे. अशात पावसामुळे आफली कामे थांबवू शकत नाही. कामानिमित्त आपल्याला घराबाहेर जावेच लागते. अशावेळी पावसाळ्यात महागडे शूज किंवा चप्पल घातल्यास खराब होण्याची समस्या अनेक लोकांना असते. तसेच घसरण्याची भीती देखील असते. तसेच पायांना दुर्गंध येणार नाही आणि पावसाच्या पाण्यामुळे कोणताही संसर्ग होत नाही. पावसाळ्यात कोणत्या प्रकराचे फुटवेअर वापरावे हे जाणून घेऊया.

  • पावसाळ्यात क्लोग्स वापरणे योग्य राहील. हे लगेच सुकतात आणि चालताना पायाला त्रास देखील होत नाही. तुम्हाला बाजारात विविध प्रकरात आणि रंगामध्ये मिळतील. तुम्हाला पावसाळ्यात जास्त चालायचे असेल तर हा उत्तम पर्याय आहे.

  • फ्लिप फ्लॉप आणि पूल स्लाइड्स पावसाळ्यात उत्तम पर्याय आहेत. हे घातल्यास तुम्हाला स्टायलिश लूक मिळेल. पावसाळ्यात असे फुटवेअर घातल्यास पायांना आराम मिळेल. पावसाच्या पाण्यामुळे पायांना कोणाताही संसर्ग होणार नाही.

Monsoon Footwear:
Monsoon Fashion Tips: पावसाळ्यात 'या' रंगाच्या साड्या नेसल्यास मिळेल सुंदर लूक
  • जर तुम्ही पावसाळ्यात स्टायलिश दिसायचे असेल तर वॉटर फ्रेंडली चप्पल वापरू शकता. पावसाळ्यात मजबुत चप्पल हवी असेल तर तुम्ही रबरी मटेरियलच्या चप्पल वापरू शकता. यामुळे चालताना तुम्हाला पायाला त्रास होणार नाही. बाजारात सहज असे चप्पल मिळतील.

पावसाळ्यात फिरताना कोणती काळजी घ्याल

ज्या ठिकाणी चिखल किंवा शेवाळ असेल त्या ठिकाणी जाणे टाळावे. कारण त्यावरून घसरण्याची जास्त शक्यता असते.

पावसाळ्यात जीर्ण चप्पल किंवा शूज घालू नका. अन्यथा पाय घसरू शकते.

पावसाळ्यात नेहमी जाड बॉटम असलेले फुटवेअर वापरावे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.