Fashion Tips : गौरी-गणपतीच्या समारंभांसाठी बेस्ट आहे हेअर ज्वेलरी; इथे आहेत ट्रेंडी ऑप्शन्स

साध्या हेअरस्टाईलला ट्रेंडी बनवणे अगदी सोपे आहे. यासाठी तुम्ही हेअर ज्वेलरी ट्राय करू शकता.
Fashion Tips
Fashion Tips esakal
Updated on

Fashion Tips :

लग्न असो किंवा सण, आपल्या सगळ्यांना नटायला  आवडते. समारंभात कसा लुक करायचा याचे प्लॅनिंग सुरू होते. त्यासाठी युट्युब,इन्स्टा सर्च केलं जातं. सणांमध्ये पारंपरिक दागिने अन् ड्रेसिंग स्टाईलला महत्त्व दिलं जातं.

पारंपरिक साडी,ड्रेसवर हेअरस्टाईल बनवण्याचा प्रश्न येतो तेव्हा आपण अनेकदा गोंधळून जातो.कोणत्या प्रकारची हेअरस्टाईल किंवा ॲक्सेसरीज करायची. असा प्रश्न पडला असेल तर काळजी करू नका.

सर्वांच्याच घरी गणपती आले आहेत आता गौरीही येणार आहेत. महिलांचा हा नटण्याचा सण आहे. साध्या हेअरस्टाईलला ट्रेंडी बनवणे अगदी सोपे आहे. यासाठी तुम्ही हेअर ज्वेलरी ट्राय करू शकता. केसांना लावल्यानंतर त्याचा लूक पूर्णपणे बदलतो. (Womens Fashion Tips)

Fashion Tips
Women Fashion : बीच पार्टीसाठी हे पफ स्लीव्हज ड्रेस करा स्टाईल, येथे पाहा लेटेस्ट डिझाईन्स..

तुम्ही तुमच्या केसांमध्ये कोणत्या प्रकारचे दागिने घालू शकता, त्यापासून कोणता वेगळा लुक करता येईल हे जाणून घेऊयात.

हेअर ब्रोच 

जर तुम्ही तुमच्या केसांमध्ये बन हेअरस्टाइल किंवा हाफ हेअरस्टाइल तयार करत असाल तर ते वेगळे दिसण्यासाठी तुम्ही हेअर क्लिप ज्वेलरी घालू शकता. हे अतिशय सुंदर डिझाइनमध्ये येते. जेव्हा तुम्ही एथनिक लुकवर अशी हेअर ज्वेलरी घालता तेव्हा तुम्हाला नक्कीच एक रिच लुक मिळतो.  

हेअर ब्रोचमध्ये तुम्हाला मोती,स्टोन असे वर्क केलेले दिसेल. याशिवाय यामध्ये तुम्हाला वेगवेगळे डिझाईन्स आणि आकार मिळतील. अशा केसांच्या क्लिप तुम्हाला बाजारात 200 ते 300 रुपयांना मिळतील.

Fashion Tips
Womens Fashion : अनारकली ड्रेस फिट नसेल तर झबलं घातल्यासारखंच वाटतं, या टिप्स वापरा अन् मिळवा परफेक्ट लुक
हेअर ब्रोच
हेअर ब्रोच esakal

हेअर ब्रोच विथ चेन

जर तुम्हाला ट्विस्टेड हेअरस्टाइल बनवायला आवडत असेल तर केस सुंदर दिसण्यासाठी तुम्ही ब्रोच चेन ज्वेलरी घालू शकता. यामध्ये तुम्हाला चेन इन लेयर मिळेल. यासोबत मध्यभागी एक ब्रोच मिळेल. यामध्ये तुम्हाला पेंडेंटचे डिझाईन बघायला मिळणार आहे. यामुळे केसांवर लावल्यानंतर ते छान दिसेल. हे ब्रोचेस बाजारात 200 ते 300 रुपयांना मिळतात.

हेअर ब्रोच विथ चेन
हेअर ब्रोच विथ चेन esakal
Fashion Tips
Women’s Fashion : जूने ब्लाउज फेकून देऊ नका, ही ट्रिक वापरा ब्लाउज पुन्हा परफेक्ट बसतील

बिंदी

तुमच्या हेअरस्टाईलला अनोखा टच देण्यासाठी तुम्ही बिंदी घालू शकता. यामध्ये तुम्हाला तीन ते एका लेयरच्या बिंदीचे डिझाईन्स मिळतील. गोल्डन ते मल्टी कलर डिझाईन्समध्ये तुम्हाला बिंदीचा प्रकार मिळेल. जे तुम्ही बाजारातून 200 ते 400 रुपयांना खरेदी करू शकता.

बिंदी
बिंदीesakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.