Flashback 2022 :यंदाचं वर्ष फॅशनउद्योगासाठी कसं होतं?

फॅशनविश्वात २०२२मध्ये काय ट्रेंड होते, ते पाहू.
fashion trends
fashion trends Sakal
Updated on

2022 मध्ये, फॅशन उद्योगाला जणू नवजीवन मिळालं. स्ट्रीटवेअर, स्पोर्टवेअर, चष्मे हे सगळं काही रनवे प्रेझेंटेशनमध्ये दिसलं. अनेक मोठमोठ्या ब्रँडनी करोनाकाळातील शिथीलता टाळत नवीन कलेक्शन आणली. काही इंडस्ट्री-शिफ्टिंग डिझायनर्सनी नवीन लेबल्सच्या सहाय्याने त्यांची पहिली आउटिंग सुरू केली. लिंगभेदभाव टाळणारी फॅशन यंदा विशेषकरून दिसली. अर्थात डिजिटल युगात व्हायरल होण्याचा सोस मात्र कुणालाच आवरला नाहीये. प्रत्येकजण त्यासाठी प्रयत्न करतो आहे.

fashion ramp walk
fashion ramp walksakal

रॅम्प बहरले

कोरोनाकाळात सगळेच उद्योग थंडावले होते. मग फॅशन कसा अपवाद असणार. त्यातही हा तर लक्झुरिअस उद्योग मग त्यामुळे तो तर सुरू राहण्याचा फारसा प्रश्नच नव्हता. न्यूयॉर्क, लंडन, पॅरीस सगळीकडेच कोरोना आल्याने काही सीझन्स असेच भाकड गेले. म्हणजे रॅम्पवॉक्स झालेच नाही. फॅशन शो झाले नाही. फॅशन उद्योगांसाठी हे काही फारसं बरं नव्हतं. पण त्यानंतर मात्र हळूहळू रॅम्प बहरु लागले. अनेक मोठमोठ्या ब्रँड्सनी निरनिराळे प्रयोग केले. कोपर्नीचा स्प्रे पेंटेड फॅब्रिकन ड्रेस हा एक असाच भन्नाट प्रयोग होता. मॉडेलच्या अंगावर स्प्रे पेंटिंगच्या माध्यमातून चक्क ड्रेस पेंट केला गेला. आणि रंगांनी नव्हे तर कापडाच्या धाग्यांनी. हा ड्रेस खऱ्याखुऱ्या कापडाचा होता. स्प्रेद्वारे चक्क कापडाचे कण मॉडेलच्या अंगावर उडवले गेले त्यातून कपड्यांच्या ड्रेसची निर्मिती झाली. अशाप्रकारे स्प्रेपेटिंगपासून कापडनिर्मितीचा प्रयत्न फारच नाविन्यपूर्ण होता.

coperni spray painting dress
coperni spray painting dress

जस्ट कूल ब्रो

काहीही गंभीरपणे घ्यायचं नाही. मस्त मजेत राहायचं हा फंडा फॅशन जगताने यंदा पाळला. कारण फॅशन म्हणजे झगामगा, थाट दिसला तरीही इथे अनेक लहानमोठ्या गोष्टींकडे कायमच गांभीर्याने पाहिलं जातं. परंतु यंदा मात्र कलेक्शनमध्ये थोडी गंमत आणायचा प्रयत्न केला. बॉटरचे काँडोम ग्लोव्हज, लोवेचे अनोखे ८ बिट टीशर्ट्स, बीट कार्लसनचे ट्रिपी टॉर्मेंट, तसंच गुकीचे डबल ऑल असे अनेक निरनिराळे आणि गमतीशीर प्रयोग यंदा फॅशन उद्योगाने केले.

fashion
fashion

नेहमीच्या फॉर्मल्सना सुट्टी

एकतर बहुतांश जगाने वर्क फ्रॉम होमचा फंडा आपलासा केला होता. त्यामुळे तसंही फॉर्मल वेअर्सना फारसा भाव राहिला नव्हता. पुन्हा ऑफिसेस सुरू झाल्यानंतरही अनेकजण रोज ऑफिसात जायला राजी नव्हते. त्यामुळे टिपीकल फॉर्मल्सना सुट्टी देत, मिक्स कपड्यांच्या रेंज बाजारात आल्या. फॉर्मल्ससारखे दिसणारे तरीही फार गंभीर नसणारे कपडे जास्त ट्रेंड झाले. ऑफिसवेअर्समध्ये कलर्सही थोडेफार दिसू लागले. करोनाच्या मोठ्या सुट्टीनंतर परत ऑफिसला यायचं तर वातावरण थोडंसं रंगीत तर हवं होतं ना बॉस....

fashion trends
Flashback 2022 : या सरत्या वर्षामध्ये कसं होतं देशाचं आरोग्य?

एकूणच यंदाचं हे वर्ष फॅशन उद्योगासाठी कसं गेलं, याबद्दल आम्ही मराठी फॅशन डिझायनर नचिकेत बर्वेशी बोललो. नचिकेत म्हणाले, २०२२ हे वर्ष आम्हा फॅशन डिझायनर्ससाठी चांगलंच गेलं. एकतर करोनाकाळातून नवी भरारी घेतली दुसरं म्हणजे या वर्षात लोकांनी क्वालिटीला महत्त्व दिलं असं वाटतं. माइंडफुल कंझम्पशन ज्याला म्हणतात ते वाढलं. रिसायकल्ड फॅशनकडे लोकांचा कल वाढला. एखाद्या गोष्टीसाठी चार पैसे जास्त मोजू दुसरी एखादी गोष्ट कमी घेऊ पण जे घेऊ ते चांगल्याप्रतीचं घेऊ, असा ग्राहकांचा उद्देश्य होता. माझ्याकडचे जे कारागिर मी करोनाकाळात घरी पाठवले होते. ते सगळे परत आले. मी त्यांनासुद्धा चांगले रिटर्न्स देऊ शकलो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()