Stomach Fat Loss Tips: बदललेल्या कामाच्या पद्धतीमुळे आणि जंक फूडमुळे सध्या बरेच लोक पोटाच्या चरबीच्या समस्येने त्रस्त आहेत. जे लोक तासंतास एकाच ठिकाणी बसून काम करतात त्या लोकांमध्ये ही समस्या खूप प्रकर्षाने जाणवते. पोटावर वाढलेली चरबी सहजासहजी कमी होत नाही. त्यावर उपाय म्हणून बाजारात बरेच प्रॉडक्ट्स मिळतात, परंतु तज्ज्ञांच्या अनुसार हे प्रॉडक्ट्स वापरणे अयोग्य आहे.
खूप वेळ एका ठिकाणी बसून पोटाची चरबी वाढते. आणि नंतर ही चरबी कमी व्हायलासुद्धा खूप वेळ लागतो. बऱ्याच जणांना असं वाटतं की काही दिवस विशिष्ट व्यायाम केला की लगेच पोटाची चरबी कमी होते. पण वास्तविक पहिलं तर असं नसतं.