वडिलांवर प्रेम करता ना?; या दिवसामागील खास कारण माहितीये का?

घरात शिस्तीचं वातावरण निर्माण करणारा हा बाबा मनातून प्रचंड हळवा असतो.
Fathers day
Fathers day
Updated on

वडील (fathers)...आपल्या आयुष्यातील अशी एक व्यक्ती जी कायम खंबीरपणे आपल्या पाठीशी उभी असते. आयुष्यात कितीही वादळ, संकट आली तरीदेखील या संकटांची झळ ते आपल्या मुलांना लागू देत नाहीत. घरात शिस्तीचं वातावरण निर्माण करणारा हा बाबा मनातून प्रचंड हळवा असतो. म्हणूनच, मुलगी सासरी जायला निघाली की एका कोपऱ्यात बसून ढसाढसा रडतो. आज त्याच बाबाचा हक्काचा दिवस अर्थात फादर्स डे (fathers day). आज सगळीकडे या दिवसाचं मोठ्या थाटात साजरा केला जातो. आपल्या वडिलांप्रतीचं प्रेम, आदर व्यक्त करण्यासाठी हा दिवस असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळेच अनेक मुलं आपल्या बाबांना या दिवशी छान गिफ्ट देऊन हा दिवस सेलिब्रेट करतात. परंतु, हा दिवस नेमका का साजरा करतात माहित आहे का? जर नसेल माहिती तर आज आपण जाणून घेऊयात. (fathers-day-2021-date-history-importance-and-why-we-celebrate-fathers-day)

जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला जातो. हा दिवस कधीपासून सुरु झाला किंवा कोणत्या देशापासून त्याची सुरुवात झाली हे फार कमी जणांना माहित आहे. म्हणूनच, वडिलांना गिफ्ट देण्यापूर्वी किंवा हा दिवस सेलिब्रेट करण्यापूर्वी त्याचं महत्त्व, इतिहास नक्कीच जाणून घेतला पाहिजे. विशेष म्हणजे 'फादर्स डे'चा प्रत्येक ठिकाणचा इतिहास हा थोडा वेगवेगळा आहे.

Fathers day
Father’s Day : वडिलांना देऊ शकता 'हे' भन्नाट गॅझेट्स

अमेरिकेमध्ये पहिल्यांदा 'फादर्स डे' सेलिब्रेट करण्यात आला. १९१३ मध्ये अमेरिकन सरकारने 'मदर्स डे'ला अधिकृतपणे मान्यता दिली होती. मात्र, फादर्स डे देखील असावा असा विचार कोणाच्या मनात आला नाही. परंतु, तब्बल ६० वर्षांनंतर फादर्स डे सेलिब्रेट झाला पाहिजे अशी चर्चा सुरु झाली आणि १९७२ मध्ये 'फादर्स डे' जाहीर करण्यात आला. आजही अमेरिका व इंग्लंडमध्ये फादर्स व 'मदर्स डे' हे दोन्ही दिवस जून महिन्याच्या तिसऱ्या आठड्यात साजरे केले जातात. त्यानंतर जगातील जवळपास ७० देशांमध्ये जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला जाऊ लागला.

इटली, स्पेन, पोर्तुगालमध्ये १९ मार्च रोजी सेंट जोसेफच्या वाढदिवसानिमित्त 'फादर्स डे' साजरा केला जातो. दुसऱ्या महायुद्धानंतर हा दिवस साजरा केला जाऊ लागल्याची म्हटलं जातं.

दरम्यान, पाश्चात्य देशांमध्ये या दिवसाच जंगी सेलिब्रेशन असतं. अनेक मुलं आपल्या वडिलांना डिनर किंवा लंचला घेऊन जातात. काही जण भेटवस्तू देतात. आपल्याकडे फादर्स डेची संकल्पना फारशी रुजली नसली तरीदेखील अनेक जण हा दिवस आपआपल्या परिने सेलिब्रेट करत असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.