Father’s Day 2024 : पौराणिक काळातील पिता-पुत्रांची जोडी, ज्या कलियुगातही आहेत आदर्श

हिंदू धर्मात वडिलांना देवापेक्षा श्रेष्ठ मानले जाते. वडील घराचा भक्कम पाया असतात.
Father’s Day 2024
Father’s Day 2024esakal
Updated on

Father’s Day 2024 :

फादर्स डे दरवर्षी जूनच्या तिसऱ्या आठवड्यात साजरा केला जातो. यंदाचा फादर्स डे आज आहे. हिंदू धर्मात वडिलांना देवापेक्षा श्रेष्ठ मानले जाते. वडील घराचा भक्कम पाया असतात. तर, त्यांचे घरातील अस्तित्व हे मनाला आधार देणारं असतं. आपल्याला असलेल्या खंबीर पाठींब्याच्या ऋणातून मुक्त होण्याचा दिवस म्हणजे फादर्स डे होय.

बाबा आणि मुलांचे नाते पुरातन काळापासून प्रसिद्ध आहे. पुत्र विरहामुळे राजा दशरथांनी प्राण त्यागले होते. तर, श्रवणकुमाराने वडिलांच्या प्रेमापोटी कावडीतून तिर्थयात्रा घडवण्यासाठी बाहेर पडला होता. आज वडीलांच्या सन्मानार्थ असलेल्या या दिवसाची सुरूवात आपण अशाच पुरातन पिता-पुत्राच्या जोडीबद्दल माहिती घेऊन करूयात.

राजा राम आणि राजा दशरथ

रामायणात राजा दशरथाचे आपल्या ज्येष्ठ पुत्र श्री राम यांच्यावर खूप प्रेम होते. त्याला आपला मुलगा श्री राम यांना राजा बनवायचे होते. पण पत्नी कैकेयीला दिलेल्या वचनामुळे त्यांनी श्री रामांना वनवासात पाठवले. राम वनवासाला गेल्यामुळे त्यांना पुत्रापासूनचा वियोग सहन न झाल्याने त्यांनी प्राणत्याग केला.

Father’s Day 2024
Father's Day 2024 : जगातलं सुरक्षित आभाळ म्हणजे ‘बाप’

शंतनू आणि भीष्म

भीष्म महाभारत या संस्कृत महाकाव्यात उल्लेखलेला कुरुवंशीय राजपुत्र होते. हस्तिनापुराचे कुरुवंशीय राजे शंतनू व गंगा यांचा हा पुत्र होता. शंतनूचे धीवरकन्या सत्यवती हिच्याशी लग्न व्हावे व तिच्याच पुत्राला हस्तिनापुराचे राज्य मिळावे, म्हणून भीष्माने हस्तिनापुराच्या सिंहासनावरील आपला हक्क सोडण्याची व आजन्म ब्रह्मचारी राहण्याची शपथ घेतली. त्याच्या या कृत्यामुळे शंतनूने प्रसन्न होऊन त्याला इच्छामरणाचा वर दिला होता.

Father’s Day 2024
Happy Father’s Day 2024 : गिफ्ट म्हणून नव्हे तर गरज म्हणून, तुमच्या थकलेल्या वडिलांना या गोष्टी नक्की द्या!

अर्जून आणि अभिमन्यू

अभिमन्यू महाभारतातील अर्जुन व सुभद्रेचा पुत्र होता. तो कृष्णाचा भाचा असून चक्रव्यूह भेदण्याचे ज्ञान त्याला आईच्या पोटात असतानाच मिळाले होते. चक्रव्यूह भेदण्याचे असे ज्ञान असणाऱ्या केवळ ४ व्यक्ती होत्या त्यापैकी अभिमन्यू एक होता.

अर्जुनचेही मुलगा अभिमन्यूवर खूप प्रेम होते. जेव्हा अभिमन्यूला युद्धात कौरवांनी मारला होता. आपल्या मुलाच्या मृत्यूनंतर, त्याने शपथ घेतली की आपण सूर्यास्ताच्या आधी जयद्रथाचा वध करीन.

Father’s Day 2024
Pankaj Tripathi Father Death: पंकज त्रिपाठीच्या वडीलांचे निधन, अभिनेत्याच्या परिवारावर शोककळा

वनराज बाली आणि अंगद

रामायणात वानरराजा बालीने मरताना आपला मुलगा अंगद याला रामाच्या स्वाधीन केले. बालीमुळेच अंगदला त्याच्या सामर्थ्याची जाणीव झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.