Father's Day 2024 : जगातलं सुरक्षित आभाळ म्हणजे ‘बाप’

Father's Day 2024 : वडील म्हणजे फक्त नाते नाही तर ती जबाबदारी आहे.
Father's Day 2024 :
Father's Day 2024 : Sakal
Updated on

पृथा वीर

Father's Day 2024 : बाबा हा शब्द कानावर पडताच एक बळ येत. विश्वास वाटतो आणि सुरक्षित वाटत. वडील म्हणजे फक्त नाते नाही तर ती जबाबदारी आहे. तो नोकरी करतो नाही, शेती करतो. गरज पडली तर पाठीवर ओझे वाहतो. घरी आपली कुणी वाट पाहते आहे, असा विचार करून त्याला आपल्या रोजच्या कामाची इतकी सवय असते की तो जबाबदारीने सगळे करतो. विषय त्याच्याही पोटापाण्याचा असतो. पण त्याला आपल्या कुटुंबाची चिंता असते. तो संघर्ष करतो, कष्ट करतो, प्रसंगी बोलणेही खातो. पण दिवस संपता संपताचार पैसे हातात घेऊनच घरी परततो.

आठवते जेवण करणारी

प्रेमळ आई,

त्या शिदोरीची सोय

ही बाप पाही..

प्रत्येकाच्या आयुष्यात वडिलांचे स्थान मोठे. वडिलांप्रती एक आदरयुक्त भीती घेऊनच मुल लहानाची मोठी होतात. तो कधी मुलाच्या खांद्यावर हात ठेवणारा मित्र असतो. कधी  छातीवर डोके ठेवून रडणाऱ्या मुलीच्या मागे खंबीरपणे उभा राहणारा बाप असतो. त्याच्या रागावण्यात काळजी असते. मुल मोठी होतात. आपले निर्णय आपणच घेतात. पण आई- वडील रिटायर्ड होत नाही. उतारवयातही ते आपल्या अनुभवाचे संचित घेऊन ठामपणे उभे असतात. आपल्या मुलात ते स्वतःला शोधत असतात.

आई मऊ मेणासारखी आणि वडील वज्रासारखे कठोर वाटतात. हा कठोरपणा व्यवहाराने आणि अनुभवानेच येतो. गर्दीत, यात्रेत, मिरवणूकीत, वारीमध्ये मुलाला खांद्यावर उचलून धरणारा खंबीर बाप घामाघूम होतो. पण मुलाला खांद्यावरून खाली उतरवत नाही. ही ताकद त्याला तो सर्वशक्तिमान पिताच देत असावा. आजच्या स्पर्धेच्या काळात त्या बापाला अधिक संघर्ष करावा लागतो. तो तरीही तयार असतो. तो परिस्थितीशी लढतो आणि आपल्या कुटुंबासाठी तो काहीही करतो. म्हणून घरी दमून आलेल्या वडिलांकडे मुल छेप घेतात तेव्हा त्या बापाचा थकवा कुठे दूर पळतो. आपल्या बालपणीच्या इच्छा मनातच राहल्या.

Father's Day 2024 :
Father's Day Gift Ideas: तुमचे वडिल कॉफी लव्हर आहेत? मग, फादर्स डे निमित्त द्या 'हे' खास गिफ्ट

तरीही मुलांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी बाप झगडतो. त्याच बापाला उतारवयात वृद्धाश्रमात जावे लागते तेव्हाही तो अटल असतो. जुन्या वृक्षासारखा. कधी हा बाप मुलांच्या आजारपणात त्याच्यासाठी झुरताना दिसतो. तर कधी मुलीच्या चेहऱ्यावर एक हसू याव म्हणून तो त्याच्या क्षमतांच्या पलीकडे जावून संघर्ष करतो. ''कशाला मुलीला शिकवायचे'' असा विरोध झुगारून मुलीच्या मागे ठामपणे उभा राहणारा बाप आपल्या आजूबाजूला दिसतो. त्याच मुलीने परीक्षेत यश मिळवले की तो आनंदाने पेढे वाटतो. तोच बाप सासरी जाणाऱ्या मुलीला निरोप देताना लहान मुलासारखा ढसाढसा रडतो. आई-वडील दोघेही सारखे. पण आईच्या डोळ्यात चटकन पाणी येत आणि बापाची ओली किनार दिसत नाही. मूल कितीही मोठे झाले तरी पितृछत्र नसलेल्याला विचारा वडील नसणे म्हणजे काय.  म्हणूनच कुणी म्हटलाय.. 

माया बाबांची असते कस्तुरीपरी 

दिसली नाही वरून जरी

जाणावी ती अंतरी…

जून महिन्याचा तिसरा रविवार म्हणजे फादर्स डे म्हणूनच आजचे मुक्तपीठ सर्व बाबांसाठी..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.