FC Road Shopping : इथे मिळतील एकदम डिझायनर आणि स्टायलिश कुर्ते, तेही फक्त ५०० रुपयात

एफ सी रोड फक्त खाण्यासाठी प्रसिध्द नाहीये तर इथल्या वेगवेगळ्या फॅशनच्या ड्रेसेस आणि ज्वेलरीसाठीही प्रसिध्द
FC Road Shopping
FC Road Shoppingesakal
Updated on

FC Road Shopping : पुण्याचा फर्ग्युसन कॉलेज रस्ता सगळ्यांना माहिती आहे. अनेक लोकं त्याला एफ सी रोड म्हणून ओळखतात. पुण्यातला एफ सी रोड खूप लोकांना माहिती आहे. तिथल्या स्ट्रीट साईड फूड पासून तर मोठमोठ्या रेस्ट्राॅरंट, बार पर्यंत तर छोट्या छोट्या कॅफेसाठीही हा रोड खूप प्रसिद्ध आहे. अनेक तरुण मुलं इथे फिरायला येत असतात.

FC Road Shopping
Aloo Methi Bhaji Recipe : मुलं पालेभाज्या खात नाहीयेत? मग या पद्धतीने ट्राय करा बटाटा मेथी भजी रेसिपी

एफ सी रोड फक्त खाण्यासाठी प्रसिध्द नाहीये तर इथल्या वेगवेगळ्या फॅशनच्या ड्रेसेस आणि ज्वेलरी साठीही प्रसिध्द आहे. गुडलक चौकातून सुरू होणारा इथला बाजार थेट फर्ग्युसन कॉलेज पर्यंत पसरलेला आहे.अगदी पारंपारिक ड्रेसेस पासून, स्कर्ट, कुर्ते, वन पिस, क्रॉप टॉप, जीन्स, स्कार्फ, स्वेटर, हॅट्स इथे सगळं मिळतं. अगदी ब्रँडेड दुकानही इथे आहेत.

FC Road Shopping
Cucumber Thalipeeth Recipe : बनवा खूशखुशीत,खमंग अन् हेल्दी काकडीचे थालीपीठ

तुम्हीही प्रत्येका ओकेजनसाठी परफेक्ट अशी स्वस्तात मस्त अशा कुर्तींच्या शोधत असाल तर इथे तुम्हाला ती नक्की मिळतील. शिवाय इथे तुम्ही बार्गिनिंग सुद्धा करू शकतात. पण नक्की कोणते कुर्ते घ्यावे यात कन्फ्युज होऊ नका, आधीच स्टाईल ठरवून जा. म्हणजे तिथे तुमची तारांबळ उडणार नाही.

FC Road Shopping
Palazzo Fashion : रेग्युलर प्लाजो वर अशा टॉप्सने क्रिएट करा वेस्टर्न लुक

१. टेल कट कुर्ता

हा कुर्ता तुमच्याकडे असलाच पाहिजे, अनेकदा मधून याला एक कट असतो, किंवा हे कुर्ते पुढून जरा लहान आणि मागून छान झग्यासारखे दिसतात. हा कुर्ता तुम्ही कोणत्याही ओकेजनला घालू शकतात आणि गंमत म्हणजे या कुर्त्या खाली तुम्ही जिन्स, स्कर्ट, पलाझो, लेगिन असं काहीही घालू शकतात.

FC Road Shopping
Mens Short Kurta Fashion : तरूणांनो तीच स्टाइल करून कंटाळलात? शर्ट्समध्ये आलाय हा नवा ट्रेंड

२. धोती स्टाईल कुर्ता

शॉर्ट कुर्त्यांमध्येही खूप प्रकार आहेत त्यातला एक म्हणजे हा. याला खूप सुंदर फ्रील असते, जिन्स, स्कर्ट आणि पलाझो वर तर ते सुंदर दिसतातच पण धोती पँटवर याची एक वेगळीच मजा असते.

FC Road Shopping
Wedding Fashion Tips : पेस्टल रंगाच्या साडीत कतरिना दिसतेय कडक; लग्नसराईत तिचा लुक करा रिक्रीएट!

३. इंडो वेस्टर्न कुर्ता

तसे इंडो वेस्टर्न कुर्त्यांचे एकाच प्रकार आहे अस नाही, वेगवेगळ्या प्रकारात इंडो वेस्टर्न कुर्ता येतात पण त्यातल्या त्यात हा एक प्रकार खूप जास्त चालतो आहे. थ्री पिस ड्रेस असतो, शॉर्ट कुर्ता, पलाझो आणि लाँग श्रग हा दिसायला खूप सुंदर दिसतो.

FC Road Shopping
Holiday Calendar 2023 : पुढचं वर्ष खाणार सगळ्या सुट्ट्या; वीकेंडलाच आले आहेत सगळे सण

४. केप कुर्ती

सध्या सेलिब्रिटी सुद्धा असे कुर्ते घालतांना दिसत आहे. केप कुर्ते हे दिसायला खूप स्टायलिश दिसतात. रेग्युलर कुर्त्याच्या कापडाला वरच्या बाजूने एका शॉर्ट जॅकेट सारखं अजून एक नेटच कापड असतं. ज्याने ते खूप सुंदर दिसतात. तुम्ही हे कुर्ते वन पिस म्हणूनही घालू शकतात.

FC Road Shopping
Pregnency Tips : अजब नियम! बाळंतपणात रडण्या-ओरडण्यावर आहे बंदी

५. डबल लेयर्ड कुर्ता

डबल लेयर्ड कुर्ता हा खूप स्टायलिश दिसतो. त्याला आजूबाजूने नॉट पण असतात ज्यामुळे आपण याला आपल्या स्टाईल प्रमाणे चेंज करू शकतो आणि हवं तर आपल्या बॉडी फिगर नुसार आपण त्यांना अॅडजस्ट करू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.