- डॉ. मलिहा साबळे, मानसिक आरोग्यतज्ज्ञ, संस्थापक व संचालक - द हेल्दी माइंड
प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या गोष्टीला घाबरत असतो; भीती हा मानवी अनुभवाचा एक अपरिहार्य पैलू आहे. लोक सामान्यतः भीतीला एक अप्रिय भावना मानतात; परंतु काही जण तिला उत्तेजितही करतात- उदाहरणार्थ, विमानातून उडी मारून किंवा भीतीदायक चित्रपट पाहून.