आपण जेव्हा नात्यामध्ये असतो तेव्हा आपल्याला सर्वात आधी प्राधान्य(priority) मिळाले पाहिजे असे वाटते असते पण नेहमीच असे होत नाही. काही लोकांना असे वाटते त्यांच्या जोडीदाराच्या पहिल्या प्रेमाऐवजी आपण फक्त पर्यायी(Back-UP) आहोत. जे लोक विधवा किंवा विधुर यांच्यांसोबत डेटिंग करताना, स्वत:ती तुलना मृत (भुतकाळातील) जोडीदारासोबत करतात आणि नेहमी असुरक्षितपणाची भावना आणि चिंता असतात
रिलेशनशीप एक्सपर्टनुसार, ''ही एक सामान्य भावना आहे आणि याचा अर्थ असा नाही की तुमच्या नशिबात प्रेम नाही. तथापि, या भावना मुख्य समस्या बनण्यापूर्वी त्याकडे लक्ष देणे महत्वाचे आहे. तुम्ही नात्यामध्ये दुसरी निवड आहात असे वाटणे हे चांगल्या आणि परिपूर्ण नातेसंबंधासाठी(ईाोतूग चांगले नाही."
दुसरी निवड (second choice)किंवा पर्याय(Back-UP)आहोत असे वाटणे सामान्य आहे. परंतु तज्ञांचे म्हणणे आहे की, जर असे स्पष्टपणे व्यक्त केले नसेल तर ते तुमच्या नातेसंबंधावर आणि मानसिक आरोग्यावर परिणाम करू शकते.
मी 'ती' खास व्यक्त नाही? असे का वाटते
नात्यामध्ये आपण दुसरी निवड आहोत असे वाटण्यामागे विविध कारणे आहेत. कधीकधी, आपल्या जोडीदाराच्या पूर्वीच्या नातेसंबंधांबद्दल विचार करताना आपल्याला हेवा वाटतो. इतर वेळी, एखाद्या प्रिय व्यक्तीच्या भूतकाळातील जोडीदारासोबत्या चांगल्या आठवणी ऐकताना आपण स्पर्धा करत असल्याचे जाणवते. कोणत्याही प्रकारे, या भावना तुमच्या मानसिक आरोग्यावर आणि नातेसंबंधावर परिणाम करू शकतात.
"पहिल्या प्रेमाच्या बाबतीत, आपल्यापैकी बर्याच जणांना त्या व्यक्तीच्या गोड आठवणी असतात, आणि जेव्हा आपण त्यांच्याबद्दल खूप भावूक होऊन बोलतो तेव्हा आपल्या जोडीदारांना असुरक्षित वाटू शकते. परंतु काहीवेळा, या भावनांचा आपल्या जोडीदाराशी संबंध कमी असतो आणि आपल्या मनातील आंतरिक असुरक्षितता आणि स्वत:वर शंका घेणे अशा भावनांशी जास्त संबंध असतो." असे पेपर श्वार्ट्झ म्हणतात जे वॉशिंग्टन विद्यापीठात नातेसंबंध आणि लैंगिकता या विषयात तज्ञ असलेले समाजशास्त्राचे प्राध्यापक आहेत.
"जर तुमच्या जोडीदारासोबत राहिल्याने दुसरी निवड असण्याची भावना निर्माण होत असेल, तर या भावनांचा उगम कोठून झाला याचा विचार करा," असे ऍपलबरी सुचवते.
उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती ज्याला मोठे होत असताना आपला सेंकड बेस्ट असे वाटत असेल ते अजाणतेपणे अशा प्रकारचे नाते शोधू शकतात जे 'आपण इतके चांगले नाही" या त्यांच्या मनातील आधीपासून नकारात्मक विश्वासाला समर्थन देतात ," असेही तिने सांगितले.
तुमच्या जोडीदाराने एखाद्या प्रिय व्यक्तीला गमावल्यास हे विशेषतः आव्हानात्मक असू शकते. तुमच्या जोडीदाराने त्यांच्या दिवंगत जोडीदारासोबत आलेल्या अनुभवांवर भर दिल्यामुळे आता प्रेमात पडला तो व्यक्ती घडला आहे.
"निरोगी नातेसंबंधांमध्ये, तुमच्या जोडीदाराच्या पूर्वीच्या नातेसंबंधाचा आदर आणि सन्मान करायला जागा असते, तरीही तुम्ही जे एकत्र आहात ते वेगळे आणि खास आहे हे समजून घेतले पाहिजे," असेही ती म्हणते. "म्हणून तुमच्या जोडीदाराचे त्यांच्या मृत जोडीदारासोबत चांगले नाते असले तरी, याचा अर्थ असा नाही की तुमचाही नाते संबंध चांगले असू शकत नाही."
श्वार्ट्झ सांगते की, लोकांचे अनेकदा अनेक प्रेमळ, संस्मरणीय भूतकाळातील नातेसंबंध असतात आणि त्यामुळे तुमचे संबंध खराब होत नाही. हा फक्त एक "वेगळा अनुभव" आहे.
"सर्व नातं हे वेगळ असते, परंतु तुम्ही हे स्वीकारले पाहिजे आणि तुमच्याकडे स्वतःच्या अशा गुण आहे जे तुमच्या जोडीदाराच्या पूर्वीच्या नातेसंबंधांपेक्षा वेगळे आहेत हे समजून घेतले पाहिजे" असेही ती म्हणते.
आपण फक्त पर्याय म्हणून आहोत असे वाटणे आणइ प्रत्यक्षात तसे वागविले जाणे या दोन्हीमध्ये फरक आहे आणि जोडीदाराला प्रेम आणि आश्वस्त असल्यासारखे वाटणे महत्वाचे आहे.
"एक्स जोडीदार आणि तुमचा जोडीदार चांगले मित्र असू शकतात, परंतु असे वाटू नये की, तुमचा जोडीदार त्यांच्याशी कोणत्याही प्रकारची जवळीक निर्माण करत आहे आणि तुमच्याशी शेअर करत नाहीत," असे श्वार्ट्ज यांनी सांगतिले.
तुमचा जोडीदार जर उघडपणे तुमची तुलना त्याच्या पूर्वीच्या जोडीदाराशी करू शकता, ज्यामुळे तुम्हाला कमीपणाची भावना निर्माण होते.
तुमच्या जोडीदाराने तुमच्यासोबत हेल्दी, प्रेमळ नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी जास्त कष्ट घेत नसेल
तुमचा जोडीदार जर दुसऱ्या कोणासोबत राहणे पसंत करेल असे म्हणत असेल तर
तुमचा जोडीदार तुमच्या चिंता मान्य करत नाही किंवा त्यांचा आदर करत नाही.
जर तुम्हाला वाटत असेल की, तुम्ही तुमच्या जोडीदाराची दुसरी निवड आहात तर चांगल्या नातेसंबंधात, मोकळेपणाने संवाद आणि प्रामाणिकपणा असणे गरजेचे आहे हे ललक्षात ठेवा असे ऍपलबेरी सांगते., "तुम्ही त्यावर एकत्रितपणे चर्चा करू शकाल आणि दोघांसाठी हा एक सोयीस्कर निर्णय घेऊ शकता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.