Healthy Tips: सर्दी, खोकल्यासोबत डोकेदुखीचाही ताप! महापालिका अलर्ट

Healthy Tips: महापालिकेच्या आरोग्य केंद्रासह गल्ली-बोळातील रुग्णालयात रुग्णांची गर्दी वाढली आहे. विशेषतः लहान मुले, वृद्ध नागरिकांचा त्रास वाढला आहे. त्यामुळे महापालिकेचा आरोग्य विभाग अलर्ट मोडवर असून, डेंगी, चिकनगुण्या, झिकाच्या साथीच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांना आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Healthy Tips
Healthy TipsSakal
Updated on

Healthy Tips: शहर परिसरात काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असून, अधूनमधून रिमझिम तर कधी भुरभुर पाऊस होत आहे. त्यामुळे तयार झालेल्या दमट वातावरणात अनेक भागांत साथीचे रुग्ण वाढले आहेत.

सर्दी, ताप, खोकल्याचे घरोघरी रुग्ण आढळून येत असून, महापालिकेच्या आरोग्य केंद्रासह गल्ली-बोळातील रुग्णालयात रुग्णांची गर्दी वाढली आहे. विशेषतः लहान मुले, वृद्ध नागरिकांचा त्रास वाढला आहे. त्यामुळे महापालिकेचा आरोग्य विभाग अलर्ट मोडवर असून, डेंगी, चिकनगुण्या, झिकाच्या साथीच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांना आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शहरात आतापर्यंत डेंगी संशयित दोन मुलांचा मृत्यू झाला. त्यामुळे महापालिका प्रशासनाने दाट लोकवस्तीतील नागरिकांच्या रक्ताचे नमुने एनआयकडे तपासणीसाठी पाठविले आहेत तर दुसरीकडे डेंगी, चिकनगुण्या, झिका हे कीटकजन्य आजार व गॅस्ट्रो, कावीळ, कॉलरा, अतिसार या सारख्या जलजन्य आजाराचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाययोजना सुरू करण्यात आल्या. शहरात घरोघरी जाऊन फवारणी केली जात असून, पाण्याची साठवण केलेले हौद, टाक्यांची तपासणी केली जात आहे.

ज्याठिकाणी डास अळ्या आढळून आल्या तेथील पाणीसाठे रिकामे केले जात आहेत; तसेच ॲबेट औषध टाकून डास अळ्या नष्ट केल्या जात आहेत. अतिधोकादायक भागात पाणी साठलेल्या ठिकाणी जळालेले ऑइल टाकले जात आहे. असे असले तरी नागरिकांनी आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळून महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासक जी. श्रीकांत, सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना राणे यांनी केले आहे.

Healthy Tips
National Vanilla Ice Cream Day: घरीच बनवा व्हॅनिला आईस्क्रीम, जाणून घ्या बनवण्याची पद्धत

नागरिकांनी काय करावे

डेंगी, चिकनगुण्या व झिका हे विषाणूजन्य आजार आहेत.

हे आजार ‘एडिस इजिप्ती’ हा डास चावल्याने होतात.

हा डास साठवलेल्या स्वच्छ पाण्यात अंडी घालतो.

त्यामुळे डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करावित.

प्रत्येक आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा.

कूलर, फुलदाण्या, मनी प्लँटमधील पाणी बदला.

सांडपाण्यात ॲबेट (टेमीफॉस) हे औषध टाका.

साचलेल्या पाण्यात रॉकेल, जळालेले ऑइल टाकावे.

हौदामध्ये गप्पी मासे सोडावे.

डास प्रतिबंधात्मक मलम, उदबत्त्या, वड्या यांचा वापर

झोपताना अंगभर कपडे घालावे व मच्छरदाणीचा वापर.

धूर फवारणी, ॲबेट टाकणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य

शुद्ध केलेले पाणी पिण्यासाठी वापरावे.

अन्नपदार्थ नेहमी शिजवून व ताजे खावे, शिळे अन्न टाळा.

उघड्यावरील कापून ठेवलेली फळे, अन्नपदार्थ टाळा.

जास्त पिकलेली, कुजलेली, सडलेली फळे खाऊ नका.

अन्न शिजवण्यापूर्वी, जेवणापूर्वी तसेच शौचास जाऊन आल्यावर साबणाने हात स्वच्छ धुवावेत.

महापालिकेचे आरोग्य केंद्र, रुग्णालयात उपचार घ्यावेत.

साथरोग नियंत्रणला (टोल फ्री ८९५६३०६००७) माहिती द्या.

अशी घ्या मुलांची काळजी

जेवणाच्या डब्यात कोरडा आहार द्या

डब्यात ताजे अन्न व बाटलीत उकळलेले पाणी द्या

पावसापासून संरक्षणासाठी छत्री, रेनकोट सोबत द्या

आजारी असल्यास शाळेत पाठवू नका

घरीच उपचार न करता डॉक्टरांकडे घेऊन जा

अतिसार झाल्यास ओआरएस किंवा मीठ साखर पाणी द्या

आजारपणात गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे

सध्या सर्दी, ताप, खोकला, पोटदुखी, जुलाब, उलट्या, मळमळ होणे अशी लक्षणे असणाऱ्या मुलांमध्ये सध्या लक्षणीय वाढ झाली आहे. डेंगी आणि फ्लूची लक्षणे सारखीच असल्याने विषाणूजन्य आजारांचे औषधोपचार मुलांना दिले जात आहेत. बहुतांश आजार हे दूषित पाणी, दूषित अन्न व हवेतून होतात. त्यामुळे मुलांना शुद्ध अन्न व उकळलेले पाणी द्या. मुलांचा पाच-सहा दिवसांपेक्षा जास्त काळ ताप राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

— डॉ. सुहास रोटे,बालरोगतज्ज्ञ, अमृत बालरुग्णालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.